Drugs Case | ड्रग्ज प्रकरणी जामीन मंजूर, कागदपत्रांची पूर्ती करून भारती-हर्ष घरी जाण्यासाठी रवाना

ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:16 PM, 23 Nov 2020

मुंबई : ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiyaa) यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे (NDPS Court grants Bail). किल्ला कोर्टाने 15000 रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे. कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून भारती आणि हर्ष घरी जाण्यासाठी रवाना झाले आहेत. यावेळी हर्ष आणि भारतीने माध्यमांच्या कॅमेरांना हात देखील दाखवला. अटक झाल्यानंतर भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांनी जामिनासाठी किल्ला कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या या जामीन अर्जावर आज (23 नोव्हेंबर) सकाळपासून सुनावणी सुरू होती (Mumbai NDPS Court grants Bail to Comedian Bharti Singh and her husband Harsh Limbachiyaa).

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी (Drugs Case) एनसीबी अधिकाऱ्यांनी भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना अटक केली होती. कोर्टासमोर हजर केले असता दोघांनाही 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायलयीन कोठडी सुनावल्यानंतर हर्षची तळोजा तर, भारतीची कल्याण जेलमध्ये रवानगी करण्यात आली. दोघांवरही कंसंप्शनचे चार्जेस लावण्यात आले आहेत. एनडीपीएस कायदा 1985, कलम 20 अ, 20 ब 2 आणि 27 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनीही जामिनासाठी किल्ला कोर्टात अर्ज दाखल केला होता.

(Mumbai NDPS Court grants Bail to Comedian Bharti Singh and her husband Harsh Limbachiyaa)

काय आहे प्रकरण?

एनसीबीने शनिवारी (21 नोव्हेंबर) खार दांडा येथे कारवाई केली होती. या ठिकाणाहून एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे 15 बॉटल एल. एस. डी. हे ड्रग आणि 40 ग्राम गांजासह नेट्राझेपम हे ड्रग्स स्वरूपातील औषध ही सापडले आहे. या ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या व्यक्तीच्या चौकशीत कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष यांचे नाव उघडकीस आले.

(Mumbai NDPS Court grants Bail to Comedian Bharti Singh and her husband Harsh Limbachiyaa)

यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी भारती हिच्या घरी धाड टाकली असता, तिच्या घरी 86.5 ग्राम गांजा सापडला. भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष या दोघांनीही ते गांजा घेत असल्याची कबुली दिली आहे. यानंतर भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाला एनडीपीएस कायद्यानुसार अटक करण्यात आली. त्याच प्रमाणे इतर कारवाईत गुन्हा क्रमांक 33/20 मध्ये एनसीबीने मोठ्या प्रमाणात एमडी हे ड्रग्स जप्त केले आहे. एनसीबीने दोन फरार गुन्हेगारांना अटकही केली आहे (Mumbai NDPS Court grants Bail to Comedian Bharti Singh and her husband Harsh Limbachiyaa).

हर्षची तब्बल 17 तास चौकशी

हर्ष आणि भारती यांना NCB ने आधीच समन्स बजावले होते. नंतर NCB ने भारतीच्या घरी धाड टाकून झाडाझडती केली, त्यावेळी तिच्या घरी संशयित वस्तू सापडल्यानंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी दोघांना शनिवारी सकाळीच ताब्यात घेतले. मग संध्याकाळी चौकशीनंतर भारतीला अटक करण्यात आली होती. तर, तब्बल 17 तास चौकशी केल्यानंतर हर्ष लिंबाचीयालाही अटक करण्यात आली.

(Mumbai NDPS Court grants Bail to Comedian Bharti Singh and her husband Harsh Limbachiyaa)