श्रीदेवी यांची तिसरी मुलगी कोण? म्हणाल्या होत्या, ‘माझी तिसरी मुलगी…. ‘
Sridevi Daughter: दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या तिसऱ्या मुलीबद्दल फार कमी लोकांना आहे माहिती, मृत्यूपूर्वी म्हणाल्या होत्या, 'माझी तिसरी मुलगी....', निधनानंतर देखील सर्वत्र श्रीदेवी यांच्या खासगी आयुष्याची चर्चा... चाहते देखील झाले अवाक्

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पती बोनी कपूर आणि मुलगी जान्हवी कपूर, खुशी कपूर यांच्याबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. 24 फेब्रुवारी 2018 मध्ये श्रीदेवी यांनी अखेरचा श्वास घेतला. तेव्हा श्रीदेवी 54 वर्षांच्या होत्या. आज श्रीदेवी जिवंत नसल्या तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील श्रीदेवी यांची चर्चा रंगली आहे. त्यामागे कारण देखील तसं आहे. श्रीदेवी यांच्या कुटुंबाबद्दल सर्वांना माहिती आहे. पण त्यांच्या तिसऱ्या मुलीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. एका मुलाखतीत खुद्द श्रीदेवी यांनी तिसऱ्या मुलीबद्दल मोठा खुलासा केला होता.
2017 मध्ये श्रीदेवी ‘मॉम’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आल्या होत्या. सिनेमात अभिनेत्री सजल अली हिने श्रीदेवी यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. श्रीदेवी म्हणाल्या, ‘सजल माझ्या तिसऱ्या मुलीप्रमाणे आहे. माझी आणखी एक मुलगी आहे….’ असं म्हणत श्रीदेवी यांनी सजल हिला तिसरी मुलगी म्हटलं होतं.
View this post on Instagram
दरम्यान, श्रीदेवी यांच्या निधनानंतर देखील सजल हिने दुःख व्यक्त केलं होतं. ‘मी अद्यापही दुःखात आहे. मी माझ्या आईला पुन्हा गमावलं आहे… असं वाटत आहे. दुबईत अवॉर्ड सोहळ्यात मी सामिल होऊ शकली नव्हती. तेव्हा त्यांनी मला एक मेसेज केला होता, ‘मला तुझी खूप आठवण येत होती बेटा..’ असं देखील सजल म्हणाली होती.
पुढे सजल म्हणाली होती, ‘तो श्रीदेवी यांचा शेवटचा मेसेज होता. आम्ही फोनवर देखील खूप गप्पा मारायचो… पण जेव्हा निधनापूर्वी मला फोन केला होता, तेव्हा मी बोलू शकलो नव्हतो. कारण मी शुटिंगमध्ये व्यस्त होती.’ आज या गोष्टीला अनेक वर्ष झाली आहेत. पण तरी देखील श्रीदेवी आणि त्यांच्याबद्दलच्या गोष्टी कोणी विसरू शकलेलं नाही.
सजल अली जेव्हा श्रीदेवी यांच्यासोबत ‘मॉम’ सिनेमाची शुटिंग करत होती. तेव्हा अभिनेत्रीच्या आईचं निधन झालं होतं. त्यानंतर काही महिन्यात श्रीदेवी यांनी देखील अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे सजल हिला मोठा धक्का बसला. सांगायचं झालं तर, सजल हिची जान्हवी – खुशी यांच्यासोबत देखील चांगली मैत्री आहे.
सजल पाकिस्तान येथील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर देखील सजल कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. 2021 मध्ये सजल हिने बॉयफ्रेंड अहद रजा मीर याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर देखील सजल तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती.
