Video | ‘अय्ययो….’ राणीच्या गाण्यावर सई लोकूरची धमाल, दाक्षिणात्य तडक्यासह डान्सिंग अंदाज चर्चेत!

‘मराठी बिग बॉस’ फेम अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur) सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. सध्या सई कामात व्यस्त नसल्याने आपल्या चाहत्यांशी मनमोकळा संवाद साधत असते, इतकेच नव्हेतर आपले विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करत असते.

Video | ‘अय्ययो....’ राणीच्या गाण्यावर सई लोकूरची धमाल, दाक्षिणात्य तडक्यासह डान्सिंग अंदाज चर्चेत!
सई लोकूर

मुंबई : ‘मराठी बिग बॉस’ फेम अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur) सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. सध्या सई कामात व्यस्त नसल्याने आपल्या चाहत्यांशी मनमोकळा संवाद साधत असते, इतकेच नव्हेतर आपले विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करत असते. सई नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्त केला आहे. या व्हिडीओमध्ये सईचा डान्सिंग अंदाज पाहायला मिळाला आहे. या डान्सिंग अंदाजाला खास दाक्षिणात्य तडका देखील होता (Marathi Bigg Boss fame actress Sai Lokur share dance video on social media).

अभिनेत्री सई लोकूर तिच्या व्हिडीओ आणि नवनव्या फोटोंमुळे चर्चेत असते. या नव्या व्हिडीओमुले देखील सई पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

पाहा सईचा डान्सिंग अंदाज

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur Roy (@sai.lokur)

या व्हिडीओमध्ये सई लोकूर बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्या ‘अय्या’ चित्रपटातील गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. एरव्ही मॉर्डन लूकमध्ये ग्लॅमरस दिसणारी सई यावेळी मात्र निळ्या रंगाच्या पारंपारिक सहावारी साडीत दिसली. या साडीमध्ये सई लोकूर खूप सुंदर दिसत आहे. सोबतच तिच्या पारंपारिक दक्षिणात्य लूकने या गाण्याला आणखी बहार आणली आहे. गाण्यासोबत सईचे हावभाव चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहेत.

बिग बॉसच्या घरात रंगीली होती सई-पुष्कर मैत्रीची चर्चा

कलर्स मराठी वाहिनीचा ‘मराठी बिग बॉस’ (Bigg Boss) हा कार्यक्रम प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. मराठी बिग बॉसचे पहिले पर्व, त्यातील स्पर्धकांमुळे खूपच चर्चेत आले होते. त्यातील एक स्पर्धक अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur) हिनेदेखील या कार्यक्रमातून स्वत:चा असा एक चाहता वर्ग निर्माण केला आहे. स्पर्धेदरम्यान, ‘बिग बॉस’च्या (Bigg Boss) घरात तिची मेघा धाडे, पुष्कर जोग यांच्यासोबत असलेली मैत्री देखील चांगलीच गाजली होती. विशेषतः सई लोकूर आणि पुष्कर जोग यांच्या मैत्रीची चर्चा बिग बॉसच्या घराबाहेर देखील चांगलीच रंगली होती. मात्र, नुकतेच सईने तीर्थदीप रॉय याच्याशी लग्नगाठ बांधत आपल्या सुखी संसाराला सुरुवात केली आहे (Marathi Bigg Boss fame actress Sai Lokur share dance video on social media).

लॉकडाऊन दरम्यान चाहत्यांशी संवाद

कोरोना लॉकडाऊन दरम्यानच्या काळात सई लोकूर (Sai Lokur) तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधत होती. या काळात येणार ताणताणाव, नैराश्य यातून बाहेर पडण्यासाठी ती चाहत्यांशी संवाद साधून त्यांचे मार्गदर्शन करत होती. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच तिने, आपण प्रेमात पडलो असून आपल्याला आपला योग्य जोडीदार मिळाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. या शिवाय आपल्या लग्नाचे फोटो देखील तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.

कपिल शर्मासह चित्रपटात झळकली होती सई

बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी सई लोकूर 2015 साली प्रदर्शित झालेल्या ‘किस किसको प्यार करु’ या हिंदी चित्रपटात देखील झळकली होती. या चित्रपटात कॉमेडी किंग कपिल शर्मा देखील होता. यात सईने कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

(Marathi Bigg Boss fame actress Sai Lokur share dance video on social media)

 हेही वाचा :

PHOTO | ‘कीस काँट्रोवर्सी’ विसरून पुन्हा घेतली एकमेकांची ‘गळाभेट’, राखी सावंत-मिका सिंगचे फोटो चर्चेत!

Video | नेहा कक्करचा पंजाबी गाण्यावर धमाल ‘भांगडा’, पती रोहनप्रीत कौतुक करत म्हणाला…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI