REVIEW : कबीर सिंगमधील शाहिदची लव्ह स्टोरी कशी आहे?

'हैदर', 'उडता पंजाब' नंतर 'कबीर सिंग'मध्ये शाहिदने त्याच्या करिअरमधला बेस्ट परफॉर्मन्स दिला आहे. शाहिदने सनकी प्रेमीची ही भूमिका अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने साकारली आहे.

REVIEW : कबीर सिंगमधील शाहिदची लव्ह स्टोरी कशी आहे?
Follow us
| Updated on: Jun 21, 2019 | 2:08 PM

बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक लव्हस्टोरींनी रसिकांच्या मनावर भुरळ घातली आहे. हा सिनेमातही लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे.  पण सिनेमाच्या मांडणीत नाविन्याचा अभाव असल्याचे प्रकर्षाने जाणवते. तुम्ही ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करता, तिला मिळवण्यासाठी तुम्ही कुठल्याही थराला जाऊ शकता. पण अचानक ती व्यक्ती तुम्हाला सोडून गेली की, तिच्या आठवणीत तुम्ही सगळं विसरुन कसं रममाण होता, याचा प्रत्यय देणारा सिनेमा म्हणजे ‘कबीर सिंग’…

सुपरहिट तेलगू फिल्म ‘अर्जुन रेड़्डी’ या चित्रपटाचा ‘कबीर सिंग’ हा ऑफिशिल रिमेक आहे. अर्जुन रेड्डी या सिनेमात विजय देवारकोंडाने मुख्य भूमिका निभावली आहे. तर कबीर सिंग सिनेमात शाहिद कपूरने मुख्य भूमिका साकरली आहे. हा सिनेमा बघताना डार्क, पावरफुल, सनकी, कॉम्पिलिकेटेड, प्रेमात आकंठ बुडालेला ‘कबीर सिंग’ शाहिदने काय ताकदीने रंगवला आहे, याचा अंदाज तुम्हाला येतो.

काही भूमिका फक्त शाहिदच करु शकतो

‘हैदर’, ‘उडता पंजाब’ नंतर ‘कबीर सिंग’मध्ये शाहिदने त्याच्या करिअरमधला बेस्ट परफॉर्मन्स दिला आहे. शाहिदने सनकी प्रेमीची ही भूमिका अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने साकारली आहे.  या भूमिकेवरुन काही ठरावीक भूमिका आहेत ज्या फक्त शाहिदच करु शकतो असा पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. कॉमेडी, इमोशन्स, अक्शन, संगीत असलेला ‘कबीर सिंग’ एक परिपूर्ण मसाला चित्रपट आहे, मात्र जर हा सिनेमा एडिटींगमध्ये आटोपता घेतला असता, तर नक्कीच सिनेमाचा अजून प्रभाव पडला असता.

कथेची सुरुवात

दिल्लीच्या एका मेडीकल कॉलेजचा विद्यार्थी कबीर उर्फ राजधीर सिंग(शाहिद कपूर)ची कथा आहे. कबीर कॉलेजमध्ये टॉपर असतो, फुटबॉल चॅम्पियन असतो पण त्याचं आपल्या रागावर अजिबात नियंत्रण नसतं. कॉलेजमधील त्याची ज्युनिअर प्रीती(कियारा अडवाणी)वर कबीरचा जीव जडतो. प्रीती फक्त माझीच आहे, तिच्यावर कोणी वाईट नजर टाकली, तिची रॅगिंग केली तर कोणाची खैर नाही असा फतवाच कबीर कॉलेजमध्ये काढतो. कबीर आणि प्रीतीचं एकमेकांवर जीवापाड प्रेम असतं. प्रीतीची सावली बनून कबीर मोठा सर्जन बनतो तर प्रीतीलाही मेडिकल पास होण्यास मदत करतो. कबीरचा शीघ्रकोपी स्वभाव आणि घरच्यांच्या दबावामुळे प्रीती कबीरची साथ सोडते. यामुळे कबीर पूर्णपणे खचतो. दारु, ड्गग्जच्या आहारी गेलेल्या कबीरला त्याचे वडील(सुरेश ओबेरॉय)ही त्याला घराबाहेर हाकलतात. आता कबीर स्वत:ला सावरतो का ?, प्रीती त्याच्या आयुष्यात परत येते का ? कबीरचं पुढे काय होतं ? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ‘कबीर सिंग’ बघावा लागेल.

