AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडील मुंबईचे डॉन, अभिनेत्याची पत्नी लढवणार महापालिका निवडणूक

महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे... त्यामुळे उमेदवारांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळालेला आहे... यंदाच्या निवडणुकीत अभिनेत्याची पत्नी रिंगणात उतरणार आहे, त्यांचे वडील मुंबईचे डॉन आहेत...

वडील मुंबईचे डॉन, अभिनेत्याची पत्नी लढवणार महापालिका निवडणूक
योगिता गवळी इन्स्टाग्राम
| Updated on: Nov 15, 2025 | 12:18 PM
Share

Municipal Corporation Election Reservation: महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. कोणत्या वार्डमध्ये कोणत्या प्रवर्गाचा उमेदवार असणार आहे हे देखील स्पष्ट झालं आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर उमेदवार देखील तयारीला लागले आहेत. 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील उमेदवारांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळालेला आहे. आता महापालिका निवडणुकीसाठी फक्त राजकारणी व्यक्ती नाही तर, सिनेविश्वातील मंडळी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे…

यंदाच्या महापालिका निवडणुकासाठी अभिनेता अभिनेता अक्षय वाघमारे याची पत्नी योगिता गवळी यांनी देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  निवडणुकीत उतरणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत योगिता गवळी यांनी मोठी घोषणा केली आहे.

इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत योगिता गवळी म्हणाल्या, नुकतीच “बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या”निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली , त्यामुळे आपल्या भायखळ्याच्या विकासासाठी मी “योगिता अरुणभाई गवळी “आपल्या भायखळातील प्रभाग “क्रमांक २०७ “ह्या प्रभागातून इच्छुक उमेदवार म्हणून रिंगणात उतरत आहे.

‘जसे २००४ साली आपण विधानसभेच्या निवडणूकित “डॅडीं”वर प्रेम केलेत आणि मतदानीरूपी आशीर्वाद दिलेत ,त्याच आशीर्वादाची आता पुनरावृत्ती करण्याची गरज आहे. डॅडी यांनी जी जनतेची कामे केली आणि सेवा केली तोच अजेंडा मी पुढे घेऊन जनतेची सेवा करण्याचा वारसा जपणार आहे. मी एक उमेदवार म्हणून नाही तर आपल्या भायखळ्याच्या प्रत्येक घरातील सदस्य म्हणून मला आपलं काम करायचे आहे.

“ नगरसेवक”हे एक पद म्हणून न बघता तर एक जबाबदारी म्हणून मी त्याकडे पाहण्याचा प्रयत्न करेन. राजकारण न करता “समाजकारण”करण्याचा हा आमच्या परिवाराचा नेहमीच कल राहिला आहे . त्यामुळे आपण “मला आपली सेवा करण्याची एक संधी द्याल जी आशा बाळगते.” तुमची भायकळ्याची मुलगी… योगिता अरुणभाई गवळी… जय शंभो नारायण…’ अशी पोस्ट योगिता गवळी यांनी केली आहे.

योगिता गवळी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्या अरुण गवळी यांच्या कन्या आहे. तर योगिता गवळी यांनी अभिनेता अक्षय वाघमारे याच्यासोबत लग्न केलं आहे. अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांनी 2019 मध्ये लग्न केलं.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.