Video | होळीच्या माहोलात भांगेची नशा, मिथुन चक्रवर्तींच्या सुनेचा ‘बलम पिचकारी’वर डान्स, पाहा व्हिडीओ

हिंदीतली ‘आई कुठे काय करते’ अर्थात ‘अनुपमा’ या मालिकेमध्ये काव्याची भूमिका साकारणारी मदालसा शर्मा-चक्रवर्ती (Madalsa sharma) सध्या खूप चर्चेत आली आहे. मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांची सून असणारी मदालसा तिच्या अभिनय कारकीर्दीत प्रचंड सक्रिय आहे.

Video | होळीच्या माहोलात भांगेची नशा, मिथुन चक्रवर्तींच्या सुनेचा ‘बलम पिचकारी’वर डान्स, पाहा व्हिडीओ
मदालसा शर्मा-चक्रवर्ती

मुंबई : हिंदीतली ‘आई कुठे काय करते’ अर्थात ‘अनुपमा’ या मालिकेमध्ये काव्याची भूमिका साकारणारी मदालसा शर्मा-चक्रवर्ती (Madalsa sharma) सध्या खूप चर्चेत आली आहे. मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांची सून असणारी मदालसा तिच्या अभिनय कारकीर्दीत प्रचंड सक्रिय आहे. मदालसा तिच्या सेट किंवा मालिकेशी संबंधित व्हिडीओ आणि फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच होळीच्या निमित्ताने ‘अनुपमा’चा विशेष भाग चित्रित करण्यात आला. यावेळी मदालसाने होळी सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत (Mithun Chakraborty daughter in law Madalsa sharma dance on Balam pichkari song goes viral).

ग्लॅमरस स्टाईलने चाहते घायाळ

मदालसा शर्मा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. तिच्या सगळ्याच पोस्ट सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात. ‘अनुपमा’ या मालिकेत जरी ती ‘काव्या’ नावाचे नकारात्मक पात्र सकारात असली, तरी तिने आपल्या मोहक शैलीने आणि अभिनयाने सर्वांचे मन जिंकले आहे. यादरम्यान, मदालसाचा एक होळी स्पेशल व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

‘बलम पिचकारी’ गाण्यावर मदालसाचे ठुमके

अलीकडेच मदालसाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती होळी सेलिब्रेशनच्या वेळी ‘बलम पिचकारी’ या गाण्यावर धमाल डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. या व्हिडिओवर आतापर्यंत 34 हजाराहून अधिक लाईक्स आल्या आहेत.

पाहा व्हिडीओ

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, मदलसा शर्मा ‘बलम पिचकारी’ या गाण्यावर ठुमके लगावताना दिसत आहे. त्याच्या हातात एक थंडाईचा ग्लास आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप जास्त चर्चेत आला आहे.

(Mithun Chakraborty daughter in law Madalsa sharma dance on Balam pichkari song goes viral)

भांगेच्या नशेत होळीची शुभेच्छा!

हा व्हिडीओ शेअर करताना मदालसाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जेव्हा तुम्ही भागेंच्या नशेत असता तेव्हा… होळी आहे, प्रेमपूर्वक साजरी करा आणि आपणा सर्वांना होळीच्या शुभेच्छा.’ या व्हिडिओमध्ये, मदालसाची अदा आणि तिच्या डान्स स्टेप चाहत्यांना खूप आवडल्या आहेत. या व्हिडीओवर त्यांनी भरभरून कमेंट करत मदालसाचे कौतुक केले आहे.

मदालसा शर्माने तिचे काही फोटोदेखील इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात ती हातात थंडाईचा ग्लास घेऊन फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. आपल्या व्हिडीओद्वारे लोकांचे लक्ष वेधून घेण्याची मदालसाची ही पहिली वेळ नाही. या आधीही तिने आपल्या आईसोबतच्या डान्सचे काही व्हिडीओही शेअर केले आहेत. त्याचबरोबर वर्कफ्रंटबद्दल बोलायचे, तर  मदालसा शर्मा सध्या अनुपमा या मालिकामध्ये ‘काव्या झवेरी’ची भूमिका साकारत आहे. याआधी मदलसा शर्मा काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिसली होती.

(Mithun Chakraborty daughter in law Madalsa sharma dance on Balam pichkari song goes viral)

हेही वाचा :

Rupali Bhosale | ‘बिग बॉस’मधील टशन ते टीव्हीवरची व्हिलन, बघा संजना रिअल लाईफमध्ये ‘कुठे काय करते!’

Video | शूटिंगवर असलेल्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला भाजायला लागले सुके बोंबील, पाहा काय म्हणाली…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI