AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pawankhind: ‘पावनखिंड’मध्ये बाजीप्रभू साकारणाऱ्या अजय पूरकर यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी बांधलं घर

अजय पूरकर यांनी फक्त बाजीप्रभू साकारले नाहीत तर हा झंझावात ते खऱ्या अर्थाने जगले आहेत. याच प्रेमापोटी त्यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी घर बांधलं आहे. ज्या भूमीत पावनखिंडीची लढाई झाली त्याच भूमीत आपलं घर असावं अशी त्यांची इच्छा होती आणि अखेर ते स्वप्न पूर्ण झालं आहे.

Pawankhind: 'पावनखिंड'मध्ये बाजीप्रभू साकारणाऱ्या अजय पूरकर यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी बांधलं घर
Ajay Purkar: ऐतिहासिक भूमीत जेव्हा स्वप्नांचा बंगला उभा राहतो..Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Jun 16, 2022 | 3:32 PM
Share

शूरवीर बाजीप्रभू देशपांडे (Bajiprabhu Deshpande) आणि बांदल सेनेच्या शौर्य, धैर्य आणि पराक्रमाचा त्रिवेणी संगम असलेल्या पावनखिंड (Pawankhind) सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्लची पाटी दिमाखात मिरवलेल्या या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर येत्या 19 तारखेला प्रवाह पिक्चर या वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. या सिनेमात अभिनेता अजय पूरकर (Ajay Purkar) यांनी महापराक्रमी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली आहे. प्रत्येक कलाकारासाठी एखादी भूमिका म्हणजे परकाया प्रवेश असतो. अजय पूरकर यांनी फक्त बाजीप्रभू साकारले नाहीत तर हा झंझावात ते खऱ्या अर्थाने जगले आहेत. याच प्रेमापोटी त्यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी घर बांधलं आहे. ज्या भूमीत पावनखिंडीची लढाई झाली त्याच भूमीत आपलं घर असावं अशी त्यांची इच्छा होती आणि अखेर ते स्वप्न पूर्ण झालं आहे.

“पावनखिंड सिनेमाने बॉक्स ऑफिसवर विक्रम रचलाच आहे. या सिनेमामुळे फक्त मोठ्यांचच नाही तर छोट्या दोस्तांचंही भरभरुन प्रेम मिळालं आहे. हे सगळे छोटे दोस्त मला आवडीने भेटवस्तू घेऊन येतात. एक किस्सा तर एका पालकांनी मला सांगितला तो असा की, त्यांचा मुलगा मध्यरात्री झोपेतून रडत उठला आणि म्हणाला बाजीप्रभू एकटेच उभे राहून लढत आहेत मला तिकडे घेऊन चला. हे निरागस प्रेम पाहून भारावून जायला होतं. या पिढीपर्यंत जेव्हा आपल्या शूरवीरांचं बलिदान पोहोचतं तेव्हा खरं सिनेमा यशस्वी झाला असं ठामपणे म्हणता येईल,” असं अजय म्हणाले. या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर येत्या रविवारी म्हणजेच 19 जूनला दुपारी 1 वाजता प्रवाह पिक्चरवर पहायला मिळेल.

पहा घराचे फोटो-

इन्स्टा पोस्ट-

View this post on Instagram

A post shared by Ajay Purkar (@ajay.purkar)

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात कुटुंबाने एकत्र येण्याचे प्रसंग फार कमी वेळा जुळून येतात. सिनेमा हे एक असं जादुई माध्यम आहे जे संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणतं. यानिमित्ताने आठवणींना उजळा मिळतो आणि नकळत चेहऱ्यावर हास्याची आणि समाधानाची लकेर उमटते. संपूर्ण कुटुंबाचा बंध अधिकाधिक घट्ट करण्यासाठी असे क्षण आयुष्यात येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हेच साध्य करण्यासाठी प्रवाह पिक्चर ही नवी वाहिनी सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दर रविवारी नव्या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार आहे. पावनखिंड सिनेमापासून या धमादेकार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरची सुरुवात होणार आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.