सेम टू सेम

संदीप रेड्डी वांगानेच ‘अर्जुन रेड्डी’चं दिग्दर्शन केलं होतं. त्यामुळे कबीर सिंगमध्ये त्याने अर्जुन रेड्डीची फ्रेम अन फ्रेम कॉपी केलीये. दृश्य, संवाद अहो एवढचं काय तर काही सीन्समध्ये तर कपडेही अगदी सेम आहेत. एवढा सगळा मामला सेम टु सेम असला तरी दिग्दर्शक म्हणून संदीपने सिनेमावर शेवटपर्यंत पकड ठेवली आहे. कबीरचं कॉलेज लाईफ असो वा सर्जन झाल्यानंतरचं लाईफ ही सगळी वातावरण निर्मिती संदीपनं उत्तम केली आहे. प्रीती आयुष्यातून गेल्यावर एकाकी पडलेला कबीर दारु, ड्गग्ज, सेक्सच्या आहारी जातो, हिंसक बनतो. छोट्या छोट्या गोष्टींवर त्याचा मूड स्विंग होतो. 24 तास फक्त दारुच त्याचा सोबती असते. नशेतच तो अनेक सर्जरीही करतो. हे सगळं संदीपने ठळकपणे दाखवलं आहे.

डार्क सिनेमा हॅपी एन्डिंग

विशेष म्हणजे हा सिनेमा बघतांना सगळ्यांनाच आपले कॉलेजचे दिवस आठवतील. तसेच आयुष्यात शीवा आणि कमालसारखे मित्र असावेत असं वाटू लागेल. कबीरचा हा संपूर्ण जीवनप्रवास दाखवण्यासाठी तबब्ल तीन तासांचा अवधी दिग्दर्शकाने घेतला आहे. सिनेमाच्या लांबीवर संदीपनं कात्री लावायला हवी होती. कारण शेवटच्या तीस मिनिटात तर बऱ्याच ठिकाणी हा सिनेमा संपेल असं वाटू लागतं, पण सिनेमा काही संपत नाही. ‘कबीर सिंग’साठी हीच गोष्ट घातक ठरु शकते. सिनेमातील काही अनावश्यक प्रसंग टाळले असते तर बरं झालं असतं.

या सिनेमातील मला सगळ्यात जास्त खटकलेली गोष्ट म्हणजे याचा शेवट. संपूर्ण सिनेमा डार्क असतांना याचं झालेलं हॅपी एन्डिंग निव्वळ फिल्मी वाटतं. हे कशासाठी? का? हे प्रश्न सिनेमा संपल्यावरही मनात घोळत राहतात.

शाहिदच्या करिअरमध्या सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स

कबीर सिंगच्या भूमिकेत शाहिद कपूरने कमाल केली आहे. हा त्याच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स म्हटला तर वावगं ठरणार नाही. छोट्या छोट्या गोष्टीवर शाहिदने घेतलेली मेहनत आपल्याला दिसते. कधी या पात्राची आपल्याला चीड येते तर कधी दया. याचं सगळं श्रेय शाहिदला जातं. कियारा संपूर्ण सिनेमात खुप गोड दिसली आहे. तिच्या वाट्याला संवाद जरी कमी असले तरी तिने फक्त असण्यानेच आपली दखल घ्यायला भाग पाडली आहे. शाहिद आणि कियाराची केमिस्ट्री भन्नाट जमली आहे. शाहिदच्या मित्र शीवाच्या भूमिकेत सोहम मजुमदारनं भन्नाट काम केलंय. त्याचा कॉमिक टायमिंगही उत्तम आहे. सुरेश ओबेरॉय, कामिनी कौशल, निकित्ता दत्ता, अर्जन बाजवा यांनी छोट्या भूमिकेतही आपली छाप सोडलीये. सिनेमातील ‘बेखयाली’ हे गाणं आधीच हिट झालंय. पण हे गाणं सोडलं तर सिनेमातील एकही गाणं लक्षात राहत नाही. ही सिनेमातील अजून एक उणीव म्हणावी लागेलं. मात्र रवी कें.चंद्रनची सिनेमॅटोग्राफी लाजवाब आहे.

एकूणच काय तर शाहिदचा जबरदस्त अभिनय, शाहिद-कियाराची सिझलिंग केमिस्ट्री या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे. पण सिनेमाची लांबी कमी करुन सिनेमाचा फिल्मी शेवट टाळला असता तर नक्कीच हा सिनेमा अजून चांगला झाला असता असं मला वाटतं.

टीव्ही 9 मराठीकडून मी ‘कबीर सिंग’ सिनेमाला देतोय तीन स्टार्स   

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.