Amol kolhe : “यह टायर तो फायर निकला… लेकिन मैं थकेगा नहीं साला!”, अमोल कोल्हेंची Instagram पोस्ट चर्चेत

अमोल कोल्हे यांनी इन्स्टाला व्हीडिओ शेअर केला आहे. यात ते टायरसोबत वर्कआऊट करताना दिसत आहेत. या व्हीडिओला त्यांनी 'पुष्पा'स्टाईल कॅप्शन दिलं आहे.

Amol kolhe : यह टायर तो फायर निकला...  लेकिन मैं थकेगा नहीं साला!, अमोल कोल्हेंची Instagram पोस्ट चर्चेत
अमोल कोल्हेImage Credit source: Amol kolhe instagram
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 3:21 PM

मुंबई : सध्या सगळीकडे ‘पुष्पा’चा (Pushpa) फिवर पहायला मिळतोय. यात राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे (MP And Actor Amol kolhe) हे देखील मागे नाहीत. अमोल कोल्हे यांनी इन्स्टाला व्हीडिओ शेअर केला आहे. यात ते टायरसोबत वर्कआऊट करताना दिसत आहेत. या व्हीडिओला त्यांनी ‘पुष्पा’स्टाईल कॅप्शन दिलं आहे. “यह टायर तो फायर निकला… लेकिन मैं थकेगा नहीं साला… लहानपणी धुळीच्या रस्त्यांवर जुन्या टायरला एका हातातील काठीने बडवत दुसऱ्या हाताने कमरेवरून घरंगळणारी चड्डी सावरताना वाटलं नव्हतं की टायर असा घाम काढेल!”, असं कॅप्शन दिलं आहे. अमोल कोल्हे यांच्या व्हीडिओची आणि त्यांच्या कॅप्शनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

अमोल कोल्हे यांची इन्स्टाग्राम पोस्ट

खासदार अमोल कोल्हे फिटनेसकडे विशेष लक्ष देतात. खासदार कोल्हे यांनी इन्स्टाला व्हीडिओ शेअर केला आहे. यात ते टायरसोबत वर्कआऊट करताना दिसत आहेत. या व्हीडिओला त्यांनी ‘पुष्पा’स्टाईल कॅप्शन दिलं आहे. “यह टायर तो फायर निकला… लेकिन मैं थकेगा नहीं साला… लहानपणी धुळीच्या रस्त्यांवर जुन्या टायरला एका हातातील काठीने बडवत दुसऱ्या हाताने कमरेवरून घरंगळणारी चड्डी सावरताना वाटलं नव्हतं की टायर असा घाम काढेल!”, असं कॅप्शन दिलं आहे. अमोल कोल्हे यांच्या व्हीडिओची आणि त्यांच्या कॅप्शनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

View this post on Instagram

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

नेटकऱ्यांच्या कमेंट

अमोल कोल्हेंच्या या इन्स्टाग्रामपोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत आपलं मत मांडलंय. एका नेटकऱ्याने “फायर है बॉस!”, म्हटलंय. तर दुसऱ्याने “शेर की झलक सबसे अलग”, अशी कमेंट केलीये. एकाने “सर, तुम्ही रॉकस्टार अहात”, असं म्हटलंय. तर “तुम्ही बालपणीची आठवण करून दिली” अशी कमेंट एकाने केली आहे. अनेकांनी जाळाचे इमोजी वापरत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नेटकऱ्याने मागितली मदत, कोल्हेंनी दिला नंबर

अमोल कोल्हे यांच्या या वर्कआऊट व्हीडिओवर एक वेगळी कमेंट पहायला मिळाली. एका नेटकऱ्याने आपला मित्र आजारी आहे. त्याच्या फुप्फुसावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यासाठी 25 लाख रूपये लागणार आहेत असं म्हटलं. त्यावर अमोल कोल्हे यांनी स्वत: कमेंट केली आणि आपल्या ऑफिसचा संपर्क क्रमांक दिला. या नंबरवर संपर्क करा असं त्यांनी या व्यक्तीला सांगितलं.

संबंधित बातम्या

सारखं काहीतरी होतंय! नात्यातल्या गोडव्याची मजेशीर नोकझोक; 36 वर्षांनंतर Prashant Damle-Varsha Usgaonkar एकत्र

“तो मी नव्हेच! ‘आप’ल्याला ह्यात ओढू नका”, Aap ची उमेदवार यादी जाहीर, अभिनेता Sandeep Pathak ची प्रतिक्रिया…

“ते म्हणतात… सगळं सेमच आहे”, Kranti Redkar ने सांगितला पती Sameer wankhede सोबतचा शॉपिंगचा किस्सा

Non Stop LIVE Update
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.