AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Diaries 26/11 Review | मोहित रैनाच्या अभिनयाची चर्चा, 26/11ची दुसरी बाजू, जाणून घ्या कसा आहे Mumbai Diaries 26/11…

26 नोव्हेंबर 2008 ही तारीख, कोणताही देशवासी विसरू शकत नाही. हीच तारीख आहे जेव्हा काही दहशतवाद्यांनी मुंबई हादरवून टाकली होती. काही चित्रपटांमध्येही ही घटना वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे. त्याचवेळी, 'मुंबई डायरीज'मध्ये यावेळी डॉक्टरांच्या दृष्टिकोनातून ही घटना दाखवण्यात आली आहे.

Mumbai Diaries 26/11 Review | मोहित रैनाच्या अभिनयाची चर्चा, 26/11ची दुसरी बाजू, जाणून घ्या कसा आहे Mumbai Diaries 26/11...
मोहित रैना
| Edited By: | Updated on: Sep 09, 2021 | 10:59 AM
Share

वेब सीरीज : मुंबई डायरीज 26/11

OTT : Amazon Prime Video

दिग्दर्शक : निखिल अडवाणी आणि निखिल गोन्साल्विस

कलाकार : मोहित रैना, कोंकणा सेन शर्मा, मृण्मयी देशपांडे, नताशा भारद्वाज, सत्यजित दुबे, प्रकाश बेलावाडी, श्रेया धनवंत्री, इतर

26 नोव्हेंबर 2008 ही तारीख, कोणताही देशवासी विसरू शकत नाही. हीच तारीख आहे जेव्हा काही दहशतवाद्यांनी मुंबई हादरवून टाकली होती. काही चित्रपटांमध्येही ही घटना वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे. त्याचवेळी, ‘मुंबई डायरीज’मध्ये यावेळी डॉक्टरांच्या दृष्टिकोनातून ही घटना दाखवण्यात आली आहे. या घटनेनंतर मुंबईच्या डॉक्टरांची स्थिती कशी होती, तर रुग्णांची संख्या थांबत नव्हती, दुसरीकडे त्यांच्या स्वतःच्या समस्याही सुरू होत्या.

अभिनय आणि दिग्दर्शन

‘मुंबई डायरीज 26/11’मध्ये मोहित रैना, कोंकणा सेन शर्मा, मृण्मयी देशपांडे, नताशा भारद्वाज, सत्यजित दुबे, प्रकाश बेलावाडी, श्रेया धन्वंतरी यांच्यासह अनेक महत्त्वाच्या भूमिका आहेत. मोहित रैनाने डॉक्टरांच्या भूमिकेत जबरदस्त कामगिरी केली आहे, तर इतर कलाकारांनीही आपापल्या पात्रांना न्याय दिला आहे. मात्र, निखिल अडवाणी आणि निखिल गोन्साल्विसचे दिग्दर्शन थोडे हलके झाल्यासारखे वाटते. मालिकेत असे अनेक सीन्स आहेत, जे दिग्दर्शकांकडून सुधारले जाऊ शकले असते.

काय आहे विशेष?

‘मुंबई डायरी 26/11’ मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, ज्यामुळे ही सीरीज खूप खास बनते. जसे की, वैद्यकीय उपकरणे साथ देत नसतील, संपली असतील तर काय करावे…, आणीबाणीच्या काळात पोलिसांच्या तपासाची गरज काय…, त्यात काय चूक आहे? वाईट परिस्थितीतही व्यक्तीला कसे वाचवावे… इ. यासह, वेब सीरीजमधील माध्यमांचे आंधळेपणाने कव्हरेज करण्याची स्पर्धा देखील हुबेहुबे दाखवण्यात आली आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील होऊ शकते. अनेक किरकोळ मुद्द्यांची काळजीपूर्वक काळजी घेतली गेली असली, तरी मालिकेची लांबी काही वेळा त्याची गती मोडून काढताना दिसते. काही दृश्ये अपूर्ण वाटतात, जिथे पाहताना प्रेक्षकांना आश्चर्य वाटते की, या नंतर पुढे काय होणार आणि काय घडणे आवश्यक होते.

‘मुंबई डायरीज 26/11’ चे सुमारे 35-40 मिनिटांचे 8 भाग आहेत. ही वेब सीरीज ज्या थीमवर आणि जशा पद्धतीने दाखवली गेली आहे, अशा परिस्थितीत ती नक्कीच पाहण्यासारखी आहे. ही सीरीज पाहिल्यानंतर डॉक्टरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल, असे म्हणणेही चुकीचे ठरणार नाही.

मोहित रैनाने जागवल्या वडिलांच्या आठवणी

या सीरीजच्या निमित्ताने आणि डॉक्टरांचा मुलगा असल्याने आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देत मोहित रैना (Mohit Raina) म्हणाला, ‘एक मुलगा म्हणून मी खूप भाग्यवान ठरलो आहे, कारण माझे वडील डॉक्टर आहेत. ते काश्मीरमधील गावांच्या बाहेरील भागात सेवेवर होते. दिवसाच्या अखेरीस, जेव्हा ते घरी येत असत, तरी प्रत्येक रात्री आपत्कालीन परिस्थितीमुळे आमचे दार अनेक वेळा ठोठावले जायचे आणि त्यांना पुन्हा कोणाला तरी पहायला जावे लागत असे. दिवसाच्या अखेरीस देखील ते रुग्णांना तपासायला आणि त्यांना मदत करायाला नेहमीच सज्ज असत.’

वडिलांकडून मिळाली प्रेरणा

‘ते जेव्हा परत येत, तेव्हा मला त्यांच्या हावभावावरून समजत असे की, ते रुग्णाला वाचवू शकले आहेत आणि त्यांच्या संपूर्ण क्षमतेनुसार ते त्याला मदत करू शकले आहेत. आणि म्हणून मला वाटते की मी आधीपासूनच फ्रंटलाइन वर्कर्सची कामाप्रतीची उत्कटता अनुभवू शकलो आणि त्यांच्याकडून प्रेरित होऊ शकलो, हे माझे सद्भाग्य आहे आणि कदाचित हेच या सीरीजमध्ये देखील उमटले आहे, ज्याचा भाग बनून मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो आहे’, असे अभिनेता मोहित रैना म्हणाला.

हेही वाचा :

‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’च्या बहुप्रतीक्षित पोस्टरचे अनावरण, सलमान खानच्या विरुद्ध दिसणार आयुष शर्मा!

‘जिस दिन तुमको देखेगी नजर, जाने दिल पर होगा क्या असर…’, पाहा ‘कबीर सिंग’ फेम वनिता खरातच्या घायाळ करणाऱ्या अदा!

आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.