AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठमोळ्या गायिकेचं मु्स्लीम बॉयफ्रेंडसोबत लग्न, आईने विचारलेला एकच प्रश्न, ‘तुमच्यात शारीरिकसंबंध…’

'अनेकांनी आमच्या नात्याला लव्ह जिहाद म्हटलं पण...', मुस्लीम बॉयफ्रेंडसोबत लग्न केल्यानंतर मराठमोळ्या गायिकेने सांगितली लव्हस्टोरी, लग्नाआधी आईने विचारलेलं, 'तुमच्यात शारीरिकसंबध कसे आहेत?', गायिका कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

मराठमोळ्या गायिकेचं मु्स्लीम बॉयफ्रेंडसोबत लग्न, आईने विचारलेला एकच प्रश्न, 'तुमच्यात शारीरिकसंबंध...'
Shalmali Kholgade
| Updated on: Aug 04, 2026 | 9:12 AM
Share

झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री, गायिका आहेत, ज्यांनी मुस्लीम मुलासोबत लग्न केलं आहे आणि आज आनंदाने आयुष्य जगत आहे. अशात सेलिब्रिटींमधील एक सेलिब्रिटी म्हणजे गायिका शाल्मली खोलगडे. शाल्मली हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, गायिकेने 5 वर्षांपूर्वी फरहान शेख याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर शाल्मली हिने लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले, तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झाले. मुस्लीम बॉयफ्रेंडसोबत लग्न केल्यामुळे शाल्मली हिला ट्रोलिंगचा देखील सामना करण्यात आला. दरम्यान, एका मुलाखतीत शाल्मली हिने त्यांच्या नात्यावर आई – वडिलांची काय प्रतिक्रिया होती आणि आई काय काय विचारलं याबद्दल सर्वकाही सांगितलं…

मुलाखतीत शाल्मली म्हणाली, ‘मी मुस्लीम मुलाच्या प्रेमात पडले आणि त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या आई – वडिलांना जेव्हा आमच्या नात्याबद्दल सांगितलं, तेव्हा त्यांनी देखील विरोध केला नाही. त्यांनी फक्त मला दोन प्रश्न विचारली, मुलगा कसा आहे, त्याचं तुझ्यावर प्रेम आहे की नाही? आणि दुसरा प्रश्न म्हणजे, त्याला मुलं हवी आहेत का? यावर माझं उत्तर होतं नाही… यावर तुमच्या दोघांचं एकमत असलं पाहिजे… आणि मधूनमधून सतत एकमेकांना हा प्रश्न विचारायला हवा, ज्यामुळे दोघांपैकी एकाचं मत बदललं तर नाही ना? हे कळू शकेल..’

आईने विचारलेल्या स्पष्ट प्रश्नाबद्दल देखील शाल्मली हिने मोठा खुलासा केला. शाल्मलीला आईने विचालेलं, ‘तुमच्यात शारीरिक संबंध कसे आहेत?’ शाल्मली म्हणाली, ‘आईने हा प्रश्न विचारल्यानंतर मी शॉक झाले, कारण आमच्यात आधी बोलणं कधीच झालं नव्हतं… मी म्हणाले, ‘आई, काहीही काय विचारलं…’, सगळं ओके आहे… आई मला म्हणालेली, ‘हा सगळा विचार करूनच लग्न कर… कारण लग्न यशस्वी होण्यासाठी हे महत्त्वाचं आहे…’

फरहान याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल शाल्मली म्हणाली, ‘आम्ही 6 वर्ष एकमेकांना डेट केलं. त्यामुळे दोघांच्या आवडी निवडी दोघांना माहिती आहे. त्यात लॉकडाऊनमध्ये तर, एक वर्ष आम्ही एकत्र राहीलो. मी त्यांच्या कुटुंबियांना ओळखते… मी हिंदू असल्यामुळे त्याच्या आईने बहिणीने देखील आमचा कधीच विरोध केला नाही. त्यामुळे आमच्या दोघांच्या कुटुंबियांना काहीच हरकत नव्हती. अडचण फक्त समाजाला होती… अनेकांना आमच्या नात्याला लव्ह जिहाद… असं देखील नाव दिलं. अनेक महिला माझ्या आईला विचारयच्या तुमचा जावई… यावर माझी आई स्वतःच म्हणायची, ‘माझा जावई खूप चांगला आहे आणि त्याचे गुणगान सुरु करायची…’ असं देखील शाल्मली म्हणाली.

शाल्मली हिच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, फार कमी लोकांच्या उपस्थितीत आणि साधेपणाने शाल्मली आणि फरहान यांचं लग्न पार पडलं. 2021 मध्ये शाल्मली आणि फरहान यांनी लग्न केलं. शाल्मली हिने मराठी शिवाय बॉलीवूड, बंगाली, ‌ तेलुगु आणि तमिळ गाण्यासाठी आवाज दिला आहे.

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