AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mika Singh | मीका सिंग याने केला आकांक्षा पुरी हिच्यासोबतच्या नात्यावर मोठा खुलासा, चाहते हैराण

मीका सिंग हा नेहमीच चर्चेत असतो. मीका सिंग याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मीका सिंग याने नुकताच आता आकांक्षा पुरी हिच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा केलाय. मीका सिंग याचे हे बोलणे ऐकून अनेकजण हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.

Mika Singh | मीका सिंग याने केला आकांक्षा पुरी हिच्यासोबतच्या नात्यावर मोठा खुलासा, चाहते हैराण
| Updated on: Sep 18, 2023 | 4:23 PM
Share

मुंबई : मीका सिंग हा नेहमीच चर्चेत असतो. मीका सिंग (Mika Singh) याच्याबद्दल काही दिवसांपूर्वीच अशी चर्चा होती की, मीका सिंग याची तब्येत खराब झाली. इतकेच नाही तर अचानक तब्येत खराब झाल्याने त्याला शो रद्द करण्याची वेळ आली. सततच्या लाईव्ह शोमुळे त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम झाला. इतकेच नाही तर त्याला बोलण्यासही त्रास होत होता. अचानक शो रद्द (Show cancelled) झाल्याने तब्बल 15 कोटींचे नुकसान मीका सिंग याचे झाले. मीका सिंग याची तब्येत खराब झाल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळाले.

मीका सिंग हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आणि आकांक्षा पुरीच्या रिलेशनमुळे चर्चेत आहे. मीका सिंग याने स्वयंवर ठेवला. मीका सिंग यावर म्हणाला की, मला लग्न करायचे होते आणि मला वाटले की, मला लग्न करण्यासाठी स्वयंवरमध्येच चांगली मुलगी मिळू शकते. त्यासाठीच मी स्वयंवर ठेवला. त्यामध्ये मला आकांक्षा पुरी मिळाली. मात्र, आम्ही एकमेकांसाठी बनलोच नाहीये.

आकांक्षा पुरी आणि माझे क्षेत्र पूर्णपणे वेगळे आहे. मला माझ्या शोनिमित्त जगभरात फिरावे लागले. मी सतत फिरत असतो. मात्र, आकांक्षा पुरी हिचे अजिबातच तसे नाहीये. ती अभिनय क्षेत्रामध्ये काम करत असल्याने तिचे काम एकाच ठिकाणी असते. जर आकांक्षा पुरी ही गायक असती तर तिला माझ्यासोबत फिरत शो देखील करता आले असते.

आकांक्षा पुरी आणि माझे क्षेत्र पूर्णपणे वेगळे असल्याने काही गोष्ट शक्य नाहीयेत. शेवटी तिलाही तिचे करिअर नक्कीच आहे. यामुळे आम्ही दोघांनी एकमत करत पुढे न जाण्याचे ठरवले आहे. आता मीका सिंग याचे हे बोलणे ऐकून अनेकांना मोठा धक्का बसलाय. मीका सिंग याने थेट जाहिर केले की, आकांक्षा पुरी आणि तो कधीच एकसोबत राहणार नाहीत.

मीका सिंग याने हे देखील स्पष्ट केले की, तो आणि आकांक्षा पुरी चांगले मित्र म्हणून कायमय एकसोबत असणार आहेत. काही दिवसांपूर्वीच आकांक्षा पुरी ही बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी झाली. यावेळी चक्क बिग बाॅसच्या घरात ती किस घेताना दिसली. ज्यानंतर अनेकांनी आकांक्षा पुरी हिच्यावर जोरदार टिका केली. फक्त चाहतेच नाही तर सलमान खान यानेही तिचा चांगलाच क्लास लावला.

आकांक्षा पुरी ही कायमच चर्चेत असते. आकांक्षा पुरी ही सोशल मीडियावरही सक्रिय दिसते. आकांक्षा पुरीची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मात्र, मीका सिंह याने आकांक्षा पुरी हिच्याबद्दल केलेल्या या खुलाश्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का हा बसला आहे. आता यावर आकांक्षा पुरी काही भाष्य करते का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.