AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बजेट पेक्षा 650 टक्के अधिक कमाई करणारा चित्रपट, 69 वर्षांपूर्वी झालेला प्रदर्शित, कोणीच मोडू शकलं नाही रेकॉर्ड

1957 मध्ये प्रदर्शित झालेला नरगिस दत्तच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली होती रेकॉर्ड ब्रेक कमाई. बजेट पेक्षा 650 टक्के अधिक कमावलेला नफा. आजही या चित्रपटाचा कोणी मोडू शकलं नाही रेकॉर्ड.

बजेट पेक्षा 650 टक्के अधिक कमाई करणारा चित्रपट, 69 वर्षांपूर्वी झालेला प्रदर्शित, कोणीच मोडू शकलं नाही रेकॉर्ड
| Updated on: May 14, 2026 | 6:53 PM
Share

Nargis Dutt : भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर विक्रम रचले. आजच्या काळात 500 कोटी, 1000 कोटींच्या कमाईवर चित्रपटाचं यश ठरतं. मात्र, तब्बल 69 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाने असा विक्रम केला, जो आजही अनेकांसाठी प्रेरणादायी मानला जातो. हा चित्रपट म्हणजे अभिनेत्री नरगिस दत्त यांचा गाजलेला चित्रपट Mother India.

1957 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्या काळात बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आईच्या संघर्षाची कथा मांडणारा हा चित्रपट भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक मानला जातो. इतकंच नाही तर आजही ‘मदर इंडिया’सारखा प्रभावी आणि भावनिक चित्रपट पुन्हा निर्माण झाला नाही असं अनेक चित्रपट प्रेमी सांगतात.

सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक महबूब खान यांनी केलं होतं. चित्रपटात नरगिस दत्त यांच्यासोबत राजकुमार आणि सुनील दत्त यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. ग्रामीण भारत, दारिद्र्य, आईचं ममत्व आणि संघर्ष यांचा संगम या चित्रपटात प्रभावीपणे दाखवण्यात आला होता.

‘मदर इंडिया’ त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला होता. रिपोर्टनुसार, हा चित्रपट जवळपास 60 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर त्याने तब्बल 4.5 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्या काळातील ही रक्कम प्रचंड मोठी मानली जात होती. चित्रपटाच्या निर्मात्यांना जवळपास 650 टक्के नफा झाला होता. त्यामुळे हा चित्रपट 1957 मधील सर्वात फायदेशीर चित्रपट ठरला.

काय होती चित्रपटाची कथा?

चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झाल्यास, यात एका गरीब आईची कथा दाखवण्यात आली आहे. अनेक संकटं, गरिबी आणि सामाजिक अडचणींना सामोरं जात ती आपल्या मुलांचं संगोपन करते. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी ती शेतात कष्ट करते, हालअपेष्टा सहन करते आणि आयुष्याशी झुंज देत राहते. आईच्या त्यागाची आणि जिद्दीची ही कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडली होती.

आजही ‘मदर इंडिया’ हा भारतीय सिनेमातील क्लासिक चित्रपट मानला जातो. या चित्रपटाला IMDb वर 10 पैकी 7.8 रेटिंग मिळालं आहे. इतक्या वर्षांनंतरही या चित्रपटाची लोकप्रियता कायम असून भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अजरामर कलाकृती म्हणून त्याचं नाव घेतलं जातं.

Follow Us
2029 च्या निवडणुकीबाबत आत्ताच दिला थेट संकेत; पुण्यातील कार्यक्रमात...
पुढच्या वेळीही आम्हीच येणार, 2029 च्या निवडणुकीबाबत CM फडणवीसांचे मोठे विधान काय?
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी ठाकरेंनी ऐकवला भाजप
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंनी ऐकवला भाजप नेत्याचा ऑडिओ; एकच खळबळ!
फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने?
मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी...
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी गर्दी
सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
मोठी बातमी! सुप्रिया सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंनी अखेर सांगूनच टाकलं; हे...
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंनी अखेर सांगूनच टाकलं; हे फक्त एक पद...
मोठी बातमी! CM फडणवीस यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला ठाकरेंचे आमदार
मोठी बातमी! CM फडणवीस यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला ठाकरेंच्या आमदाराची हजेरी, चर्चांना उधाण!
NEET निकालात मोठा घोळ? 702 गुणांचा दावा, पण निकालात फक्त 87 गुण!
NEET निकालात मोठा घोळ? 702 गुणांचा दावा, पण निकालात फक्त 87 गुण!
धावत्या मेल एक्स्प्रेससमोर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; अंगावर काटा....
Viral Video | धावत्या मेल एक्स्प्रेससमोर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर, नेमकं काय घडलं?
रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी....
रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी शिवसैनिकांमध्ये बाचाबाची
भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान.

भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी….

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी…

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट.

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित.

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल.

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार.

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार