AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आर्या आंबेकरचं खास गाणं ‘भरली उरा मधी’ प्रेक्षकांच्या भेटीला

'भरली उरा मधी' या गाण्याच्या निमित्ताने रसिकांना एका नव्या कोऱ्या जोडीची ऑनस्क्रिन केमिस्ट्री अनुभवण्याची संधी मिळणार आहे. उदयोन्मुख गायिका आर्या आंबेकरने (Arya Ambekar) हे खास गीत गायलं आहे.

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आर्या आंबेकरचं खास गाणं 'भरली उरा मधी' प्रेक्षकांच्या भेटीला
भरली उरा मधी-'वन फोर थ्री'
| Edited By: | Updated on: Feb 10, 2022 | 5:48 PM
Share

आयेशा सय्यद, मुंबई : प्रेम…प्यार…इश्क… भाषा कोणतीही असो, या भावनेत खूप ताकद असते. ही जगातील सुंदर गोष्टींपैकी एक आहे. आजवर इतिहासात ज्यांनी जगावेगळं ठरत प्रेमाला आपलसं केलं, ते अजरामर झाले. मग ते लैला मजनू असो वा रोमिओ ज्युलिएट.. प्रेम ही जगातील एक सुंदर भाषा आहे, ज्याने ही भाषा त्यालाच ती उमगते आणि स्वर्गाहून सुंदर जगाचा शोध त्याला लागतो. खरं प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही दिवसाची आवश्यकता नसते, तरीही अनेकजण आपल्या प्रेमभावना ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्ताने आपल्या खास व्यक्तीसमोर व्यक्त करतात. याच खास दिवसाचे औचित्य साधत ‘व्हॅलेंटाईन डे‘ च्या (Valentine Day) आधी ‘वन फोर थ्री’ (One Four three Marathi Cinema) चित्रपटातील ‘भरली उरा मधी’ (Bharli Uramadhi Song) हे गाणे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास येत आहे. उदयोन्मुख गायिका आर्या आंबेकरने (Arya Ambekar) हे खास गीत गायलं आहे.

‘भरली उरा मधी’ या गाण्याच्या निमित्ताने रसिकांना एका नव्या कोऱ्या जोडीची ऑनस्क्रिन केमिस्ट्री अनुभवण्याची संधी मिळणार आहे. दाक्षिणात्य धाटणी असलेल्या या चित्रपटाच्या टिझरने प्रेक्षकांना खूश केलेच आहे, तसेच या चित्रपटातील गाणे ही दाक्षिणात्य स्टाईलने चित्रित केले आहे, त्यामुळे हे पाहणे ही रसिक प्रेक्षकांना रंजक ठरणार आहे.

‘भरली उरा मधी’ गाण्यात लव्ह स्टोरी अनुभवायला मिळणार

अभिनेत्री शीतल अहिरराव (Shital Ahirrao) आणि अभिनेता योगेश भोसले (Yogesh Bhosale) या चित्रपटामुळे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या गाण्याला संगीत पी. शंकरम (P Shankram) यांनी दिले असून लखन चौधरी (Lakhan Chaudhari) यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. सर्वांची लाडकी अशी सुमधुर गायिका आर्या आंबेकर हिच्या सुमधूर आवाजात हे गीत रेकॅार्ड करण्यात आले आहे. या गाण्याचे कोरियोग्राफर म्हणून आर. कलाई कुमार (R Kalai Kumar) यांनी बाजू सांभाळली. ‘भरली उरा मधी’ गाण्यात रसिकांना एक लव्ह स्टोरी अनुभवायला मिळणार आहे.

चित्रपटाची कथा काय?

‘वन फोर थ्री’ चित्रपटाची कथा रिअल लाईफ स्टोरीवर आधारित असून यांत एकमेकांवर जीव जडलेल्या प्रेयसी आणि प्रियकराची कथा पाहायला मिळणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या गाण्यातून या जोडीचे प्रेम बहरताना दिसत आहे. अर्थात चित्रपटाच्या टिझरने, आणि या लव्ह सॉंगने प्रेक्षकांची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे, यांत शंकाच नाही. येत्या ४ मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेमागृहात दाखल होण्यास सज्ज झाला आहे.

संबंधित बातम्या

काय घालायचं ज्याचा त्याचा प्रश्न, दिशा पाटनीच्या बिकिनी अवताराला तुम्ही म्हणणार, नार गुलजार!

“बुरखा-हिजाबला माझा विरोधच पण…”, कर्नाटक हिजाब प्रकरणावर जावेद अख्तर संतापले

करोडपती होण्यासाठी सज्ज व्हा!, ‘कोण होणार करोडपती’ चं नवं पर्व 23 फेब्रुवारीपासून ‘सोनी मराठी’वर

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.