AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निव्वळ व्हॉट्सअ‌ॅप चॅटवरुन आर्यन, अनन्या अडकणार? उज्ज्वल निकम म्हणतात, प्रमोद महाजन खून खटल्यातही एक मेसेज होता

आर्यन खानची व्हॉट्सअॅप चॅटिंग हा महत्त्वाचा मुद्दा ठरलेला आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाचे कायदेशीर पेच आणि संदर्भ सांगितले आहेत. त्यांनी दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या खटल्याचा दाखला दिला आहे.

निव्वळ व्हॉट्सअ‌ॅप चॅटवरुन आर्यन, अनन्या अडकणार? उज्ज्वल निकम म्हणतात, प्रमोद महाजन खून खटल्यातही एक मेसेज होता
aryan khan ananya pande
| Edited By: | Updated on: Oct 21, 2021 | 7:07 PM
Share

मुंबई : क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे नाव समोर आलेले आहे. आर्यन खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अभिनेत्री अनन्या पांडेदेखील आर्यन खानच्या संपर्कात असल्याचा संशय एनसीबीला आहे. ही माहिती समोर येताच आता या प्रकरणात एक नवे वळण आले आहे. तपासादरम्यान आर्यन खानची व्हॉट्सअॅप चॅटिंग हा महत्त्वाचा मुद्दा ठरलेला आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाचे कायदेशीर पेच आणि संदर्भ सांगितले आहेत. त्यांनी दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या खटल्याचा दाखला दिला आहे.

एनसीबीला आर्यन खानची व्हॉट्सअ‌ॅप चॅटिंग सापडली

“आर्यन खान हा व्हिआयपीचा मुलगा आहे, म्हणून त्याला जामीन मिळत नाही अस मी म्हणनार नाही. एनसीबीला आर्यन खानची व्हॉट्सअ‌ॅप चॅटिंग सापडली आहे. या चॅटिंगमध्ये जे तथ्य आहेत किंवा जे पुरावे आहेत त्याचा आधार घेत आर्यनचा जामीन नकारला गेला आहे. व्हॉट्सअ‌ॅप चॅटिंग ग्राह्य धरायची की नाही हे कोर्टात निश्चित होणार,” असे निकम यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप चॅटिंग संदर्भातील दावा सिद्ध करावा लागणार

तसेच पुढे बोलताना त्यांनी प्रमोद महाजन यांच्या मृत्यूचाही दाखला दिला. “प्रमोद महाजन त्यांचा भाऊ प्रविण महाजन याने त्यांना एक मेसेज पाठविला होता. त्याच मेसेजचा आधार घेत त्याच्यावर आरोप केला होता. नंतर कोर्टात त्या मेसेजचा संदर्भ सिद्ध करावा लागला. म्हणून एनसीबीला मुंबई हायकोर्टात आर्यन खान प्रकरणात व्हॉट्सअॅप चॅटिंग संदर्भातील दावा सिद्ध करावा लागणार आहे. त्याचबरोबर आर्यन खानचे वकीलदेखील आपली बाजू मंडणार आहेत,” असे निकम म्हणाले.

आर्यन खानला 30 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी 

दरम्यान, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अडचणी संपताना दिसत नाहीयेत. आज पुन्हा एकदा NDPS कोर्टाने आर्यन खानच्या न्यायलयीन कोठडीत वाढ केली आहे. त्याच्यासोबत इतर सात जणांची न्यायालयीन कोठडी 30 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. न्यायालयाने हा निर्णय दिल्यानंतर आता शाहरुख खान तसेच त्याचे वकील कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र कोर्टाच्या या निर्णयामुळे आर्यन खानच्या अडचणी संपताना दिसत नाहीयेत.

इतर बातम्या :

संजय राऊतांची उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरली नाही का? पैठणच्या सामूहिक बलात्कार प्रकरणावरुन चित्रा वाघ कडाडल्या

china covid cases 2021: चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार, विमान फेऱ्या रद्द, शाळा बंद, जागोजागी मास टेस्टिंग सुरु

Aryan Khan Bail | आर्यन खानचा मुक्काम तुरुंगातच, 30 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ

(ncb found whats app chatting of aryan khan and ananya pandey advocate ujjwal nikam given example of pramod mahajan)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.