मौनी रॉयचा नवरा कोण आणि त्याची संपत्ती बघा, आकडा ऐकून आकडी येईल

मौनी रॉयचा नवरा कोण आणि त्याची संपत्ती बघा, आकडा ऐकून आकडी येईल
मौनी रॉय, सूरज नांबियार

अभिनेत्री मौनी रॉय आज लग्नबंधनात अडकली. तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत तिने लग्नगाठ बांधली. तिचा पती सूरज नांबियार याची संपत्ती किती आहे याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. जाणून घेऊयात...

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jan 27, 2022 | 4:39 PM

मुंबई : बॉलिवूड सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या टॉप अभिनेत्रींपैकी एक असणारी मौनी रॉय (Mouni Roy) आज लग्नबंधनात अडकली. तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत (Suraj nambiar) तिने लग्नगाठ बांधली. तिचा पती सूरज नांबियार कोण आहे? त्याची संपत्ती किती आहे? याबाबत सर्वत्र चर्चा होतेय. सूरज मूळचा बंगळुरुचा आहे. पण सध्या तो दुबईत असतो. त्याचा तिकडे बिझनेसही आहे. त्यामुळे त्याची संपत्तीही जास्त आहे. 2019 ला सूरज आणि मौनी यांची दुबईत एका पार्टीदरम्यान भेट झाली. दोघांची मैत्री झाली आणि नंतर ती मैत्री प्रेमात रूपांतरित झाली. मग दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाची आज सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतेय. त्याच्या लग्नाचे फोटो शेअर केले जात आहे आणि त्यांच्या बावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

सूरज नांबियार याची संपत्ती

मौनी रॉय वर्षभरात 1-2 कोटींची कमाई करते. तिची संपत्ती 10 कोटी इतकी आहे. तर सूरज नांबियार हा बिझनेसमन आहे. त्यामुळे त्याची संपत्तीही खूप आहे. 50 कोटीहून अधिक असल्याचं कळतंय. बंगळुरुत 6 ऑगस्टला एका जैन कुटुंबात सूरजचा जन्म झाला. सूरजचं प्राथमिक शिक्षण जैन इंटरनॅशनल रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये झालं. नंतर 2008 मध्ये त्याने बेंगळुरूच्या आर. व्ही. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंग केलं. सूरज हा सध्या दुबईत राहत असला तरी त्याचा भाऊ नीरज हा पुण्यातील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा सह-संस्थापक आहे.

मौनी रॉयची इन्स्टाग्राम पोस्ट

मौनीने आपल्या लग्नात साऊथ इंडियन लूक केलेला पहायला मिळाला. या वेगळ्या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसतेय. आपल्या लग्नाचे फोटो तिने इन्स्टाग्राम शेअर केले आहेत. ‘मला माझा स्वप्नवत जोडीदार सापडला. आज आम्ही एकमेकांचा हात हातात घेऊन कुटुंबियांच्या आणि मित्रमैत्रिणीच्या साक्षीने लग्न केलं. आता आम्हाला तुमच्या आशिर्वादाची गरज आहे’, असं मौनीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मौनी आणि सूरज यांचं हे शाही लग्न एक बीच डेस्टीनेशन वेडिंग आहे. या दोघांनीही दुबईत नव्हे तर गोवा डेस्टिनेशन वेडिंग करण्याचं ठरवलं. या लग्न सोहळ्याला या दोघांच्या कुटुंबातील लोक आणि त्यांचे मोजके मित्रमंडळी उपस्थित होते.

लग्नानंतर उद्या (28 जानेवारी) एक डान्स फंक्शन असेल. ज्यामध्ये मौनी रॉयचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील काही मोजकी मंडळीच उपस्थित असतील, अशी माहिती आहे. या रिसेप्शनलाही मोजक्या लोकांनाच आमंत्रण असल्याचं कळतंय.

संबंधित बातम्या

लाखो मुलांच्या हृदयाचा चक्काचूर, मौनी रॉयचं शुभमंगल सावधान, विवाहातला साऊथ इंडियन लूक बघाच!

‘माझ्या ** ची साईज देव घेतोय’, टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीच्या विधानावरून वाद, मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्याचा कारवाईचा इशारा

Shehnaaz Gill Birthday : बिग बॉसमध्ये एन्ट्री, सिद्धार्थसोबत मैत्री, पंजाबची कतरिना, वाचा शहनाझ गिलचे खास व्यक्तिमत्वाचे पैलू

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें