AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्म मुस्लिम, तरीही बॉलिवूड अभिनेत्रीकडून हिंदू पद्धतीने पूजा; ट्रॉल करणाऱ्यांना दिल सडेतोड उत्तर

धर्माने मुस्लिम असूनही बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेलने नुकताच तिचा एक ब्रँड लाँच केला पण त्या लाँचिंगवेळी तिने हिंदू पद्धतीने पूजा केली. ज्याचा व्हिजिओ जोरदार व्हायरल होत आहे.

धर्म मुस्लिम, तरीही बॉलिवूड अभिनेत्रीकडून हिंदू पद्धतीने पूजा; ट्रॉल करणाऱ्यांना दिल सडेतोड उत्तर
soundous moufkir
| Updated on: Jul 03, 2026 | 11:56 AM
Share

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल सुंदूस मौफकीर सध्या तिच्या ‘मोरोमा’ या नवीन प्रीमियम स्किनकेअर ब्रँडमुळे चर्चेत आहे. मात्र, ब्रँड लाँचपेक्षाही, ती घरी केलेल्या एका पूजेमुळे अधिक चर्चेत आहे. या पूजेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, काही लोकांनी तिच्या मुस्लिम ओळखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, ज्यावर आता अभिनेत्रीने स्पष्टपणे उत्तर दिले आहे. सुंदूसने एका पुजाऱ्याला घरी बोलावून पूर्ण विधींसह पूजा केली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, ती पिवळ्या रंगाचा पारंपरिक पोशाख परिधान करून, हातात पूजेचे ताट घेऊन देवाची आरती करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिच्या टीमचे सदस्यही उपस्थित आहेत. तिच्या नवीन व्यवसायाच्या शुभ सुरुवातीसाठी ही पूजा करण्यात आली होती.

व्हिडिओ शेअर करताना धर्मा लिहिले की, तिने देवाच्या आशीर्वादाने आपला नवीन प्रवास सुरू केला आहे. तिने प्रार्थना केली की तिचा ब्रँड योग्य दिशेने प्रगती करो, संपूर्ण टीम सुरक्षित राहो आणि प्रत्येकाचा हेतू शुद्ध राहो. तिने असेही म्हटले की कोणतेही यश एकट्याने मिळत नाही, तर ते संपूर्ण टीमच्या कठोर परिश्रमातून आणि विश्वासातून मिळते.

मात्र, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी प्रश्न विचारला की, मुस्लिम असूनही तिने हिंदू रितीरिवाजानुसार पूजा का केली. ट्रोलिंग वाढल्यावर, सुंदूसने स्पष्ट केले की, “मी अभिमानाने सांगते की मी मुस्लिम आहे आणि माझा धर्म माझ्या ओळखीचा नेहमीच सर्वात महत्त्वाचा भाग राहील. तिने स्पष्ट केले की उपासना करण्याचा निर्णय हा धर्म बदलण्याचा नव्हता, तर तिच्या टीमच्या भावनांचा आदर करण्याचा होता. माझ्या टीममध्ये हिंदू सदस्य आहेत, ज्यांचा मी मनापासून आदर करतो. हा नवीन प्रवास सुरू करण्यापूर्वी, त्यांनाही आध्यात्मिक समाधान मिळावे अशी माझी इच्छा होती.”

अभिनेत्री म्हणाली की, “ज्याप्रमाणे तिची टीम तिच्या मुस्लिम धार्मिक विधी आणि प्रार्थनांमध्ये तिच्यासोबत उभी राहते, त्याचप्रमाणे तिलाही त्यांच्या परंपरांचा आदर करायचा होता. टीम म्हणजे केवळ एकत्र काम करणे नव्हे, तर एकमेकांच्या श्रद्धा आणि भावनांचा आदर करणे देखील आहे. खरी टीम तीच ​​असते, जी आपापल्या धर्मांशी आणि श्रद्धांशी तडजोड न करता एकमेकांच्या पाठीशी उभा राहते.”

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा