AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उगाच नाही म्हणत रं त्याला राष्ट्र’पिता’, लब्यू बापू…; किरण माने यांची पोस्ट चर्चेत

Actor Kiran Mane Post About Mahatma Gandhi : अभिनेते किरण माने यांची पोस्ट चर्चेत; राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत किरण माने यांनी काय लिहिलं? नेमकं काय म्हणाले? किरण माने यांची पोस्ट नेमकं काय लिहिलं? लब्यू बापू, म्हणत किरण माने यांच्याकडून पोस्ट शेअर वाचा सविस्तर...

उगाच नाही म्हणत रं त्याला राष्ट्र'पिता', लब्यू बापू...; किरण माने यांची पोस्ट चर्चेत
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Mar 25, 2024 | 11:34 AM
Share

अभिनेते किरण माने सोशल मीडियावर प्रचंड ॲटिव्ह असतात. विविध विषयांवर किरण माने त्यांचं मत मांडत असतात. आताही त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत एक पोस्ट लिहिली आहे. महात्मा गांधी यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान आपण सगळेच जाणून आहोत. गांधीजींचा अहिंसा आणि शांतीचा संदेश आजही देशाला दिशा देतो. महात्मा गांधी यांच्या विचारांचा किरण माने यांच्यावर प्रभाव आहे. त्याचबाबत किरण माने यांनी पोस्ट शेअर केलीय. उगाच नाही म्हणत रं त्याला राष्ट्र’पिता’, लब्यू बापू…, म्हणत किरण माने यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.

किरण माने यांची पोस्ट यांची पोस्ट जशीच्या तशी

एखादा माणूस ज्या शत्रूविरूद्ध आयुष्यभर लढला, त्याच शत्रूच्या पुढच्या पिढ्यांनी त्या माणसाच्या विचारांनी, जीवनसंघर्षानं भारावून जावं… त्याच्यावर सिनेमा काढावा… त्यात आपल्या बापजाद्यांनी केलेल्या अत्याचाराविरूद्ध या माणसानं कशी झुंज दिली, हे प्रभावीपणे दाखवावं… अख्ख्या जगाचे डोळे दिपवावेत… अफलातून आहे हे !

जगात एकाच नादखुळा माणसाला हा सन्मान लाभलाय… महात्मा गांधी.

गांधीबाबा आयुष्यभर ब्रिटीशांविरूद्ध लढला. ब्रिटीशांनी त्याचा छळ केला, दुस्वास केला, दुनियेचा त्रास दिला, तुरूंगात टाकला.. पण ह्या बाबानं ब्रिटीशांना या देशातनं हाकलूनच दम खाल्ला. यानंतर पस्तीस वर्षांनी एका ब्रिटीश दिग्दर्शकानंच या महात्म्यावर नितांतसुंदर सिनेमा काढला !

…दिग्दर्शक रिचर्ड ॲटनबरो गांधीबाबाचं चरित्र वाचून भारावलावता. असा माणूस पृथ्वीतलावर होता यावर त्याचा विश्वास बसंना. बरं, गांधीच्या स्टोरीत व्हिलन कोण? तर या ॲटनबरोचाच देश ! सगळे ब्रिटीश. च्यायला तरीबी या म्हातार्‍याचा राग का येत नाय आपल्याला? तो गांधीवर लै लै लै खोलात जाऊन अभ्यास करतो. जगभरातल्या इतिहासकारांनी लिहीलेला गांधी वाचतो. जितका वाचंल तितका तो गांधीच्या प्रेमात पडतो ! मनाशी पक्का विचार करतो. या बाबावर सिनेमा बनवायचा. बास. अमेरिकन लेखक रिचर्ड जाॅन ब्रेलीला घेऊन झपाटल्यासारखा कामाला लागतो. विशेष म्हणजे गांधीजींची भुमिका करतो ब्रिटीश अभिनेता बेन किंग्जले !

आपल्या भारतीय महामानवावर परदेशी लोकांनी बनवलेला हा एकमेव सिनेमा आहे जो संपूर्ण जगात डोक्यावर घेतला गेला. त्या काळात या सिनेमानं १२८ मिलीयन डाॅलर्स कमावले. ऑस्कर अवाॅर्डमध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमा, अभिनेता, दिग्दर्शक यासह आठ पारितोषिकं पटकावली. ब्रिटिश फिल्म इंस्टीट्यूटनं विसाव्या शतकातल्या महान ब्रिटीश सिनेमांमध्ये ‘गांधी’ला स्थान दिलं. अमेरिकन फिल्म इंस्टीट्यूटनं जगातल्या प्रेरणादायक सिनेमांमध्ये गणना केली !

माझ्या भावा, उगाच नाही म्हणत रं त्याला राष्ट्र’पिता’!

बाप आखिर बाप होता है… बंदे मे अभी भी बहोत दम है. इस हस्ती को मिटानेवाले खुद मिट गये… ये फिर भी डट के खडा है… लब्यू बापू. ❤️

– किरण माने.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा