AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हार्दिकसोबत घटस्फोटानंतर अखेर नताशाने सोडलं मौन; म्हणाली “तो अजूनही..”

क्रिकेटर हार्दिक पांड्याला घटस्फोट दिल्याच्या चार महिन्यांनंतर नताशा स्टँकोविकने मौन सोडलं आहे. हार्दिकसोबतच्या नात्याबद्दल ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाली. त्याचसोबत पुन्हा सर्बियाला जाण्याविषयीही तिने स्पष्ट केलं.

हार्दिकसोबत घटस्फोटानंतर अखेर नताशाने सोडलं मौन; म्हणाली तो अजूनही..
Natasa Stankovic and Hardik PandyaImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 10, 2024 | 11:10 AM
Share

क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री-मॉडेल नताशा स्टँकोविक यांनी यावर्षी जुलै महिन्यात घटस्फोट घेतला. घटस्फोट जाहीर करताच नताशा तिच्या मुलासोबत मायदेशी सर्बियाला निघून गेली होती. काही दिवस तिथे राहिल्यानंतर ती पुन्हा भारतात परतली. हार्दिकला घटस्फोट दिल्यानंतर नताशा मुलासोबत कायमची सर्बियाला राहायला जाणार, अशा चर्चांना उधाण आलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याचसोबत घटस्फोटानंतर मुलाच्या संगोपनाविषयीही ती मोकळेपणे व्यक्त झाली.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत नताशा म्हणाली, “मी सर्बियाला परत जाणार, अशा चर्चा होत आहेत. पण मी परत कशी जाऊ शकते? मला एक मुलगा आहे. तो मुलगा इथे शाळेत शिकतो. त्यामुळे माझं सर्बियाला जाणं शक्यच नाही. ते होणारच नाही. मुलाने इथे राहणं गरजेचं आहे. अखेर त्याचं कुटुंबही इथेच आहे. आम्ही (हार्दिक आणि मी) अजूनही एक कुटुंब आहोत. आमचा एक मुलगा आहे आणि त्या मुलामुळे आम्ही एक कुटुंब आहोत. मला इथे दहा वर्षे झाली आहेत आणि दरवर्षी मी जुलै महिन्यात सर्बियाला जाते.”

“आयुष्यात सध्या काही घडलं तरी, माझा एका गोष्टीवर विश्वास आहे की लोक वाईट नसतात. फक्त त्यांचा आत्मा भरकटतो. मला असं वाटतं की मी स्वत:चं मूल्य विसरले होते. काही परिस्थितीत मी शांत बसायचे, मी फार काही बोलायचे नाही, मला फरक पडत नाही असं मी स्वत:ला म्हणायचे. पण अगस्त्यमुळे मी स्वत:वर प्रेम करायला शिकले”, अशा शब्दांत नताशा व्यक्त झाली.

View this post on Instagram

A post shared by @natasastankovic__

या मुलाखतीत नताशाने पुन्हा एकदा इंडस्ट्रीत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली, “गेल्या पाच वर्षांत मी काहीच काम केलं नाही. पण मला माझ्या आयुष्यात कोणतीच खंत नाही. मी काम करत राहिले असते तर माझ्या मानसिक स्वास्थ्यासाठी ते चांगलं राहिलं असतं”, असं नताशाने सांगितलं. हार्दिकसोबतच्या नात्याबद्दलही खासगीपणा जपायला आवडेल, असंही ती म्हणाली.

जुलै महिन्यात नताशा आणि हार्दिक विभक्त झाले. इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित दोघांनी घटस्फोट जाहीर केला होता. परस्पर संमतीने हा घटस्फोट घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. लग्नाच्या चार वर्षांनंतर हार्दिक आणि नताशाचे मार्ग वेगळे झाले. या दोघांनी 2020 मध्ये लग्न केलं होतं. त्यांना अगस्त्य हा तीन वर्षांचा मुलगा आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.