Varun-Natasha Wedding | वरुण-नताशाचे ‘ग्रँड वेडिंग’, नताशाचा ‘लेहंगा’ इंटरनेटवर चर्चेत, पाहा फोटो…

Varun-Natasha Wedding | वरुण-नताशाचे ‘ग्रँड वेडिंग’, नताशाचा ‘लेहंगा’ इंटरनेटवर चर्चेत, पाहा फोटो...

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे.

Harshada Bhirvandekar

|

Jan 22, 2021 | 12:19 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. आज, म्हणजेच 22 जानेवारीपासून लग्नाची लग्नाच्या तयारीची लगबग सुरु झाली आहे. दरम्यान, वरुणच्या वधूचा अर्थात नताशाच्या ‘लेहेंग्या’चा फोटो समोर आला आहे. वास्तविक, या इव्हेंट टीमचे सदस्य काल संध्याकाळी वेडिंग आऊटफिट्ससह नताशाच्या घरी पोहोचले होते. लेहेंग्याच्या पाहिल्या झलकेवरून असे दिसते आहे की, नताशाने तिच्या लग्नासाठी पेस्टल शेड निवडली आहे. फोटोमध्ये आपल्याला दिसेल की या लेहेंग्यावर बीड्स आणि डायमंडचे वर्क केले आहे. या आऊटफिटमध्ये नताशा खूपच सुंदर दिसणार आहे (Natasha Dalal pestle lehenga for grand wedding ceremony).

तर दुसरीकडे, लग्नाचे ठिकाणही सजवले जात आहे, तिथले फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. वरुण-नताशाचे लग्न अलीबागच्या एका मॅन्शनमध्ये पार पडणार आहे. समुद्राच्या अगदी जवळ असलेल्या या भल्या मोठ्या मॅन्शनमध्ये हा सोहळा होणार आहे. वरुण धवन आणि नताशा दलाल आज आपल्या कुटूंबियांसह अलिबागला रवाना होतील. अलिबागमधील बरेच व्हिला अतिथींसाठी बुक करण्यात आले आहेत. आजपासून 24 जानेवारीपर्यंत लग्नाच्या विधी सुरू असतील.

View this post on Instagram

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

(Natasha Dalal pestle lehenga for grand wedding ceremony)

संगीत सोहळ्यात बॉलिवूडचे तारे

वरुण आणि नताशाच्या लग्नाच्या कार्यक्रमांची सुरुवात संगीत सोहळ्याने होईल. वरुणचे बॉलिवूडमधील मित्र करण जोहर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान, अर्जुन कपूर-मलाइका अरोरा, जाह्नवी कपूर-खुशी कपूर, कतरिना कैफ, नीतू कपूर, कियारा अडवाणी, अनिल कपूर, रिया कपूर आणि हर्षवर्धन कपूर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

सलमान खानही सामील होणार!

डेव्हिड धवन आणि सलमान खान यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. त्यामुळे ‘दबंग’ सलमान खानही या लग्नात सामील होणार आहे. त्याचबरोबर करण जोहर या संगीत समारंभात खास परफॉर्मेंस सादर करणार आहे (Natasha Dalal pestle lehenga for grand wedding ceremony).

आलिया भट्ट-रणबीर कपूरची जोडी जमणार

वरुणची जिवलग मैत्रीण अभिनेत्री आलिया भट्टही लग्नाला हजेरी लावणार आहे. यावेळी, ती एकटी येणार नाही तर, रणबीर कपूरबरोबर या विवाहसोहळ्यात सामील होणार आहे. आलिया सध्या तिच्या आगामी ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या चित्रीकरणात आहे. पण, शूटिंगमधून ब्रेक घेत ती अलिबागला वरुणच्या लग्नात हजेरी लावणार आहे.

वरुण आणि नताशाला ‘डेस्टीनेशन वेडिंग’ करायचं आहे, म्हणूनच त्यांनी अलिबाग बीच जवळ, सूर्यास्ताची वेळ निवडली आहे. लग्नानंतर दोघांच्याही पाहुण्यांसाठी रिसेप्शन डिनर असणार आहे. डेव्हिड धवनचे मित्रही या रिसेप्शनला उपस्थित राहणार आहेत.

(Natasha Dalal pestle lehenga for grand wedding ceremony)

हेही वाचा :

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें