माधुरी दीक्षितच्या मराठी KBC मध्ये दिसणार होते नाना पाटेकर, आता होणार या अभिनेत्रीची एंट्री
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ८ ऑक्टोबर रोजी गोव्यात निधन झाले, यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. ते 'कोण होणार करोडपती'च्या प्रीमियर एपिसोडमध्ये माधुरी दीक्षितसोबत दिसणार होते. मात्र त्यांच्या निधनामुळे हा प्लान बदलला आहे

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar0 आता या जगात नाही, काल ( गुरूवार, 8 ऑक्चोबर) त्यांचं गोव्यात निधन झालं, ते 75 वर्षांचे होते. नाना पाटेकरांच्या अकस्मात निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला.त्यांचे चाहतेही दु:खात आहेत. दरम्यान ‘कौन बनेगा करोडपती’च्या मराठी व्हर्जनमध्ये अर्थात ‘ कोण होणार करोडपती’ या शोमध्ये नाना पाटेकर हे माधुरी दिक्षित सोबत दिसणार होते, हे तुम्हाला माहीत आहे का ? शोच्या प्रीमिअर एपिसोडसाठी माधुरी दीक्षित ही नाना पाटेकर यांच्यसोबत आज, म्हणजेच 9 ऑक्टेबर रोजी शूटिंग करणार होती. मात्र काल त्यांचे दुर्दैवी निधन झाल्याने आता ते शक्य नाही. त्यामुळे नानाऐंवजी आता ही अभिनेत्री माधुरीसोबत या शोमध्ये दिसणार आहे.
गुरूवार, 8 ऑक्टोबर रोजी नाना पाटेकरांची गोव्यात निधन झाल्यामुळे ‘कोण होणार करोडपती’ च्या प्रीमिअर एपिसोडच्या शूटिंगचा संपूर्ण प्लान बदलला आहे. माधिुरी दीक्षित होस्ट करत असलेल्या शोमध्ये नाना पाटेकर यांना हॉटसीटवर पाहण्यास प्रेक्षक खूप उत्सुक होते, हा एक विशेष प्रसंग ठरला असता, पण त्यांच्या निधनामुळे आता हे शक्य नाही. त्यामुळे नाना पाटेकर यांच्या जागी आता अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही या शोमध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे या निमित्ताने माधिरी दीक्षित आणि सोनाली बेंद्रे, या दोघी पहिल्यांदा, एखाद्या शोमध्ये एकत्र दिसणार आहेत. नाना पाटेकर आणि माधुरीला एकत्र पाहणं हा चाहत्यांना अनोख अनुभव ठरला असता, मात्र आता ते कधीच होऊ शकणार नाही.
मराठी केबीसीमध्ये येणार होते नाना पाटेकर
मराठी केबीसीद्वारे, अभिनेत्री माधुरी दीक्षित ही पहिल्यांदाच अशा प्रकारच्या शोमध्ये होस्टिंग करत आहे. या शोचा प्रीमिअर एपिसोड खास व्हावा यासाठी नाना पाटेकरांसोबत शोची सुरुवात करण्याची योजना होती. त्यासाठी आज 9 ऑक्टोबरला नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित यांच्यासह शूट करायचं ठरलं होतं. पण नशिबात काही वेगळंच होतं. या शूटिंगच्या अवघा 1 दिवस आधीच, काल 8 ऑक्टोबर रोजी नाना पाटेकर यांचं निधन झालं. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही खूप मोठी हानी आहे. नाना पाटेकर आणि माधुरी यांनी ‘परिंदा’, ‘प्रहार’ आणि ‘वजूद’ यांसारख्या चित्रपटांत एकत्र काम केलं होतं.
नाना पाटेकरांऐवजी सोनाली बेंद्रे येणार
या प्रीमियर एपिसोडमध्ये आता नाना पाटेकर यांच्याऐवजी, अभिनेत्री तर सोनेली बेंद्रे झळकणार आहे. सोनी मराठीच्या ‘कोण होणार करोडपती’ची सुरुवात सोमवार, 12 ऑक्टोबरपासून होत आहे. आपल्या प्रदीर्घ चित्रपट करिअरमध्ये माधुरी आणि सोनेलीने आत्तापर्यंत कोणत्याही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही. अशा परिस्थितीत ‘कोण होणार करोडपती’मध्ये त्या पहिल्यांदाच एकत्र येत असून, चाहत्यांसाठी हे सुखद सरप्राईज असेल.
कोण होईल करोडपती या शोचे आतापर्यंत 7 सिझन झाले आहेत. माधुरी दीक्षित ही या शोच्या 8व्या सिझनमध्ये होस्ट म्हणून दिसणार आहे. शोच्या सुरुवातीच्या दोन सिझन्समध्ये सचिन खेडेकर होस्ट होते, त्यानंतर सिझन 3 साठी ही जबाबदारी स्वप्निल जोशीने सांभाळली, चौथ्या सिझनमध्ये नागराज मंजुळे दिसले आणि पाचव्या, सहाव्या, सातव्या सिझनमध्ये पुन्हा सचिन खेडेकरन यांनीच शो होस्ट केला. आता ही जबाबदारी माधुरी दीक्षितच्या हातात जाणार आहे.
