मला दहावीला फक्त 37 टक्के गुण; 'तो' सिनेमा मी 32 वेळा पाहिला : राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज(1 मार्च) मुलाखत पार (Raj Thackeray Interview) पडली.

मला दहावीला फक्त 37 टक्के गुण; 'तो' सिनेमा मी 32 वेळा पाहिला : राज ठाकरे

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज(1 मार्च) मुलाखत पार (Raj Thackeray Interview) पडली. ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. ठाण्यातील गडकरी रंगायतन या नाट्यगृहात ही मुलाखत पार पडली. या मुलाखतीत राज ठाकरेंनी अंबरीश मिश्र यांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं (Raj Thackeray Interview) दिली.

“माझ्यासाठी राजकारणाचं अर्थ हा निवडणुकीच्या पलीकडे आहे. निवडणुकीच्या पलीकडे महाराष्ट्र बघण्याचा माझा दृष्टीकोन अत्यंत कलात्मक आहे. देश-विदेशातील अनेक गोष्टी महाराष्ट्रात याव्यात,” अशी इच्छा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केली.

यावेळी राज ठाकरेंना व्यंगचित्रावरुन एक प्रश्न विचारला त्यावेळी ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचा चेहरा व्यंगचित्रासाठी चांगला आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा चेहराही कार्टूनसाठी बेस्ट,” असेही ते म्हणाले.

“मी ग्रॅज्युएट नाही आणि त्याचा काही फरकही कधी पडला नाही. मला दहावीला 37 टक्के गुण होते. म्हणून मी कधीच दहावीच्या मुलांच्या सत्काराला जात नाही. बोर्डात येणाऱ्या मुलांचा सत्कार 37 टक्केवाला करतोय ही आपली लोकशाही. कुठल्या तोंडाने त्या मुलांच्या सत्काराला जायचं,” असेही राज ठाकरे म्हणाले.

“आता जे राज्यात घडलं ते दुर्दैवी आहे. ज्यांच्या जास्त जागा ते विरोधी पक्षात बसले आहेत. याचा परिणाम वाईट होतो. महाराष्ट्राच्या दृष्टीने हे चांगलं नाही. पुढच्या पिढीला आपण काय संदेश देणार आहोत?” असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित (Raj Thackeray Interview) केला.

“राजा तशी प्रजा की प्रजा तशी राजा? हे लोकांनी ठरवायला हवं. खरंतर मला या निवडणुकीत निकाल लागले तेव्हापर्यंत खूप आनंद झाला होता. ज्यांनी पक्षांतर केले त्यांना महाराष्ट्राने घरी बसवलं,” अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.

“जे. जे. स्कूलमध्ये असताना मी प्लाझा थिएटरमध्ये गांधी चत्रपट पाहिला होता. तो चित्रपट पाहिल्यावर भारावलो होतो. त्यानंतर मी महात्मा गांधींची अनेक पुस्तक वाचली. मी गांधी चित्रपट प्लाझाला 30 ते 32 वेळा पाहिला. हा चित्रपट टीव्हीवर लागला की माझी बायको कपाळावर हात मारते,” असेही राज ठाकरे (Raj Thackeray Interview) म्हणाले.

“मला छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढण्याची फार इच्छा होती. पण तीन तासांत छत्रपती शिवाजी महाराज दाखवून होऊ शकत नाही. चिटणीस, पंतप्रधान, सरदेशमुख हे शब्द महाराजांच्या काळात आले. यानंतर राज ठाकरेंना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत विचारण्यात आले, त्यावेळी ते म्हणाले, फडणवीस हेही साडेतीन शहाण्यांपैकी एक आहेत.

“मनसे अजून बॅचलर, अजून तिला युतीचा स्पर्श झालेला नाही. युतीचा विचार जरी आला तरी टचकन पाणी येत, येत्या काळात काय फुलतय ते बघू आता,” असेही राज ठाकरे म्हणाले.

“राजकारणात मी अपघाताने आलो, महाराष्ट्रात जे काही घडलय ते दुर्दैवी, कोण निवडणूक लढवतं, कोण जिंकतय, कोण सरकार स्थापन करत आहे. महाराष्ट्रात जे काही सुरु आहे ते राज्यासाठी चांगल चित्र नाही,” असेही राज ठाकरे म्हणाले.

“जर एखादं व्यंगचित्र सुचलं आणि ते काढता येत नाही. यासारखं दुर्दैव नाही, बाळासाहेब व्यंगचित्र काढत असताना दर सोमवार मंगळवारी मी सोबत असायचोच, ” असेही राज ठाकरे (Raj Thackeray Interview) म्हणाले.

“अमितही उत्तम चित्र काढायचा. त्याला जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये टाकायचं होतं. व्यंगचित्रासाठी चित्रकला चांगली हवी, राजकीय अभ्यास असला पाहिजे आणि विनोद उपजत असला पाहिजे,” असेही राज ठाकरे म्हणाले.

“लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचं राजकीय योगदान मोठं, पण यानंतर थेट बाळासाहेब, तसेच  नेहरुंचा काळ महत्वाचा, त्यांच योगदान मोठं,” असेही राज ठाकरे म्हणाले.

“महाराष्ट्रात अजूनही राजकीय सर्कस सुरु आहे.  टेलीव्हिजन आणि सोशल मीडिया या दोन्हींनी जगाची शांती घालवली. चांगल्या कामाची दखल घेतली जात नाही याची सवय झाली आहे.  प्रादेशिक अस्मितेच्या मुद्द्यावर दक्षिणेतील स्थानिक पक्षांनी कायम एकहाती सत्ता मिळवली. राजकारणी सध्या जातीच्या नावावर नेते राजकारण करत आहेत,” अशीही टीका राज ठाकरेंनी केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *