AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनन्या पांडेने फ्लॉन्ट केली टॅनिंग; झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले ‘ए बाई आमच्यावर दया…’

अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे टॅनिंग असलेले फोटो शेअर केले. 'तू मेरी मैं तेरा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे लूक होते. असं तिने कप्शनमध्ये सांगितलं आहे. काही चाहत्यांना तिचा हा बोल्ड लूक आवडला, तर काहींनी तिला तिच्या टॅन स्किनवरून ट्रोल केले.

अनन्या पांडेने फ्लॉन्ट केली टॅनिंग; झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले 'ए बाई आमच्यावर दया...'
Netizens troll Ananya Panday for flaunting her tanned bodyImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 03, 2025 | 3:57 PM
Share

अभिनेत्री अनन्या पांडे ही नेहमीच तिच्या वैयक्तिक कारणांमुळे ट्रोल होत असते. तिच्या अभिनयाबद्दलही कायम नेटकी कमेंट्स करत असतात. तसेच तिच्या स्टारकिड्स असण्यावरून देखील बऱ्याचदा तिला सोशल मीडियावर ऐकावं लागतं. अनन्याचा ‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे.

अनन्याने फ्लॉन्ट केली टॅनिंग

अलीकडेच अनन्या पांडेने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा चेहरा आणि शरीर पूर्णपणे वेगळी दिसत आहे. ती टॅन झाल्यासारखी दिसत आहे. अनन्याने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने टाय-डाय केलेला गुलाबी रंगाचा वनपीस ड्रेस घातला आहे.अनन्याचे या फोटोंनी लक्ष वेधून घेतलं आहे ते टॅन शरीरामुळे. जे अनन्या अतिशय स्टायलिश आणि हॉट पद्धतीने या फोटोमध्ये फ्लॉन्ट करताना दिसत आहे. अनन्याने या गुलाबी कटआउट ड्रेसमध्ये सोफ्यावर फोटोशूट केलं आहे. दुसऱ्या फोटोमध्ये, तिने बहु-रंगीत स्ट्राइप्ड ब्रा आणि डेनिम शॉर्ट्स घातलेला दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Ananya 🌙 (@ananyapanday)

माझे काही आवडते लूक…

तसेच तिने हे फोटो शेअर करताना अनन्याने कॅप्शनमध्ये “तू मेरी मैं तेरा या शीर्षकगीतातील हे माझे काही आवडते लूक आहेत. तुम्ही ते पाहिले आहेत का?” असे लिहिले आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले दिसत आहेत. टॅन बॉडी अन् लूकसह तिचा हॉट फोटो लूक सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. काही चाहत्यांना अनन्याचा लूक खूपच आवडला आहे, तर काहींनी तिच्या टॅन केलेल्या शरीरासाठी तिला ट्रोलही केलं आहे.अनन्याने तिच्या टॅन झालेल्या स्किनचा अनावश्यकपणे अभिमान बाळगू नये. अशा अनेक कमेंट्स आल्या आहेत.

युजर्सच्या कमेंट्स 

एका युजर्सने कमेंटमध्ये लिहिले, “आमच्यावर दया कर, टॅन झालेल्या लूकमध्ये तू चांगली दिसत नाहीयेस” तर एकाने लिहिले, “काळी,” तर दुसऱ्याने लिहिले, “शरीर टॅन का झालंय एवढं.” दरम्यान, काही युजर्सना अनन्याचा लूक हॉट वाटत असून तिच्या फोटोंना, लूकला पसंती दर्शवली आहे. एकाने लिहिले, “वाह, टॅन आवडले,” तर दुसऱ्याने लिहिले, “कांस्य सौंदर्य.”

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.