AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्न करण्यापेक्षा मी…; ‘सैराट’ फेम तानाजी गळगुंडेचं लग्नव्यवस्थेवर भाष्य

Actor Tanaji Galgunde on Marriage arrangement : सैराट सिनेमातील अभिनेता तानाजी गळगुंडे... तानाजीने लग्नव्यवस्थेवर आपलं मत मांडलं आहे. त्याने लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल त्याचं परखड मत मांडलं आहे. तसंच लग्नात होणाऱ्या खर्चांवर तानाजी व्यक्त झालाय. वाचा सविस्तर...

लग्न करण्यापेक्षा मी...; 'सैराट' फेम तानाजी गळगुंडेचं लग्नव्यवस्थेवर भाष्य
तानाजी गळगुंडे, अभिनेताImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 23, 2024 | 2:40 PM
Share

डेस्टिनेशन वेडिंग, पैशाचा प्रचंड वापर अन् शाही लग्नसोहळे आजकाल केले जातात. लग्नांमध्ये पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. शाही लग्न करणं हे सध्या ‘स्टेटस’ बनलं आहे. मात्र खरंच इतका पैसा खर्च करून शाहीथाटात लग्न करण्याची गरज आहे का? असा प्रश्न ‘सैराट’ फेम अभिनेता तानाजी गळगुंडे याने विचारला आहे. एका मुलाखतीदरम्यान तानाजीने लग्नव्यवस्थेबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. इतका खर्च करून मोठ- मोठी लग्न करण्यापेक्षा रजिस्टर लग्न करावं, असं तानाजी गळगुंडे याने म्हटलं आहे.

लिव्ह अँड रिलेशनशीपबद्दल काय म्हणाला?

मला लग्न ही व्यवस्थाच पटत नाही. कदाचित मी खूप पुढे गेलो असेन. पण मला आता लग्न पटत नाही. मला आता पटतंय ते फक्त लिव्ह अँड रिलेशनशीप… तुम्ही एखाद्या व्यक्तीला आवडता आहात. तर त्याच्यासोबत राहायला हवं, असं तानाजी म्हणाला.

लग्नातील अवाढव्य खर्चावर तानाजीचं मत काय?

लग्नाआधी एखाद्याला पाहायचं त्याला तुम्ही आवडता आहात की नाही ते माहिती नाही. तरीही त्या मुलीसोबत लग्न करायचं हे मला पटत नाही. सगळ्यांनी एकत्र यायचं… पण मग एका दिवसासाठी एवढा तामझाम कशासाठी… पाच- दहा लाख रुपये खर्च करायचे. एवढा खर्च करून वरात काढायची. नाचायची. एवढं कशासाठी करायचं, असं तानाजी म्हणाला.

आपल्याला जर आपल्या मित्रांसोबत नाचायचंच असेल. तर एखादी छोटी पार्टी करू आपण. त्या पार्टीत नाचू आपण… माझा विचार वेगळा आहे की मला लिव्ह इन रिलेशनशीप जास्त ग्रेट वाटतं. पण जर लग्न कराचंच असेल तर ते रजिस्टर पद्धतीने करावं. फार खर्च नको. 2-4 हजारात लग्न केलं. तर ते मला चांगलं वाटतं, असं तानाजीने सांगितलं.

कोण आहे तानाजी गळगुंडे?

तानाजी गळगुंडे हा मराठीतील अभिनेता आहे. सुपरहिट ‘सैराट’ सिनेमात त्याने काम केलं आहे. ‘सैराट’ सिनेमात त्याने लंगड्या ही भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सैराटनंतरही त्याने विविध सिनेमांमध्ये काम केलं आहे. भिरकिट, फ्रि हिट दणका, एकदम कडक, गस्त, मुसंडी, माझा अगडबम, नवरदेव बीएससी अॅग्री, घर बंदुक बिरयाणी, झुंड, मनसु मिलयेंगे, या सिनेमांमध्ये तानाजीने काम केलं आहे. त्याच्या अभिनयाचा वेगळा चाहता वर्ग आहे.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.