राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन

सुमित्रा भावे यांनी सुनील सुकथनकर यांच्या साथीने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले (Director Sumitra Bhave dies in Pune)

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन
Sumitra Bhave

पुणे : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मोहोर उमटवणाऱ्या प्रसिद्ध दिग्दर्शक सुमित्रा भावे (Sumitra Bhave) यांचे निधन झाले. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. पुण्यातील खासगी रुग्णालयात सोमवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. (National Film Award winner Director Sumitra Bhave dies in Pune)

सुमित्रा भावे यांनी सुनील सुकथनकर यांच्या साथीने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. हलक्या फुलक्या पद्धतीने सामाजिक विषयांना हात घालणारे चित्रपट त्यांनी दिले. ‘दहावी फ’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘बाधा’, ‘नितळ’, ‘एक कप च्या’, ‘घो मला असला हवा’, ‘कासव’, ‘अस्तु’ अशा अनेक चित्रपटांना सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर जोडीचा परिसस्पर्श लाभला. ‘घो मला असला हवा’ या सिनेमातून राधिका आपटेसारखी हरहुन्नरी कलाकार मनोरंजन विश्वाला मिळाली.

बाई, पाणी लघुपटांना लोकप्रियता आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी 1995 मध्ये ‘दोघी’ हा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार केला. या चित्रपटालाही प्रेक्षक-समीक्षकांकडून पसंतीची मोहोर मिळाली. त्यांचे अनेक चित्रपट आंतरराष्ट्रीय महोत्सवांत गाजले; तसे अनेक चित्रपटांना राज्य शासन आणि राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाले.

सुमित्रा भावे यांना मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार

बाई – 1985 – सर्वोत्कृष्ट कुटुंबकल्याण चित्रपट
पाणी – 1987 – सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट
वास्तुपुरुष – 2002 – सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
देवराई – 2004 – सर्वोत्कृष्ट पर्यावरण विषयक चित्रपट
अस्तु – 2013 – सर्वोत्कृष्ट पटकथा
कासव – 2016 – सर्वोत्कृष्ट चित्रपट

राज्य शासन पुरस्कार विजेते चित्रपट

दोघी
दहावी फ
वास्तुपुरुष
नितळ
एक कप च्या

(National Film Award winner Director Sumitra Bhave dies in Pune)

सुमित्रा भावे यांचा परिचय

सुमित्रा भावे यांचा जन्म 12 जानेवारी 1943 रोजी पुण्यात झाला. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली. तर टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई येथून पॉलिटिकल सायन्स अँड सोशोलॉजी या विषयात पदव्युत्तर पदवीही मिळवली. सुमित्रा भावेंनी विविध संस्थांसाठी स्वयंसेवी काम सुरू केले. त्यांनी ऑल इंडिया रेडिओ, नवी दिल्ली येथे मराठी भाषेच्या वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केले आहे.

संबंधित बातम्या :

‘कोर्ट’ चित्रपटातील अभिनेते वीरा साथीदार यांचे कोरोनाने निधन

(National Film Award winner Director Sumitra Bhave dies in Pune)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI