Me Vasantrao: ‘चित्रपट पाहताना माझ्या डोळ्यात चक्क पाणी होतं’; रघुनाथ माशेलकरांची प्रतिक्रिया

रसिकप्रेक्षकांच्या मनात घर करणारा 'मी वसंतराव' (Me Vasantrao) या चित्रपटाची अद्यापही चित्रपटगृहात यशस्वी घोडदौड सुरु आहे. प्रेक्षक, समीक्षकांपासून सिनेसृष्टीतील कलावंतांपर्यंत सर्वांनीच या चित्रपटावर कौतुकांचा वर्षाव केला.

Me Vasantrao: 'चित्रपट पाहताना माझ्या डोळ्यात चक्क पाणी होतं'; रघुनाथ माशेलकरांची प्रतिक्रिया
मी वसंतराव- चित्रपटImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 4:15 PM

रसिकप्रेक्षकांच्या मनात घर करणारा ‘मी वसंतराव’ (Me Vasantrao) या चित्रपटाची अद्यापही चित्रपटगृहात यशस्वी घोडदौड सुरु आहे. प्रेक्षक, समीक्षकांपासून सिनेसृष्टीतील कलावंतांपर्यंत सर्वांनीच या चित्रपटावर कौतुकांचा वर्षाव केला. एका ध्येयवेड्या कलाकाराची जीवनकथा पाहून प्रत्येकालाच जगण्याची वेगळी ऊर्जा देणारा हा चित्रपट आहे. ‘मी वसंतराव’ अनेक दिग्गजांच्या पसंतीस उतरत असतानाच पद्मविभूषण शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर (Raghunath Mashelkar) हे देखील चित्रपट पाहून भारावून गेले. “माझं गाणं हे माझंच प्रतिबिंब होतं, आहे..” असे म्हणणारे पंडित वसंतराव देशपांडे हे संगीत रंगभूमीवरचे अतिशय नावाजलेले व्यक्तिमत्व. अशा या दिग्गज, हरहुन्नरी, प्रतिभाशाली शास्त्रीय गायकाचा प्रवास ‘मी वसंतराव’या चित्रपटाच्या माध्यमातून उलगडण्यात आला. (Marathi Movie)

‘वसंतराव देशपांडे यांच्याबद्दल मला फार आदर आहे. राहुलमध्ये वसंतराव आहेत हे आज मला या चित्रपटातून जाणवलं. हा चित्रपट पाहताना प्रत्येक टप्प्यावर नवीन पैलू उलगडत जातात. चित्रपटाची निर्मिती, मांडणी इतकी सुंदर आहे की चित्रपट पाहताना माझ्या डोळ्यात चक्क पाणी होतं. ‘मी वसंतराव’ने मला पुढील वीस वर्षांसाठी काम करण्याची ऊर्जा दिली आहे.’ अशी प्रतिक्रिया डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी दिली आहे.

निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘मी वसंतराव’ हा काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून जिओ स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटात राहुल देशपांडे, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा:

KGF Chapter 2 Box Office Collection: ‘केजीएफ 2’ची पहिल्याच दिवशी बंपर कमाई; यशने स्वत:च्याच चित्रपटाचा मोडला विक्रम

VIDEO: ‘चंद्रमुखी’ची नवी लावणी चुकवणार प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.