5

Sunny Leone : सनी लिओनीचा जलवा ‘आमदार निवासा’त दिसणार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला!

Sunny Leone Aamdar Niwas : सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री सनी लियोनीने बॉलीवूड मध्ये आपले स्थान निर्माण केल्यानंतर तिने प्रादेशिक सिनेमाकडे आपला मोर्चा वळवला आहे.लवकरच सनी लियोनी संजीव कुमार राठोड निर्मित व दिग्दर्शित मराठी चित्रपट 'आमदार निवास'मध्ये 'शांताबाई'या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.

Sunny Leone : सनी लिओनीचा जलवा 'आमदार निवासा'त दिसणार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला!
सनी लिओनीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 9:11 AM

मुंबई : बॉलिवूडची दिलखेचक अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) जिच्या अदांपुढे सगळेच घायाळ होतात.फॅन्स तिच्या एका झलकसाठी पागल होतात.बॉलिवूडमध्ये तिने उत्तम काम केल्यानंतर ती आता मराठी चित्रपटात दिसणार आहे. बॉलिवूडच्या प्रतितयशानंतर तिने प्रादेशिक सिनेमाकडे आपला मोर्चा वळवला.तेलगू,  तामिळ, मल्याळम आणि कन्नड दर्शकांना उत्कृष्ट अदा दाखवल्यांनतर सनी मराठीमध्ये दुसऱ्या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.लवकरच सनी लियोनी संजीव कुमार राठोड निर्मित व दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘आमदार निवास’मध्ये (Amdar Niwas)शांताबाई(Shantabai) या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.

यापूर्वी सनीने बॉईज या मराठी चित्रपटाच्या ‘कुठं कुठं जायच हनिमूनला’या गाण्यावर थिरकून मराठी प्रेक्षकांची मन जिंकली होती.आता सनी आमदार निवासामध्ये ‘शांताबाई’ या गाण्यावर आपला जलवा दाखवणार आहे.आगामी आमदार निवास या चित्रपटाच्या निमित्ताने सनी आपल्याला आधुनिक शांताबाई रूपाने भेटणार आहे. या मराठी आयटम साँग ची बॉलीवुड ने सुद्धा दखल घेतली असून या गाण्याची चर्चा बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा रंगू लागली असून आधुनिक ‘शांताबाई’चा अवतार पाहायला सगळेच उत्सुक आहेत

शांताबाई या गाण्याने 2015 मध्ये महाराष्ट्रातच नाही संपूर्ण जगात अक्षरश:धुमाकुळ घातला होता.आतापर्यंत युट्युबवर या गाण्याला ८५ करोड हुन जास्त व्हीज असून सुमीत म्युझिकच्या मालकीचे हे गाणे आता जय जगदंब प्रोडक्शनने घेतले असून महाराष्ट्राची आधुनिक ‘शांताबाई’ म्हणून सनी लियोनी दिसणार आहे.बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर विष्णू देवाने या आयटम साँगचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. तर संजय लोंढे यांच मूळ गीत असलेलं हे गाणं नितीन सावंत यांनी पुर्ननिर्मित करून या गाण्याला आधुनिकतेची झालर दिली आहे.

‘शांताबाई’ या गाण्याची भव्यता आणि गावरान बाज असलेल्या सनी लिओनीच्या दिलखेच अदांनी प्रेक्षकांचा काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. शांताबाई या गाण्याच्या निमित्ताने गायक संजय लोंढे याना एक मोठी संधी संजीवकुमार राठोड यांनी दिली आहे.सिनेमा सत्य घटनेवर प्रेरित असून सामाजिक दृष्टया दुर्लक्षित अशा विषयावर ‘आमदार निवास’मधून भाष्य करतो. सामाजिक आणि राजकीय गोष्ट सांगणारा चित्रपट आमदार निवास लवकरच चित्रपट गृहात प्रेक्षकांच्या मनोरंजनास सज्ज होणार आहे.

संबंधित बातम्या

साऊथचा श्रीवल्ली विसरा,मराठीतली ‘पुष्पावल्ली’ पाहा…

‘आई कुठे काय करते’मधील यशची गर्लफ्रेंड खऱ्या आयुष्यात आहे इतकी ग्लॅमरस

अभिनेत्री दिव्या खोसला कुमारचा Summer Look; तुम्हीसुद्धा करू शकता ट्राय!

Non Stop LIVE Update
'त्या' दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उद्योगमंत्र्यांना खोचक सवाल
'त्या' दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उद्योगमंत्र्यांना खोचक सवाल
'ढेकणांना मारण्यासाठी लष्कराची गरज नसते', राऊतांवर कुणाचा निशाणा?
'ढेकणांना मारण्यासाठी लष्कराची गरज नसते', राऊतांवर कुणाचा निशाणा?
आदित्य ठाकरे यांना भाजपचा खोचक सवाल, 'अफझलखान तुमचा पाहुणा लागतो का?'
आदित्य ठाकरे यांना भाजपचा खोचक सवाल, 'अफझलखान तुमचा पाहुणा लागतो का?'
शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून राऊत यांचं आव्हान काय? थेट म्हणाले...
शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून राऊत यांचं आव्हान काय? थेट म्हणाले...
रेल्वेनं प्रवास करताय? 'या' मार्गावर आजपासून ५ दिवस रात्रकालीन ब्लॉक
रेल्वेनं प्रवास करताय? 'या' मार्गावर आजपासून ५ दिवस रात्रकालीन ब्लॉक
'सरकारच्या तोंडावर पैसे फेकून मारू', पंकजा मुंडेंसाठी समर्थक सरसावले
'सरकारच्या तोंडावर पैसे फेकून मारू', पंकजा मुंडेंसाठी समर्थक सरसावले
वाघनख ब्रिटनमध्येच मात्र राज्यात राजकारण, 'ती' शिवकालीन की महाराजांची?
वाघनख ब्रिटनमध्येच मात्र राज्यात राजकारण, 'ती' शिवकालीन की महाराजांची?
स्वच्छता मोहीमेत नेत्यांचा सहभाग तर दुसरीकडे अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर
स्वच्छता मोहीमेत नेत्यांचा सहभाग तर दुसरीकडे अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर
'वाघनखं येणार कळताच नकली वाघ बिथरले', भाजप नेत्याचा रोख नेमका कुणावर?
'वाघनखं येणार कळताच नकली वाघ बिथरले', भाजप नेत्याचा रोख नेमका कुणावर?
सुमनताई अन् रोहित पाटील यांचं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
सुमनताई अन् रोहित पाटील यांचं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण