भयानक प्रसंग… तब्बल 14 वाहनं एकमेकांवर धडकली… व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने सरकारला धरलं धारेवर
रस्त्याची दुरवस्था... कायम ट्रॅफिक.... भयानक आहे शहराची परिस्थिती... अपघातात तब्बल 14 वाहनं एकमेकांवर धडकली... व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने सरकारला धरलं धारेवर... सध्या अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रस्त्याची दुरवस्था आणि कायम असलेल्या ट्रॅफिकमुळे अपघातांच्या संख्ये देखील मोठी वाढ झाली आहे. रोज अपघाताच्या बातम्या आणि सोशल मीडियावर अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता देखील अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अपघात किती भयानक आहे. तब्बल 14 वाहनं एकमेकांवर धडकली. घडलेल्या घटनेचा व्हिडीओ मराठी अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट केला आणि सरकारला चांगलंच धरलं धारेवर आहे.
भयानक अपघात दुसरीकडे कुठे नाही तर, ठाणे-घोडबंदर रोडवरील गायमुख घाटात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 9 जानेवारी रोजी हा अपघात झाला आहे. सांगायचं झालं तर, ठाणे येथील घोडबंदर रोडवर कायम वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. अशात रस्त्याची दुरवस्था हे होणाऱ्या अपघातांसाठी मोठं कारण आहे.
अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने अपघाताचा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे. अतिशय भयानक असा हा अपघात असल्याचं दिसत आहे. अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर असं दिसून येत आहे की, घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने अवजड वाहने जात असताना काही हलकी वाहने विरुद्ध दिशेने येत होती. अशात नियंत्रण सुटल्यामुळे गंभीर अपघात झाला…

व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, ‘गाडी विरुद्ध दिशेला टाकल्यामुळे अपघात झाला, असं सांगून सरकारने कृपया हात जोडू नये…’ अपघाताचं खरं कारण, रस्त्यांची दुरवस्था’, कायम ट्रॅफिक, ट्रॅफिक पोलिस नसणं आणि सरकारचं दुर्लक्ष असं देखील म्हटलं आहे.
अपघातानंतर रस्त्यावर लोकांची गर्दी जमली. 14 वाहनं एकमेकांना धडकल्यामुळे गाड्यांचं मोठं नुकसान झालं. घटनेची माहिती मिळताच, पोलीस, वाहतूक शाखा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाची पथके घटनास्थळी दाखल झाली. या अपघातात काही नागरिक जखमी देखील झाले आहे. तर काही जखमींना ठाणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे. अशात अपघात पाहिल्यानंतर ठाणे-घोडबंदर रोडची दुरवस्था नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे.
अभिनेत्री ऋतुजा बागवे हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम करत अभिनेत्रीने चाहत्याचं मनोरंजन केलं आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
