AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50 सेकंदाच्या रोलसाठी 5 कोटी; सौंदर्याच्याबाबतीत दीपिका,ऐश्वर्यालाही टक्कर; शाहरुखसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी ही अभिनेत्री कोण?

अशी एक अभिनेत्री आहे जी सौंदर्याच्याबाबत, तसेच मानधन घेण्याच्याबाबतीत दीपिकालाही टक्कर देते. एका चित्रपटासाठी करोडो घेणाऱ्या या अभिनेत्री एकदा फक्त 50 सेकंदाच्या रोलसाठी चक्क 5 कोटी घेतले होते. कोण आहे ही अभिनेत्री?  

50 सेकंदाच्या रोलसाठी 5 कोटी; सौंदर्याच्याबाबतीत दीपिका,ऐश्वर्यालाही टक्कर; शाहरुखसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी ही अभिनेत्री कोण?
Nayanthara, 5 Crore for 50 Sec Role; India Highest Paid ActressImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 01, 2025 | 3:56 PM
Share

बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींमध्ये चढाओढ सुरुच राहते. पण कामाच्याबाबतीत तसेच मानधनाच्या बाबत काहीच अभिनेत्रींचे नाव चर्चेत असते जसं की दीपिका,ऐश्वर्या. या अभिनेत्री कामासोबतच त्यांच्या सौंदर्यासाठी देखील चर्चेत असतात. दीपिकाची तर ती घेत असलेल्या मानधनावरून नेहमीच चर्चा होताना दिसते. पण अशी एक अभिनेत्री आहे जी सैंदर्याच्या आणि मानधनाच्याबाबतीत दीपिका आणि ऐश्वर्यालाही टक्कर देते.

50 सेकंदाच्या रोलसाठी चक्क 5 कोटी घेतले

तिने 50 सेकंदाच्या रोलसाठी चक्क 5 कोटी घेतले होते. तर ती सौंदर्याच्याबाबतीत टॉप अभिनेत्रींना देखील टक्कर देते. तब्बल 80 चित्रपटांमध्ये काम केले आहे. एवढंच नाही तर भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी ही अभिनेत्री ठरली आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे नयनतारा, जिने रजनीकांत, शाहरुख खान, जयराम, नागार्जुन अक्किनेनी आणि इतरांसोबत काम केले आहे.

“सेलिब्रिटी 100” यादीत समाविष्ट झालेली ती एकमेव आघाडीची अभिनेत्री

नयनतारा सध्या अभिनय जगात वर्चस्व गाजवत आहे. 2018 मध्ये फोर्ब्स इंडियाच्या “सेलिब्रिटी 100” यादीत समाविष्ट झालेली ती एकमेव आघाडीची साउथ अभिनेत्री होती. 20 वर्षांत तिने 80 चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने अनेक पुरस्कार देखील जिंकले आहेत. एक काळ असा होता जेव्हा लोकांना वाटायचे की तिची कारकीर्द घसरत आहे. मात्र तिने त्यानंतर जोरदार पुनरागमन केले. अनेक चित्रपट निर्मात्यांनी तिला मोठ्या स्टार्ससोबत काम करण्याची संधी दिली.

प्रत्येक चित्रपटासाठी 10 कोटी घेते

नयनताराला सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री देखील म्हटले जाते. रिपोर्ट्सनुसार, नयनतारा प्रत्येक चित्रपटासाठी 10 कोटी घेते. तिचा शेवटचा चित्रपट “टेस्ट” होता. नेटफ्लिक्सने नयनतारा आणि विघ्नेश शिवनच्या लग्नाबद्दल “नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल” नावाचा एक डॉक्यूमेंट्री देखील प्रदर्शित केला.

एवढंच नाही तर एका कंपनीच्या जाहिरातीत काम करण्यासाठी तिला करारबद्ध करण्यात आले होते. तेव्हा अवघ्या 50 सेकंदांसाठी तिला 5 कोटी रुपये देण्यात आले होते.

अभिनेता शाहरुख खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

2015 मध्ये, “नानुम राउडी थान” या चित्रपटात काम करत असताना, तिची ओळख दिग्दर्शक विघ्नेश शिवनशी झाली. ते प्रेमात पडले. नंतर त्यांनी लग्न केले आणि सरोगेट आईच्या मदतीने त्यांना जुळी मुलेही झाली. तसेच 2023 मध्ये अभिनेत्री नयनताराने अभिनेता शाहरुख खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.