AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nawazuddin Siddiqui | ‘हा नरकात जाईल’, नवाजुद्दीन सिद्दिकीवर का भडकला त्याचाच सख्खा भाऊ?

पत्नी आलिया सिद्दिकीमुळे नवाजुद्दीन आधीच चर्चेत होता. त्यानंतर त्याच्या मोलकरीणीने दुबईतून व्हिडीओ पोस्ट करत त्याच्यावर आरोप केले. या आरोपांनंतर तिने माघारसुद्धा घेतली. आता नवाजुद्दीनचा भाऊ शमस नवाब सिद्दिकी याने त्याच्यावर सडकून टीका केली आहे.

Nawazuddin Siddiqui | 'हा नरकात जाईल', नवाजुद्दीन सिद्दिकीवर का भडकला त्याचाच सख्खा भाऊ?
| Updated on: Feb 23, 2023 | 12:22 PM
Share

मुंबई : “स्क्रिप्टेड आहे हे सगळं.. अजून किती जणांना विकत घेणार? बँक बॅलेन्स संपून जाईल तुझं.. “, अशी वक्तव्यं अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीसाठी दुसऱ्या कोणत्या व्यक्तीने नाही तर त्याच्या सख्ख्या भावाने केली आहे. पत्नी आलिया सिद्दिकीमुळे नवाजुद्दीन आधीच चर्चेत होता. त्यानंतर त्याच्या मोलकरीणीने दुबईतून व्हिडीओ पोस्ट करत त्याच्यावर आरोप केले. या आरोपांनंतर तिने माघारसुद्धा घेतली. आता नवाजुद्दीनचा भाऊ शमस नवाब सिद्दिकी याने त्याच्यावर सडकून टीका केली आहे.

शमसने नवाजुद्दीनच्या दुबईतल्या घरातील मोलकरीण सपना रॉबिन मसीहचा एक फोटोसुद्धा पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ती तिच्या भावाला आयफोन भेट देताना दिसतेय. “कालपर्यंत नवाजुद्दीनवर आरोप करणारी ही मुलगी आज तिच्या भावोजींना आयफोन भेट देतेय. त्याला भेट म्हणून दोन महिन्यांचा पगार एकत्रच मिळाला आहे वाटलं”, असा टोमणा त्याने लगावला आहे.

नवाजुद्दीनच्या मोलकरीणीने दुबईहून रडतानाचा व्हिडीओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या पोस्टमध्ये तिने नवाजुद्दीनवर बरेच आरोप केले होते. मात्र लगेचच तिने दुसरा व्हिडीओ पोस्ट करत नवाजुद्दीनवरील सर्व आरोप मागेसुद्धा घेतले होते.

“स्क्रिप्टेड आहे हे सगळं, अजून किती जणांना विकत घेणार? बँक बॅलेन्स संपून जाईल तुझा. आता तर तुझं कामही चालत नाहीये आणि रखडलेल्या चित्रपटांमुळे फिल्म इंडस्ट्रीचे 150 कोटी रुपये अडकले आहेत. खरंय, जो भंगार आणि बकऱ्यांना विकतो, त्यालाच नर्कात घेऊन जाणार”, असंही ट्विट नवाजुद्दीनच्या भावाने केलंय.

पत्नी आणि मोलकरीणीच्या वादावर नवाजुद्दीनने प्रतिक्रिया दिली. “हे पहा, मला या सर्व प्रकरणी काहीच बोलायची इच्छा नाही. पण माझ्या मुलांच्या अभ्यासावर त्याचा वाईट परिणाम होतोय. माझी मुलं दुबईत शिकतायत. माझी इतकीच विनंती आहे की माझ्या मुलांनी शाळेत जावं आणि अभ्यास करावं. मला बाकी काहीच बोलायचं नाहीये”, असं तो म्हणाला.

नवाजुद्दीन सिद्दिकीने 2010 मध्ये अंजना किशोर पांडेशी लग्न केलं. त्यानंतर तिने आलिया असं नाव बदललं. हे नवाजुद्दीनचं दुसरं लग्न आहे. त्याआधी त्याने शिबा नावाच्या महिलेशी लग्न केलं होतं. पण या दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. बॉलिवूडमध्ये स्टार होण्याआधीपासून नवाजुद्दीन आलियाला ओळखायचा.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.