साऊथचा श्रीवल्ली विसरा,मराठीतली ‘पुष्पावल्ली’ पाहा…

साऊथचा श्रीवल्ली विसरा,मराठीतली 'पुष्पावल्ली' पाहा...

तू तेव्हा तशी या मालिकेतून देखील अभिज्ञा छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत अभिज्ञा प्रेक्षकांना पुष्पावल्लीच्या भूमिकेत दिसणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Mar 18, 2022 | 8:30 AM

मुंबई : झी मराठीवरील (Zee Marathi)तू तेव्हा तशी(Tevha Tu Tashi) या आगामी मालिकेची प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरु आहे. या मालिकेची पहिली झलक पाहिल्यापासूनच प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता वाढली आहे. हि मालिका 20 मार्च पासून रात्री 8 वाजता प्रसारित होणार असून स्वप्नील जोशी (Swapnil joshi) आणि शिल्पा तुळसकर (Shilpa Tulaskar) ही जोडी पहिल्यांदाच या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत प्रेक्षकांचा अजून एक आवडता चेहरा एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidmya Bhave) हि टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून अभिज्ञाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तू तेव्हा तशी या मालिकेतून देखील अभिज्ञा छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत अभिज्ञा प्रेक्षकांना पुष्पावल्लीच्या (Pushpavalli) भूमिकेत दिसणार आहे.

तू तेव्हा तशी या मालिकेबद्दल अभिज्ञा म्हणाली, “सो ऑफिशिअली मी तुम्हाला पुन्हा भेटायला येते आहे एका अशा भूमिकेत जी मला याआधी करायला मिळाली नाही.. मी आशा करते कि प्रेक्षकांकडून मला भरभरून प्रेम आणि पाठिंबा मिळेल, कारण माझी मेहनत 100 पटीने जास्त असणार आहे.”

आपल्या नवीन भूमिकेबद्दल बोलताना अभिज्ञा म्हणाली, “प्रेक्षकांनी मला आजवर अनेक नकारात्मक भूमिकांमध्ये पाहिलंय आणि माझ्या प्रत्येक भूमिकेवर भरभरून प्रेम केलं. पण तू तेव्हा तशी मधली भूमिका खूपच वेगळी आहे. मी या मालिकेत पुष्पवल्ली नावाची भूमिका निभावतेय. पुष्पवल्लीला पाहताना प्रेक्षकांना नक्कीच मजा येईल याची मला खात्री आहे.”

अभिज्ञाने याआधी तुला पाहते रे, खुलता कळी खुलेना या झी मराठीवरच्या मालिकांमध्ये काम केलं आहे. या मालिकांमधल्या तिच्या भूमिकांना खूप लोकप्रियता मिळाली.

संबंधित बातम्या

द काश्मीर फाईलची चर्चा सुरूच, नाना पाटेकर म्हणतात गट पडणं साहजिक पण…

“तिच्याशी ब्रेकअपनंतर मी बर्बाद झालो”; प्रतीक बब्बरने सांगितला Amy Jacksonसोबतचा कटू अनुभव

The Kashmir Files बॉक्स ऑफिसवर सुसाट; 100 कोटींपासून काही पावलं दूर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें