AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prajakta Koli | ‘तो आता माझा एक्स बॉयफ्रेंड’ म्हणत प्राजक्ता कोळीने दिली ‘गुड न्यूज’

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्राजक्ता कोळी सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. प्राजक्ताने बॉयफ्रेंड वृषांक खनलशी साखरपुडा केला असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Prajakta Koli | 'तो आता माझा एक्स बॉयफ्रेंड' म्हणत प्राजक्ता कोळीने दिली 'गुड न्यूज'
Prajakta KoliImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 18, 2023 | 10:03 AM
Share

मुंबई | 18 सप्टेंबर 2023 : सोशल मीडिया वापरणाऱ्यांना ‘मोस्टली सेन’ हे नाव चांगलंच माहीत असेल. प्रसिद्ध युट्यूबर आणि इन्फ्लुएन्सर प्राजक्ता कोळीच्या सोशल मीडिया अकाऊंटचं नाव ‘मोस्टली सेन’ असं आहे. प्राजक्ताने युट्यूबर म्हणून करिअरची सुरुवात केली. हळूहळू तिला इतकी लोकप्रियता मिळाली, की तिने बॉलिवूडपर्यंत आपला यशस्वी प्रवास केला. वरुण धवन आणि कियारा अडवाणीच्या ‘जुग जुग जियो’ या चित्रपटात तिने भूमिका साकारली होती. आता प्राजक्ता तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. प्राजक्ताने तिच्या बॉयफ्रेंडशी साखरपुडा केला आहे. याबद्दलची माहिती खुद्द तिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत दिली. प्राजक्ता आणि वृषांक हे गेल्या 13 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आता दोघं आपल्या नात्याच्या नवीन टप्प्यासाठी खूप उत्सुक आहेत.

प्राजक्ता कोळीने बॉयफ्रेंड वृषांक खनलसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘वृषांक.. आता माझा एक्स बॉयफ्रेंड झाल आहे.’ यासोबतच तिने तिच्या हातातील अंगठी या फोटोंमध्ये दाखवली आहे. तिच्या या पोस्टवर कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेते अनिल कपूर, वरुण धवन, मनीष पॉल, रोहित सराफ, मुक्ती मोहन, मिथिला पालकर, हृता दुर्गुळे, श्रिया पिळगावकर, प्रिया बापट, सारा तेंडुलकर यांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत या नवीन प्रवासाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Prajakta Koli (@mostlysane)

कोण आहे प्राजक्ता कोळी?

सोशल मीडियावर प्रसिद्ध कंटेट क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्सच्या यादीत प्राजक्ता कोळीचं नाव आवर्जून घेतलं जातं. मोस्टली सेन या नावाने ती सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. प्राजक्ता तिच्या मनोरंजक कंटेटसाठी ओळखली जाते. इन्स्टाग्रामवर तिचे 7.9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तिने रेडिओ स्टेशनमध्ये इंटर्नशिप करत आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर 2015 मध्ये तिने स्वत:चा युट्यूब चॅनल लाँच केला. 2020 मध्ये तिने ‘खयाली पुलाव’ या शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं होतं. मात्र नेटफ्लिक्स या प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘मिसमॅच्ड’ या वेब सीरिजमुळे तिला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. यामध्ये अभिनेता रोहित सराफसोबतच्या तिच्या जोडीला चाहत्यांकडून खूप लोकप्रियता मिळाली.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.