.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मौनी रॉयच्या घटस्फोटामागचं खरं कारण समोर; लग्नाच्या 4 वर्षांनंतर पती सूरजने..

अभिनेत्री मौनी रॉय तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आली आहे. मौनीने पती सूरज नांबियारला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं असून तिने त्याच्यासोबतचे फोटोसुद्धा काढून टाकले आहेत. तर सूरजने थेट इन्स्टाग्राम अकाऊंटच बंद केलं आहे.

मौनी रॉयच्या घटस्फोटामागचं खरं कारण समोर; लग्नाच्या 4 वर्षांनंतर पती सूरजने..
Mouni Roy and Suraj NambiarImage Credit source: Instagram
| Updated on: May 13, 2026 | 10:26 AM
Share

‘नागिन’ फेम अभिनेत्री मौनी रॉय आणि तिचा पती सूरज नांबियार यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. लग्नाच्या चार वर्षांनंतर या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे. मौनी आणि सूरज यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर चाहत्यांनी घटस्फोटाचा अंदाज वर्तवला आहे. इतकंच नव्हे तर मौनी आणि सूरज गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे राहत असल्याचंही समजतंय. यादरम्यान मौनी आणि सूरज यांच्यात नेमकं कुठे बिनसलं, असा प्रश्न चाहत्यांकडून विचारला जात आहे. ‘एबीपी न्यूज’च्या ‘सास बहू और साजिश’ या शोमध्ये सूत्रांच्या हवाल्याने मौनी आणि सूरजच्या घटस्फोटामागचं नेमकं कारण सांगितलं गेलं आहे. सूरजने मौनीची फसवणूक केल्याचं वृत्त या शोमध्ये दिलं आहे.

सूरजने मौनी रॉयची नात्यात फसवणूक केली आणि त्याने तिच्या पैशांचाही वापर केला, असं त्यात म्हटलं गेलं आहे. म्हणूनच दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला असून गेल्या काही दिवसांपासून ते वेगवेगळे राहत आहेत. मौनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सूरजसोबतचे सर्व फोटोसुद्धा काढून टाकले आहेत. तर सूरजने या चर्चांदरम्यान थेट त्याच इन्स्टाग्राम अकाऊंट बंद केला आहे. या चर्चांवर अद्याप दोघांकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.

View this post on Instagram

A post shared by mon (@imouniroy)

सूरज हा प्रसिद्ध बँकर आहे. तसंच त्याचा बिझनेससुद्धा आहे. 2019 मध्ये सूरज आणि मौनी यांची दुबईत एका पार्टीदरम्यान भेट झाली होती. या भेटीदरम्यान दोघांची चांगली मैत्री झाली आणि नंतर त्याचं प्रेमात रुपांतर झालं. सूरज आणि मौनी यांनी 2022 मध्ये लग्न केलं होतं. गोव्यात मल्याळम आणि बंगाली अशा दोन्ही पद्धतीनुसार धूमधडाक्यात विवाहसोहळा पार पडला होता. आता घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मौनीची अत्यंत जवळची मैत्री आणि अभिनेत्री दिशा पटानीनेही सूरज नांबियारला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे.

मौनी ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. मौनीने 2006 मध्ये ‘क्योंकी सास भी कभी बहु थी’ या मालिकेतून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘कस्तुरी’, ‘देवों के देव.. महादेव’, ‘झलक दिखला जा 7’, ‘नागिन’ यांसारख्या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर