5

Holi Festival Song : ‘रंग बरसे’ होळी स्पेशल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, रवी भाटिया आणि काव्या किरण यांचं नवं गाणं प्रदर्शित

आगामी चित्रपट 'चौपार' चित्रपटातील 'रंग बरसे' (Rang Barase) हे गाणं प्रदर्शित झालं आहे. आगळ्या वेगळ्या अंदाजात हे गाणे प्रेक्षकांसमोर आलंय. यंदाचं म्हणजे 2022चं होळीचं गाणं म्हणून 'रंग बरसे' हे गाणं ओळखलं जातंय.

Holi Festival Song : 'रंग बरसे' होळी स्पेशल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, रवी भाटिया आणि काव्या किरण यांचं नवं गाणं प्रदर्शित
रंग बरसे- गाणं
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 4:31 PM

मुंबई : होळीचा सण जवळ येताच चाहूल लागते ते होळीच्या गाण्यांची. गाण्यांवर थिरकत होळीचा सण साजरा करण्याचा आनंदच वेगळा म्हणायला हवा. यंदा होळी सणाच्या निमित्ताने असंच एका बहारदार गाणं सध्या रिलीज झालंय. आगामी चित्रपट ‘चौपार‘ चित्रपटातील ‘रंग बरसे(Rang Barase) हे गाणं प्रदर्शित झालं आहे. आगळ्या वेगळ्या अंदाजात हे गाणे प्रेक्षकांसमोर आलंय.  यंदाचं म्हणजे 2022चं होळीचं गाणं म्हणून ‘रंग बरसे’ हे गाणं ओळखलं जातंय. हे विविध रंगानी भरलेले गाणे रसिकांच्या मनातही रंग भरण्यास मदत करतंय. गाण्यात मुख्य भूमिकेत असणारे रवी (Ravi) आणि काव्याच्या (Kavya) लव्हेबल केमिस्ट्रीने गाण्याची रंगत आणखीनच वाढली आहे.  “मेरे गोरे बदन पे तुने जो मारी पिचकारी, लाल गुलाबी रंगों से मै भिग गयी हू सारी”, असे या गाण्याचे बोल आहेत.

या चित्रपटाचे आणि गाण्याचे दिग्दर्शक विजय बुटे असे म्हणतात की, ”नुकतेच आम्ही ‘चौपार’ चित्रपटामधील ‘रंग बरसे’ हे पहिले गाणे प्रदर्शित केले आहे. या चित्रपटात दोन राजघराण्यांमधील शत्रुत्वाची कहाणी मांडण्यात आली आहे. हा चित्रपटही होळी सणावर आधारित असल्याने, होळीचे औचित्य साधत या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि हे गाणं अनेकांच्या पसंतीला उतरतंय.”

या पुढे बोलताना ते असे म्हणाले की, “चित्रपटाचे चित्रीकरण एप्रिलमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. आता चित्रपटाचे शूटिंग पुण्यात सुरू आहे. मला खात्री आहे की चित्रपटाची कथा आजवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपेक्षा नक्कीच निराळी आहे, त्यामुळे चित्रपट बघताना रसिक प्रेक्षकही खुर्ची सोडणार नाहीत.”

या चित्रपटाविषयी बोलताना, मुख्य भूमिकेत असलेला रवी म्हणाला, ”हा चित्रपट महाभारतातील ‘चौपार’ या गेमवर आधारित आहे. जुगाराच्या खेळामुळे शत्रुत्व कसे निर्माण होते आणि शेवटी त्याचे काय परिणाम होतात यावर हा चित्रपट आहे. दरम्यान, हा चित्रपट देखील एक प्रेमकथा असून त्यात अॅक्शन सीक्वेन्सचाही भरणा आहे. चित्रपटाची आगळीवेगळी कथा नक्कीच प्रेक्षकांना आवडेल याची आम्हाला खात्री आहे.” या पुढे तो असे म्हणाला, ”मी चित्रपटात राजवीर नामक एका प्रेमी युवकाची भूमिका साकारत आहे. चित्रपटात राजवीरला करावा लागणार संघर्ष पाहायला मिळणार आहे, मात्र संघर्ष आणि प्रेम या दोन बाजूंना त्याने कसे तोलले आहे हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.”

या चित्रपटाचे निर्माते शंतनू फुगे यांच्यासह चित्रपटाचे दिग्दर्शक विजय बुटे गेली 2 वर्षे चित्रपटावर काम करत आहेत. हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज होणार आहे.

संबंधित बातम्या

Holi Festival 2022 : सोहेन खानची पर्यावरणपूरक होळी, मुलगा योहानसोबत खेळला पाण्याची होळी

Holi Festival : रंग बरसे… अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची लग्नानंतरची पहिली होळी, पाहा फोटो…

Video: राज कपूर यांची होळी पार्टी कशी असायची? पहा नीतू कपूर यांनी शेअर केलेला हा खास व्हिडीओ

Non Stop LIVE Update
सरकारमध्ये लंगडी आणि कबड्डीचा खेळ, कॉंग्रेस नेत्याची सडकून टीका
सरकारमध्ये लंगडी आणि कबड्डीचा खेळ, कॉंग्रेस नेत्याची सडकून टीका
'लांडग्यांचं पिल्लू', आता 'लाचारांची औलाद', टार्गेट अजितदादा?
'लांडग्यांचं पिल्लू', आता 'लाचारांची औलाद', टार्गेट अजितदादा?
'आदित्य नाव बदनाम, ते प्राण्याला कसं देणार?', नेत्याची झोंबणारी टीका
'आदित्य नाव बदनाम, ते प्राण्याला कसं देणार?', नेत्याची झोंबणारी टीका
छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट, त्या निर्णयावर रोहित पवार यांची...
छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट, त्या निर्णयावर रोहित पवार यांची...
ओबीसी महासंघांचे आमरण उपोषण स्थगित, पण, धरणे आंदोलन सुरूच
ओबीसी महासंघांचे आमरण उपोषण स्थगित, पण, धरणे आंदोलन सुरूच
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्र येणार? 'या' आमदाराने वर्तविले भविष्य
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्र येणार? 'या' आमदाराने वर्तविले भविष्य
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल