AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘श्यामची आई’साठी राज्य पातळीवर सुजय घेतोय ‘श्याम’चा शोध! कसं द्याल ऑडीशन? जाणून घ्या…

काही गोष्टी, तसंच साहित्य हे जणू सोनेरी आठवणींचा ठेवाच असतं. 'श्यामची आई' (Shyamchi Aai) ही कथाही यांपैकीच एक आहे. त्यामुळं जेव्हा कधी 'श्यामची आई'चा उल्लेख होतो, तेव्हा क्षणार्धात श्याम आणि त्याच्या आईची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी रहाते.

'श्यामची आई'साठी राज्य पातळीवर सुजय घेतोय ‘श्याम’चा शोध! कसं द्याल ऑडीशन? जाणून घ्या...
Shyamchi Aai
| Edited By: | Updated on: Dec 21, 2021 | 1:01 PM
Share

मुंबई : काही गोष्टी, तसंच साहित्य हे जणू सोनेरी आठवणींचा ठेवाच असतं. ‘श्यामची आई’ (Shyamchi Aai) ही कथाही यांपैकीच एक आहे. त्यामुळं जेव्हा कधी ‘श्यामची आई’चा उल्लेख होतो, तेव्हा क्षणार्धात श्याम आणि त्याच्या आईची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी रहाते. ‘शाळा’सारख्या पुरस्कार विजेत्या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत दाखल झाल्यानंतर नेहमीच नावीन्यपूर्ण प्रयोग करत मराठी रसिकांसाठी काहीतरी वेगळं घेऊन येणारा दिग्दर्शक सुजय डहाकेनं आता ‘श्यामची आई’ हा चित्रपट रुपेरी पडद्यावर आणण्याचं शिवधनुष्य उचलल्याचं सर्वांनाच माहित आहे.

लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात करण्यात येणार आहे. सध्या याचीच पूर्वतयारी सुरू असून, सुजय सध्या श्यामचा शोध घेण्यात बिझी आहे.

‘श्याम’चा शोध सुरु!

अमृता अरुण राव यांची निर्मिती असलेल्या ‘श्यामची आई’साठी श्यामचा शोध घेण्यासाठी सुजयनं एक शोध मोहिम सुरू केली आहे. श्यामची भूमिका साकारू शकेल अशा कलाकाराचा महाराष्ट्र राज्य पातळीवर शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे. यासाठी एक प्रसिद्धी पत्रकही प्रकाशित करण्यात आलं असून, ‘श्यामची आई’ चित्रपटात टायटल रोल साकारण्यासाठी अभिनयाची आवड असलेल्या 8 ते 12 वर्षे वयोगटातील बालकलाकाराची गरज असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

अटी-शर्ती काय?

श्यामची व्यक्तिरेखा साकारण्यास उत्सुक असणाऱ्या मुलांच्या पालकांनी संपर्क साधण्याचं आवाहन या पत्रकाद्वारे करण्यात आलं आहे. यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. रुपेरी पडद्यावर श्याम साकारण्यास इच्छुक असलेला मुलगा 8 ते 12 वर्षे वयोगटातील असावा. त्याने स्वतःच एखादा मोनोलॉग मोबाईलवर रेकॉर्ड करून दिलेल्या फोन नंबर आणि ईमेलवर पाठवावा. कोणीही थेट फोन करू नये. व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2021 आहे. या तारखेनंतर फोन आणि ईमेल बंद करण्यात येतील. यातून एकूण 10 मुलांची निवड केली जाईल. त्यांना मुंबईत आणून, तीन दिवसांची अभिनय कार्यशाळा घेतली जाईल. त्यातून एका मुलाची निवड श्यामची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी निवड केली जाईल. निवड झालेल्या मुलांना सुजय आणि त्याच्या टीमकडून संपर्क साधला जाईल असंही सांगण्यात आलं आहे. इच्छुक मुलं व पालकांनी shyamchiaai2022@gmail.com आणि 8779624822 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

‘ब्लॅक अँड व्हाईट’मध्ये चित्रित होणार चित्रपट!

‘शाळा’, ‘फुंतरू’, ‘आजोबा’, ‘केसरी’ असे एका पेक्षा एक प्रवाहापेक्षा वेगळे चित्रपट बनवणाऱ्या सुजयनं भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत सुजयनं 15 ऑगस्ट रोजी पोस्टर रिलीजच्या माध्यमातून ‘श्यामची आई’ या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘श्यामची आई’ हा चित्रपट पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजींच्या मूळ कादंबरीवर आधारित असेल. यंदाचं वर्ष भारतीय सिनेसृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या 150व्या जयंतीचं आहे. अमृता अरुण राव यांची निर्मिती असलेला ‘श्यामची आई’ हा चित्रपट पुढल्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज करण्याची योजना आखण्यात आली आहे. या चित्रपटाचं शूटिंग ब्लॅक अँड व्हाईटमध्ये करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

Money Laundering Case : बॉलिवूड सेलिब्रिटींनी तुरुंगात जाऊनही घेतली सुकेश चंद्रशेखरची भेट, अनेक सेलिब्रिटी गोत्यात येणार!

Aishwarya Rai Bachchan | ‘बच्चन’ परिवार अडचणीत, ऐश्वर्या रायला ‘ईडी’चे समन्स! नेमकं प्रकरण काय?

Kajal Aggarwal | ‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालकडे ‘गुड न्यूज’? नव्या फोटोंमुळे चर्चेला उधाण!

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.