आयुष्याचं काही खरं नाही, त्यामुळे…, प्रियाच्या निधनानंतर ऑनस्क्रिन आईकडून भावना व्यक्त
Priya Marathe Death: प्रिया आता नाही यावर विश्वास बसत नाही... प्रियाच्या निधनानंतर ऑनस्क्रिन आईकडून भावना व्यक्त, म्हणाली, 'आयुष्याचं काहीहील खरं नाही त्यामुळे...', प्रियाच्या निधनानंतर इंडस्ट्रीमध्ये शोककळा

Priya Marathe Death: ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत वर्षा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रिया कॅन्सरशी झुंज देत होती. तिची ही झुंज अपयशी ठरली. प्रियाच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी दुःख व्यक्त केलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली… पण प्रिया आता आमच्यात नाही.. यावर विश्वास बसत नाही.. असं देखील अनेक सेलिब्रिटी म्हणाले.
आता अभिनेत्री स्वाती आनंद हिने देखील प्रिया हिच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘कसम से’ या मालिकेत दोघींनी एकत्र काम केलं. स्वाती आनंद म्हणाली, ‘प्रियाबद्दल मी काय बोलणार? ‘कसम से’ मालिकेत ती माझी लेक म्हणून आली… तो काळ आमच्यासाठी फार उत्तम काळ होता. त्यानंतर आम्हाला दोघींना ‘पवित्र रिश्ता’ मालिकेसाठी विचारण्यात आलं. तेव्हा तिने मला फोन केलं आणि म्हणाली, ‘ताई पवित्र रिश्ता’ मालिकेत काम करु का?’ यावर मी तिला म्हणाले, कर… काहीही हरकत नाही. मालिकेत तीन बहिणींचं नातं फार चांगलं दाखवण्यात येणार आहे.. तू मालिका नक्की केली पाहिजे…’
‘तो पाच वर्षांचा काळ आम्हा प्रत्येकासाठी फार खास होता. कारण मालिकेमुळे आमच्या लोकप्रियतेत वाढ झाली. प्रेक्षकांना आम्हाला भरभरुन प्रेम दिलं … एक कलाकार म्हणून आमच्यात अनेक बदल झाले…’
पुढे प्रियासोबत शेवटचं बोलणं कधी झालं असा प्रश्न देखील अभिनेत्री विचारण्यात आला. यावर स्वाती म्हणाली, ‘आम्हाला सर्वांना माहिती होतं तिला कॅन्सर झाला आहे. तिच्यासोबत बोलणं झालं तेव्हा ती म्हणाली, मी सगळं सहन केलंय आता यातून सुद्धा नक्की बाहेर येईल… आम्हाला देखील वाटलं प्रिया पूर्णपणे बरी होईल… पण तसं काही झालं नाही..’
एवढंच नाही तर अभिनेता पराग त्यागी याची पत्नी शेफाली जरिवाला हिच्याबद्दल देखील स्वाती हिने भावना व्यक्त केल्या. म्हणाली, ‘त्या दिवशी पराग याला भेटले… त्याच्यासाठी प्रत्येक क्षण फार कठीण होता… आयुष्याचं काहीही खरं नाही, त्यामुळे नेहमी आनंदी राहा… प्रत्येकाला आनंदी ठेवा…’ असं देखील स्वाती म्हणाली.
प्रिया मराठी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीच्या निधनानंतर कुटुंबियांसह चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 38 व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनानंतर इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.
