AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानी कलाकारांवरुन दिलजीतला आधी पाठिंबा, मग नसीरुद्दीन शाह यांनी अचानक अशी कृती का केली?

दिलजीत दोसांझच्या 'सरदार जी 3' या चित्रपटावरून मोठा वाद सुरू आहे. यामध्ये पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत काम केल्याबद्दल दिलजीतवर जोरदार टीका होत आहे. यादरम्यान नसीरुद्दीन शाह यांनी दिलजीतची बाजू घेतली होती. परंतु त्यांनी तो पोस्ट आता डिलिट केला आहे.

पाकिस्तानी कलाकारांवरुन दिलजीतला आधी पाठिंबा, मग नसीरुद्दीन शाह यांनी अचानक अशी कृती का केली?
हानिया आमिर- दिलजीत दोसांझ आणि नसीरुद्दीन शाहImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 01, 2025 | 9:18 AM
Share

पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत भारतीय गायक आणि अभिनेता दिलजित दोसांझने ‘सरदार जी 3’ या चित्रपटात काम केल्याने जोरदार टीका झाली. या टीकेच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी त्याची बाजू घेतली होती. दिलजीतला पाठिंबा देणारी एक पोस्ट त्यांनी फेसबुकवर लिहिली होती. माझा दिलजीतला खंबीर पाठिंबा आहे, असं त्यांनी लिहिलं होतं. परंतु आता यावरून त्यांनी यू-टर्न घेतल्याचं दिसतंय. कारण नसीरुद्दीन यांनी दिलजीतसाठी लिहिलेली ती पोस्ट आता फेसबुकवर दिसत नाही. ‘फेसबुकवरील ही पोस्ट आता अस्तित्त्वात नाही. कदाचित ती काढून टाकण्यात आली असावी किंवा पोस्टच्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये काही बदल केला असावा’, असा मेसेज त्यावर दिसत आहे. त्यामुळे नसीरुद्दीन यांनी त्यांची पोस्ट डिलिट केली असावी, असंही म्हटलं जात आहे.

काय होती नसीरुद्दीन शाह यांची पोस्ट?

‘मी दिलजीतसोबत खंबीरपणे उभा आहे. जुमला पार्टीचं घाणेरड्या कारस्थानाचं विभाग त्याच्यावर निशाणा साधण्याच्या संधीची वाटच पाहत होतं. अखेर ती संधी मिळाली, असं त्यांना वाटतंय. चित्रपटातील कास्टिंगसाठी तो जबाबदार नव्हता, दिग्दर्शक होता. परंतु त्यांना कोणीच ओळखत नाही आणि दिलजीतला संपूर्ण जग ओळखतं. त्याने कास्टचा स्वीकार केला कारण त्याच्या डोक्यात कोणतंही विष नाही,’ असं त्यांनी लिहिलं होतं. ‘या गुंडांना भारत आणि पाकिस्तानातील लोकांमधील वैयक्तिक संवाद संपवायचा आहे. माझे जवळचे नातेवाईक आणि काही प्रिय मित्र तिथे आहेत. कोणीही मला त्यांना भेटण्यापासून किंवा जेव्हा मला वाटेल तेव्हा त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. ‘पाकिस्तानात जा’ असं म्हणणाऱ्यांना माझं उत्तर असेल की ‘कैलाशला जा’’, अशा शब्दांत त्यांनी सुनावलं होतं.

नसीरुद्दीन शाह यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. पहलगाममधील दहशवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याची भूमिका अधिक तीव्र करण्यात आली होती. तरीही दिलजीतने हानियासोबत काम केल्याने, त्यावर जोरदार टीका होत असताना नसीरुद्दीन यांनी त्याची बाजू घेतल्याने नेटकरी भडकले होते. ‘ज्या देशात राहता, जिथे कमावता.. त्याच देशाशी तुम्ही प्रामाणिक राहू शकत नाही’, अशी टीका नेटकऱ्यांनी केली होती.

एप्रिलमधील पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली. त्यानंतरही हानिया आमिरचा चित्रपटात समावेश असल्याने भारतात दिलजीतच्या या चित्रपटावरच बंदी घालण्याची मागणी होत आहे. अनेक कलाकारांनी दिलजीतवर टीका केली. तर काहींनी त्याचं समर्थनही केलं.

Follow Us
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी कायम
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस