Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ये रे ये रे पैसा 3’ च्या चित्रिकरणाला सुरुवात; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेत्रीही सिनेमात झळकणार

Ye Re Ye Re Paisa Movie Shooting Started : 'ये रे ये रे पैसा' या मराठी सिनेमाचं चित्रकरण सुरु झालं आहे. या आजपासून या चित्रपटाचं शुटिंग सुरू झालं आहे. योगेश टिळेकर, दिग्दर्शक संजय जाधव यांच्यासोबत सिनेमातील कलाकारही यावेळी उपस्थित होते. वाचा सविस्तर...

'ये रे ये रे पैसा 3' च्या चित्रिकरणाला सुरुवात; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अभिनेत्रीही सिनेमात झळकणार
ये रे ये रे 3 सिनेमाचं शुटिंग सुरूImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 10, 2024 | 5:39 PM

बहुचर्चित ‘ये रे ये रे पैसा 3’ या मल्टिस्टारर चित्रपटाच्या चित्रिकरणाला आजपासून सुरुवात झाली आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. योगेश टिळेकर, निर्माते-दिग्दर्शक अभिजीत पानसे, मनसे नेते संदीप देशपांडे, नानूभाई जयसिंघानी यांच्या हस्ते मुहूर्त करण्यात संपन्न होऊन चित्रपटाच्या चित्रीकरणाला मुंबईत सुरुवात झाली आहे. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रद्य मंडळी उपस्थित होती. पुरेपूर मनोरंजन करणारं कथानक, दिग्गज कलाकार असलेल्या या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. ये रे ये रे पैसा आणि ये रे ये रे पैसा 2 च्या यशानंतर या सिनेमाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘ये रे ये रे पैसा 3’ च्या चित्रिकरणाला सुरुवात

ये रे ये रे पैसा आणि ये रे ये रे पैसा 2 या चित्रपटांनी यापूर्वी बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवलं होतं. पैसा मिळवण्यासाठीची धडपड आणि त्यातून होणारे गोंधळ या कथासूत्रावर हे चित्रपट बेतलेले होते. आता आधीच्या दोन चित्रपटांतलं कथानक आणि त्या धमाल व्यक्तिरेखा आता तिसऱ्या भागात काय धमाल करणार याची उत्सुकता चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच निर्माण झाली आहे.

नुकतंच प्रसिद्ध गायिका वैशाली सामंतच्या आवाजातील एक गाणंही रेकॉर्ड करण्यात आलं होतं. संजय जाधव यांचं दिग्दर्शन, अरविंद जगताप यांचे खुसखुशीत संवाद, दिग्गज अभिनेत्यांचा अभिनय आणि मनोरंजक कथानकाची पर्वणी या चित्रपटाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

सिनेमात कोण-कोणते कलाकार?

‘ये रे ये रे पैसा 3’ चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर अशी तगडी स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटातून भेटीला येणार आहे.

अमेय विनोद खोपकर एलएलपी, उदाहरणार्थ निर्मित आणि न्युक्लिअर अॅरो  या निर्मिती संस्थांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून,  निर्मिती संस्थांचे सुधीर कोलते, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर,  ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ हे या चित्रपटचे  निर्माते आहेत. तर निनाद नंदकुमार बत्तीन हे सहनिर्माते आहेत . चित्रपटाची पटकथा सुजय जाधव यांची आहे. तर संवाद लेखन अरविंद जगताप यांनी केलं आहे.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.