पावसाने योग जुळवून आणला, राज ठाकरेंनी सुबोधचा सिनेमा पाहिला

अभिजीत देशपांडे दिग्दर्शित 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' या मराठीतल्या 'कडक' सिनेमाचं राज ठाकरेंनी तोंडभरून कौतुक केलं आहे. (MNS Raj Thackeray Appriciate Dr kashinath Ghanekar marathi Movie)

पावसाने योग जुळवून आणला, राज ठाकरेंनी सुबोधचा सिनेमा पाहिला
Follow us
| Updated on: Sep 24, 2020 | 4:33 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं कलाप्रेमी रसिक मन सर्वश्रूत आहेत. अनेक जाहीर व्यासपीठांवरून मराठी सिनेमा, नाटकांबद्दल राज ठाकरे बोलत असतात. मराठी सिनेमांवर आणि रंगभूमीवर असलेलं राज ठाकरे यांचं प्रेम अनेकदा दिसून आलं आहे. अभिजीत देशपांडे दिग्दर्शित ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ या मराठीतल्या ‘कडक’ सिनेमाचं राज ठाकरेंनी तोंडभरून कौतुक केलं आहे. तसंच चित्रपटातल्या अभिनेते-अभिनेत्रींच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. (MNS Raj Thackeray Appriciate Dr kashinath Ghanekar marathi Movie)

‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ 2018 साली प्रदर्शित झाला होता. मात्र राज ठाकरेंचा हा सिनेमा पाहायचा राहून गेला होता. मुंबईत दोन दिवस तुफान पाऊस सुरु असल्याने अत्यावश्यक कामांव्यतिरिक्त बाहेर पडणं अवघड होतं. हीच संधी साधून राज ठाकरे यांनी काशिनाथ घाणेकर चित्रपट पाहिला. हा सिनेमा त्यांना एवढा आवडला की त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर सिनेमाचं भरभरून कौतुक केलं.

एका शब्दांत सांगायचं तर अप्रतिम सिनेमा. कमालीची उत्तम बांधलेली स्क्रिप्ट, स्क्रिनप्ले आणि अर्थात दिग्दर्शनपण… अशा शब्दांत राज ठाकरे यांनी ‘आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

“भालजी पेंढारकर सोडले तर डॉ. काशिनाथ घाणेकर, वसंत कानेटकर ते प्रभाकर पणशीकर प्रत्येकाला भेटण्याचा योग मला आला होता आणि व्यंगचित्रकार असल्याने प्रत्येकाच्या लकबी मी हेरल्या होत्या. आज सिनेमात प्रत्येक नटाचं काम करताना जाणवलं की ह्या सगळ्यांनी काय जबरदस्त ही सगळी पात्र उभी केली आहेत. सुबोध भावे, सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी, आनंद इंगळे, प्रसाद ओक, मोहन जोशी, नंदिता धुरी, वैदेही परशुरामी खरंच सगळ्यांचे अभिनय कडक…!”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सिनेमात दाखवलेला काळ मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ होता. कोरोनोत्तर काळात मराठी रंगभूमी अशीच बहरू दे… आणि नटांच्या-संहितांच्या जोरावर तसंच सिनेमात म्हटल्याप्रमाणे नाट्यवेड्या मराठी माणसाच्या प्रतिसादावर पुन्हा नाट्यगृहाच्या बाहेर हाऊसफुल्लचे फलक कायमचे लागू देत, अशी अपेक्षा देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,

“आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर 2018 ला जरी रिलीज झाला होता तरी पाहायचा राहून गेला होता. पण बाहेर पाऊस पडत असल्याने घराबाहेर पडणं शक्यच नाही त्यामुळे नेटफ्लिक्सवर मराठी सिनेमे बघताना हा सिनेमा समोर आला आणि एका बैठकीत बघून संपवला. एका शब्दांत सांगायचं तर अप्रतिम सिनेमा. कमालीची उत्तम बांधलेली स्क्रिप्ट, स्क्रिनप्ले आणि अर्थात दिग्दर्शनपण… भालजी पेंढारकर सोडले तर डॉ. काशिनाथ घाणेकर, वसंत कानेटकर ते प्रभाकर पणशीकर प्रत्येकाला भेटण्याचा योग मला आला होता आणि व्यंगचित्रकार असल्याने प्रत्येकाच्या लकबी मी हेरल्या होत्या. आज सिनेमात प्रत्येक नटाचं काम करताना जाणवलं की ह्या सगळ्यांनी काय जबरदस्त ही सगळी पात्र उभी केली आहेत. सुबोध भावे, सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी, आनंद इंगळे, प्रसाद ओक, मोहन जोशी, नंदिता धुरी, वैदेही परशुरामी खरंच सगळ्यांचे अभिनय कडक…! सिनेमात दाखवलेला काळ मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ होता. कोरोनोत्तर काळात मराठी रंगभूमी अशीच बहरू दे… आणि नटांच्या-संहितांच्या जोरावर तसंच सिनेमात म्हटल्याप्रमाणे नाट्यवेड्या मराठी माणसाच्या प्रतिसादावर पुन्हा नाट्यगृहाच्या बाहेर हाऊसफुल्लचे फलक कायमचे लागू देत…!”

संबंधित बातम्या

मला दहावीला फक्त 37 टक्के गुण; ‘तो’ सिनेमा मी 32 वेळा पाहिला : राज ठाकरे

‘हा’ हिंदी चित्रपट पाहाच, राज ठाकरेंचं आवाहन

(MNS Raj Thackeray Appriciate Dr kashinath Ghanekar marathi Movie)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.