‘मी जे बोललो ते दाखवलंच नाही, अर्थाचा विपर्यास, तरीही मी माझ्या वक्तव्यावर ठाम!’, कंगनाला समर्थन देण्यावर विक्रम गोखलेंचे स्पष्टीकरण!

‘1947ला भिक मिळाली, खरं स्वातंत्र्य तर 2014मध्ये मिळालं’, या कंगनाच्या (Kangana Ranaut) वादग्रस्त वक्तव्याला पाठींबा दिल्याबद्दल जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्यावर सर्व स्तरातून जोरदार टीका करण्यात आली होती. यानंतर पत्रकार परिषद घेत विक्रम गोखले यांनी आपली मतं स्पष्ट केली आहेत.

‘मी जे बोललो ते दाखवलंच नाही, अर्थाचा विपर्यास, तरीही मी माझ्या वक्तव्यावर ठाम!’, कंगनाला समर्थन देण्यावर विक्रम गोखलेंचे स्पष्टीकरण!
vikram gokhale
Follow us
| Updated on: Nov 19, 2021 | 12:33 PM

मुंबई : ‘1947ला भिक मिळाली, खरं स्वातंत्र्य तर 2014मध्ये मिळालं’, या कंगनाच्या (Kangana Ranaut) वादग्रस्त वक्तव्याला पाठींबा दिल्याबद्दल जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्यावर सर्व स्तरातून जोरदार टीका करण्यात आली होती. यानंतर पत्रकार परिषद घेत विक्रम गोखले यांनी आपली मतं स्पष्ट केली आहेत. यावेळी त्यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे देखील म्हटले आहे. या पत्रकार परिषदेत त्यांची मुलगी नेहा गोखले देखील त्यांच्यासोबत होती.

कंगना रनौत या मुलीने गेल्या दोन वर्षात जी काही वक्तव्ये केली ती मला माहित नाहीत, मात्र तिने स्वातंत्र्याविषयी जे वक्तव्य केलं त्याला तिची काही करणे असतील. त्या तिच्या म्हणण्याला मी दुजोरा दिला, त्याला माझीही काही कारणं असू शकतात. ती समजून न घेता ताबडतोब धुरळा उडवायला सुरुवात केली. मी त्या मुलीला ओळखत देखील नाही, तिच्यासोबत काम देखील केलेलं नाही. काही संबंध नाही. पण एखाद्या गोष्टीवर वैयक्तिक मत व्यक्त करणे हा माझा अधिकार आहे, असे विक्रम गोखले म्हणाले.

माझं मत ठाम! बदलणार नाही!

माझी तिच्याशी ओळख नसली तर, माझी माझ्या राजकीय अभ्यासाशी चांगली ओळख आहे. तिच्या वक्तव्याला मी समर्थन दिले त्याला माझी कारणं होती, पण मी ती कारणं आता सांगत बसणार नाही. तुम्ही सगळ्यांनी 18 मे 2014 रोजी इंग्लंडमधून निघालेला गार्डियन पेपर वाचा. काळजीपूर्वक वाचा, ज्यात त्यांनी तेच लिहिलंय, जे कंगना म्हणाली. माझ्याकडे तो अंक आहे. त्यामुळे कंगना काहीही चुकीचे बोललेली नाही, असे म्हणालो. त्यावर लगेच सगळीकडे बोंबाबोंब सुरु झाली. भारताचा नागरिक आणि राजकीय अभ्यासक म्हणून माझा हा अभ्यास आहे की, माझ्यासारख्या सामान्य माणसाला 2014मध्ये खरं स्वातंत्र्य मिळालं, असं माझं ठाम मत आहे आणि मी ते कधीच बदलणार नाही, असे विक्रम गोखले म्हणाले.

माझ्या वक्तव्याचा विपर्यास!

मी जे बोललो ते दाखवलंच गेलं नाही. आता अश्रू ढाळणारे जे स्वातंत्र्य सैनिक आहे, त्यांना तेव्हाच कळेल की विक्रम गोखले काय म्हणाले होते आणि त्याचा कसा विपर्यास केला गेला. मी कोणत्याही स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान केलेला नाही. त्या मूळ भाषणात मी असं म्हणालो की, विना तलवार आणि ढाल आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, मग जे बाकीचे ज्यांनी स्वतःचे प्राण दिले, फाशीवर चढले, ब्रिटिशांना गोळ्या घातल्या, त्यांची अवहेलना झाली याची आपल्याला कोणालाच शरम वाटत नाही? त्यांची दखल घ्यावीशी वाटत नाही. याचा मला राग आला. माझी वैयक्तिक मतं कोणावर लादायची नाहीत. मला जे प्रश्न विचारले त्यावरच मी उत्तरं दिली. यापेक्षा अधिक आता मला काहीही बोलायचे नाही, असे विक्रम गोखले म्हणाले.

हेही वाचा :

Farm Laws | पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा, प्रतिक्रिया देताना तापसी पन्नू म्हणते…

Hina Khan | हिना खानने बाथटबमध्ये केलं फोटोशूट, बोल्ड फोटोंनी घातलाय सोशल मीडियावर धुमाकूळ!

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.