मायरा वायकुळला ट्रोल करणाऱ्यांना वडिलांचं सडेतोड उत्तर, म्हणाले “कोणत्याच मुलाला..”

चिमुकली मायरा वायकुळ सध्या 'नाच गं घुमा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोशल मीडियावर स्टार असलेल्या मायराला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतोय. तिच्या बोलण्या-वागण्यावरून टीका-टिप्पणी करणाऱ्यांना मायराच्या वडिलांनी उत्तर दिलं आहे.

मायरा वायकुळला ट्रोल करणाऱ्यांना वडिलांचं सडेतोड उत्तर, म्हणाले कोणत्याच मुलाला..
मायरा वायकुळ आणि तिचे आईवडीलImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 06, 2024 | 10:46 AM

मायरा वायकुळ.. हे नाव आज सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. अवघ्या सात वर्षांची मुलगी मायरा तिच्या विविध व्हिडीओंमुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. सोशल मीडियावरून स्टार झालेल्या मायराने आधी मालिकेत काम केलं. त्यानंतर आता ती ‘नाच गं घुमा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त मायराने काही मुलाखती दिल्या आहेत. मात्र या मुलाखतींमध्ये ती ज्याप्रकारे बोलते किंवा उत्तर देते, त्यावरून काहींनी तिला ट्रोल केलंय. केवळ मायराच नाही तर तिच्या आईवडिलांवरही टीका केली जात आहे. या ट्रोलिंगवर मायराचे वडील गौरव वायकुळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मीडियावर मायराचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्राम रिल्स, डान्सचे व्हिडीओज यांमुळे ती लोकप्रिय झाली. चिमुकल्या मायराचं अभिनय आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून नेटकरी थक्क होतात. मायराचं सोशल मीडिया अकाऊंट तिची आई श्वेता वायकुळ सांभाळते. मात्र कमी वयात मायराचं मोठ्यांसारखं बोलणं, वागणं पाहून नेटकरी तिच्या आईवडिलांना ट्रोल करू लागले आहे. मायराचं बालपण तिच्यापासून हिरावून घेत असल्याचाही टीका अनेकांनी केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गौरव वायकुळ यांनी त्यावर उत्तर दिलं आहे.

हे सुद्धा वाचा

ते म्हणाले, “मला त्या नकारात्मकतेने काहीच फरक पडत नाही. कारण सोशल मीडियावर हजारो कमेंट्स असतात. त्यापैकी 10 नकारात्मक, टीका करणाऱ्या असतात. त्यामुळे माझ्यासाठी उर्वरित सकारात्मक आणि कौतुक करणारे कमेंट्स महत्त्वाच्या आहेत. प्रत्येत व्यक्तीला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे. पण मायराच नाही तर कोणत्याही लहान मुलाबद्दल अशा पद्धतीने मत बनवणं चुकीचं आहे. कारण त्या गोष्टी मुलांनी वाचल्या तर त्याचा काय परिणाम होईल, याची आपल्यालाही कल्पना नसेल. मायराला या सर्व गोष्टींपासून लांब कसं ठेवायचं हे मला आणि माझी पत्नी श्वेताला माहित आहे. त्यामुळे आम्ही तिच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत.”

मायराच्या बोलण्याविषयी ते पुढे म्हणाले, “कसं बोलावं किंवा कसं वागावं याचं आम्ही तिला खास प्रशिक्षण दिलं नाही. ती लहान मुलांसारखी ओघाने बोलून जाते. तिला कोणीच काही शिकवलेलं नाही, किंवा सांगितलेलंही नाही. तिचं ती करतेय. त्यामुळे आपण सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करावं असं मला वाटतं. लोक काय बोलतात म्हणून आपण तिला थांबवू नये असं मला वाटतं. याने तिच्यातील प्रतिभेला फटका बसेल. आम्ही तिला कधीच कोणत्या कामासाठी बळजबरी करत नाही. ती हो म्हणाली तरच आम्ही पुढे जातो.”

सैफवर 1 कोटींसाठी जीवघेणा हल्ला? हल्लेखोर शिरलाच कसा? काय घडलं बघा?
सैफवर 1 कोटींसाठी जीवघेणा हल्ला? हल्लेखोर शिरलाच कसा? काय घडलं बघा?.
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.