Devmanus | ‘देवमाणूस’ डिंपलसोबत विवाहबंधनात, लग्नात दिव्याचा खोडा की सरु आजीचा राडा?

सध्या मालिकेत डिंपल आणि डॉ. अजित कुमार देव उर्फ देवी सिंग यांच्या लग्नाची तयारी सुरु आहे. (Devmanus Ajit Kumar Dev Dimple Wedding)

Devmanus | ‘देवमाणूस’ डिंपलसोबत विवाहबंधनात, लग्नात दिव्याचा खोडा की सरु आजीचा राडा?
देवमाणूस मालिकेतील दृश्य
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 10:54 AM

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus) सध्या रंजक वळणावर आहे. एसीपी दिव्या सिंह एकीकडे भोळ्याभाबड्या माणसांना लुटून त्यांचे खून करणाऱ्या देवीसिंहचा पर्दाफाश करण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे हाच देवीसिंह अर्थात अजितकुमार देव डॉक्टरच्या मुखवट्याआड डिंपलशी लग्नगाठ बांधायला जात आहे. आता डॉक्टर आणि डिम्पीचं लग्न होणार का, की त्यात अडथळे येणार, हे येत्या काही दिवसात पाहायला मिळणार आहे. (Marathi Serial Devmanus Ajit Kumar Dev Dimple Wedding ACP Divya Singh Saru Aaji)

देवीसिंहला पकडल्याचा प्रोमो

एकापाठोपाठ एक खून पाडणाऱ्या देवीसिंहला पोलीस ताब्यात घेणार असल्याचे फोटो नुकतेच व्हायरल झाले होते. ‘देव माणूस’ अर्थात डॉ. अजितकुमार देवची भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये तो तुरुंगात असल्याचे दिसत होते. इतकेच नाही तर त्याच्या अंगावर मारल्याचे वळ देखील दिसत होते. त्यामुळे प्रेक्षक गोंधळात पडले होते. त्यानंतर आलेल्या प्रोमोमध्ये हे देवीसिंहचं स्वप्न होतं, मात्र त्याला जाग आल्यानंतर एसीपी दिव्या दरवाजाबाहेर हातकडी घेऊन उभी असतं, असंही दाखवलं आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात नेमकं काय घडणार, याबाबत प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे.

मालिकेत सध्या काय चाललंय?

सध्या मालिकेत डिंपल आणि डॉ. अजित कुमार देव उर्फ देवी सिंग यांच्या लग्नाची तयारी सुरु आहे. नुकतंच त्यांच्या लग्नाच्या सीनचे शूटिंग पूर्ण झाले. महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ‘देवमाणूस’ मालिकेची टीम बेळगावात शूटिंग करत आहे. डॉक्टर सगळ्यांना घेऊन रिसॉर्टवर आल्याचा बदल कथानकात करण्यात आला आहे.

सध्या एसीपी दिव्या सिंहला डॉक्टरच देवी सिंग असल्याचं समजलं आहे. मात्र पुरेशा पुराव्यांअभावी त्याला पकडलं, तर तो हातावर तुरी देऊन निसटेल. याशिवाय गावकऱ्यांचा रोष पत्करावा लागेल, तो वेगळाच, याची भीती दिव्याला आहे. त्यामुळे ती डॉक्टरला जाळ्यात ओढून गाफील ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. डॉक्टर लग्नाच्या बेडीत अडकण्याआधी आपण त्याला बेड्या घालू, असा इरादा त्याने व्यक्त केला आहे.

डॉक्टरचा फुलप्रूफ प्लॅन

दरम्यान, अजितकुमारनेही आपल्या बाजूने पुरेशी वातावरण निर्मिती केली आहे. त्यामुळे पोलीस त्याला पकडायला आले, तर डिंपलसोबतच मंगल, बाबू, बजा, नाम्या आणि समस्त गावकरी त्याला पाठीशी घालणार यात वाद नाही. त्यामुळे सहानुभूतीचा फटका न बसू देता त्याला बेफिकीर ठेवत पुरावे जमा करण्याचा प्लॅन दिव्या आखत आहे.

सरु आजी राडा करण्याच्या तयारीत

दुसरीकडे, डिम्पलची आजी अर्थात सरु आजीचा या लग्नाला कडकडून विरोध आहे. हा डॉक्टर नाही, तर कम्पाऊण्डर आहे, हा तिचा धोशा सुरुवातीपासून कायम आहे. त्यातच घरच्यांनी दोघांच्या लग्नाची तयारी सुरु केल्याने आजी चिडली आहे. मात्र कितीही तयारी करा, असा राडा करेन, की हे लग्नच होऊ देणार नाही, असा थेट इशाराच तिने दिला आहे. त्यामुळे अजित आणि डिम्पलचं लग्न होणार की नाही, याची उत्सुकता चाळवली गेली आहे. (Devmanus Ajit Kumar Dev Dimple Wedding)

पाहा प्रोमो :

संबंधित बातम्या :

Devmanus | ‘देवमाणूस’ अखेर पोलिसांच्या तावडीत सापडणार? अभिनेत्याने फोटो शेअर करत दिले संकेत!

Devmanus | ‘देवमाणसा’च्या पापाचा घडा भरला, देवी सिंग विरुद्धचे पुरावे ACP दिव्याच्या हाती!

(Marathi Serial Devmanus Ajit Kumar Dev Dimple Wedding ACP Divya Singh Saru Aaji)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.