AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: राज ठाकरेंच्या आवाजात महागर्जना; ‘हर हर महादेव’चा टीझर पहायलाच हवा!

छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक लढाईत ही गर्जना म्हणजे लढण्याचं बळ देणारी जणू उर्जाच होती. झी स्टुडिओजच्या 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) या चित्रपटातून हीच ऊर्जा आता परत एकदा अनुभवायला मिळणार आहे.

Video: राज ठाकरेंच्या आवाजात महागर्जना; 'हर हर महादेव'चा टीझर पहायलाच हवा!
Har Har Mahadev TeaserImage Credit source: Tv9
| Updated on: Mar 04, 2022 | 10:26 AM
Share

हर हर महादेव… मराठी मनाला चेतवणारी, रक्त सळसळवणारी गर्जना! सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यातून, सिंधुदुर्गाच्या लाटांमधून, देवगिरीच्या अभेद्य भिंतीमधून ते अटकेपार फडकवणाऱ्या भगव्या ध्वजापर्यंत जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याची मोहोर उमटली तिथे तिथे या गर्जनेने आसमंत दणाणून सोडला. या गर्जनेशिवाय मराठ्यांचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक लढाईत ही गर्जना म्हणजे लढण्याचं बळ देणारी जणू उर्जाच होती. झी स्टुडिओजच्या ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) या चित्रपटातून हीच ऊर्जा आता परत एकदा अनुभवायला मिळणार आहे. अभिजित देशपांडे लिखित- दिग्दर्शित (Abhijeet Deshpande), झी स्टुडिओज आणि गणेश मार्केटिंग फिल्म्स निर्मित ‘हर हर महादेव’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. (Marathi Movie)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या धीरगंभीर आवाजातील हा टीझर आहे. “जेव्हा मायमाऊलीची बेअब्रू आणि मंदिराला तडा गुन्हा नव्हता, जेव्हा सह्याद्रीला कणा आणि मराठीला बाणा नव्हता. ही ३५० वर्षानंतरच्या पहाटफुटीची गोष्ट आहे. ही अठरापगड आरोळ्यांची आणि माझ्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे..हर हर महादेव,” अशी राज ठाकरेंच्या आवाजातील वाक्यं या टीझरमध्ये ऐकायला मिळतात.

आजवर झी स्टुडिओजने एकाहून एक दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. याच पंक्तीत आता ‘हर हर महादेव’ हे आणखी एक नाव सहभागी होणार आहे. नुकतंच महाराष्ट्र राज्य सरकारने काही निवडक शहरांमध्ये चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याची महत्त्वाची घोषणा केली. याच घोषणेचं औचित्य साधून प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे.

हेही वाचा:

नागराजमुळे त्या पठ्ठ्याचं आयुष्यच बदललं; 20 वर्षीय मुलाचं स्वप्न साकार

‘अमिताभ बोलतो का रे सेटवर, समोरच्याला घाबरवत असेल ना तो’; किशोर कदम म्हणतात..

‘झुंड’च्या ट्रेलरमध्ये लक्ष वेधणारी ‘भावना भाभी’ आहे तरी कोण?

मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.