AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मराठी फिल्मफेअर पुरस्कार’ सोहळ्यात ‘या’ चित्रपटाने मारली बाजी; पटकावले 7 पुरस्कार

राजकुमार राव, तब्बू, अमृता खानविलकर, नवाजुद्दीन सिद्दीकी, जयदीप अहलावत, सई ताम्हणकर यांसारखे कलाकार या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यात एका मराठी चित्रपटाने एक-दोन नव्हे तर सात पुरस्कार पटकावले आहेत.

'मराठी फिल्मफेअर पुरस्कार' सोहळ्यात 'या' चित्रपटाने मारली बाजी; पटकावले 7 पुरस्कार
marathi filmfare award showImage Credit source: Tv9
| Updated on: Jul 13, 2025 | 11:34 AM
Share

मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये दहावा मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात उषा मंगेशकर यांना मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय आणि महत्त्वपूर्ण योगदानासाठी प्रतिष्ठित जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या दिमाखदार सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना या नामांकनांमध्ये स्थान मिळालं होतं. अभिनेत्री प्राजक्ती माळीचा ‘फुलवंती’ हा सात प्रमुख पुरस्कारांसह या सोहळ्यातील सर्वांत यशस्वी चित्रपट ठरला. त्यापाठोपाठ ‘पाणी’ या चित्रपटाने सहा पुरस्कार पटकावले. सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ यांनी या कार्यक्रमचं सूत्रसंचालन केलं.

महेश मांजरेकर यांना ‘जुनं फर्निचर’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल, तर प्राजक्ता माळी (फुलवंती) आणि वैदेही परशुरामी (एक दोन तीन चार) यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. आदिनाथ कोठारेला ‘पाणी’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर जितेंद्र जोशीला ‘घात’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स चॉइस) पुरस्कार मिळाला. राजश्री देशपांडेला ‘सत्यशोधक’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स चॉइस) म्हणून निवडण्यात आलं.

या पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना उषा मंगेशकर म्हणाल्या, “हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेणाऱ्या सर्वांचे मी आभार मानू इच्छिते. तसंच, आज रात्री पुरस्कार पटकावलेल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन.” त्यांना हा सन्मान प्रदान करणारे सचिन पिळगावकर यांनी गंमतीने विचारलं की, त्यांनी आपली फक्त गायनाची प्रतिभाच का जगासमोर आणली आणि आपली दुसरी प्रतिभा, ‘चित्रकला’, का लपवून ठेवली? यावर उषा म्हणाल्या की, त्या पेंटिंग्ज फक्त त्यांच्यासाठीच होत्या आणि नंतर त्यांनी त्या पेंटिंग्जमधून स्वतःसाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी एक पुस्तकही तयार केलं होतं. डॉ. जब्बार पटेल यांनी यावेळी प्रेक्षकांना सांगितलं की उषाजी कधीकाळी निर्मात्याही होत्या.

सोहळ्या प्रेक्षकांना एक खास सरप्राइजही मिळालं होतं. गायक संजू राठोडने त्याच्या सुपरहिट ‘शेकी शेकी’ गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स दिला. त्याच्यासोबत अमृता खानविलकर, प्रिया बापट, मिताली मायकडे, प्राजक्ता माळी, वर्षा उसगांवकर, सई ताम्हणकर आणि इतर कलाकारही रंगमंचावर सहभागी झाले. याशिवाय डीजे क्रेटेक्स आणि श्रेयस यांनी त्यांचं व्हायरल हिट गाणं ‘तांबडी चांबडी’ सादर करत सोहळ्यात रंगत आली. तर भूषण प्रधान, अदिनाथ कोठारे, संदीप पाठक, हेमंत ढोमे, आणि क्षितिज दाते यांनी त्यांच्या जबरदस्त नृत्याने धमाका केला.

पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी-

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट- पाणी
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आदिनाथ एम. कोठारे – पाणी
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक)- अमलताश (सुहास देसले), घात (छत्रपाल आनंद निनावे)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भूमिका – पुरुष)- महेश मांजरेकर (जुनं फर्निचर)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक)- जितेंद्र जोशी (घात)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिका – स्त्री)- प्राजक्ता माळी (फुलवंती), वैदेही परशुरामी (एक दोन तीन चार)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक)- राजश्री देशपांडे (सत्यशोधक)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (पुरुष)- क्षितिश दाते (धर्मवीर 2)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (स्त्री)- नम्रता संभेराव (नाच गं घुमा)
  • सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम- अविनाश-विश्वजीत (फुलवंती)
  • सर्वोत्कृष्ट गीत- कै. शांता शेळके (सरले सारे – अमलताश)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष)- राहुल देशपांडे (सरले सारे – अमलताश)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (स्त्री)- वैशाली माडे (मदनमंजिरी – फुलवंती)
  • सर्वोत्कृष्ट कथा- छत्रपाल आनंद निनावे (घात)
  • सर्वोत्कृष्ट पटकथा- नितीन दीक्षित (पाणी)
  • सर्वोत्कृष्ट संवाद- महेश मांजरेकर (जुनं फर्निचर)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत- गुलराज सिंग (पाणी)
  • सर्वोत्कृष्ट साउंड डिझाइन- अनमोल भावे (पाणी)
  • सर्वोत्कृष्ट छायाचित्रण- महेश लिमये (फुलवंती)
  • सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन- एकनाथ कदम (फुलवंती)
  • सर्वोत्कृष्ट एडिटिंग- मयूर हरदास आणि आदिनाथ एम. कोठारे (पाणी), नवनीता सेन (घात)
  • सर्वोत्कृष्ट वेशभूषा- मानसी अत्तार्डे (फुलवंती)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक- नवज्योत बांदिवडेकर (घरत गणपती), राहुल रामचंद्र पवार (खडमोड)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरूष- धैर्य घोलप (एक नंबर)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री स्त्री- जुई भागवत (लाइक आणि सब्सक्राइब)
  • जीवनगौरव पुरस्कार- उषा मंगेशकर
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.