Marathi Serials : ‘उत्सव नात्यांचा नव्या कथांचा’, मार्च महिन्यात मनोरंजनाची मेजवानी

VN

|

Updated on: Feb 16, 2021 | 5:46 PM

महाराष्ट्राच्या विविध भागांमधील कथा घेऊन 'झी मराठी' मार्च महिन्यात नव्या मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. (New Serials on zee marathi)

Marathi Serials : ‘उत्सव नात्यांचा नव्या कथांचा’, मार्च महिन्यात मनोरंजनाची मेजवानी

Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या विविध भागांमधील कथा घेऊन ‘झी मराठी’ मार्च महिन्यात नव्या मालिका (New Serials) प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. मार्च महिन्यात दर सोमवारी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार. मनोरंजनाचा विचार करताना पुढच्या काळात ‘उत्सव नात्यांचा, नवीन कथांचा’ या घोषवाक्यासह झी मराठी प्रेक्षकांसमोर येणार आहे. राज्याच्या विविध भागातील लेखकांनी लिहिलेल्या कथा मालिकारूपात पाहायला मिळणार असून मार्चमध्ये दर रविवारी एक सोहळा आणि दर सोमवारी एक नवीन मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे,’ अशी माहिती ‘झी मराठी’ चे व्यवसायप्रमुख निलेश मयेकर यांनी दिली. महाराष्ट्र आणि भारताबाहेरही मराठी माणसांचे विश्व आहे. त्याही कथांवर आधारित मालिका सुरू करण्यात येणार असल्याचे मयेकर यांनी स्पष्ट केले.

‘पाहिले न मी तुला’

यापैकी ‘पाहिले न मी तुला’ या नवीन मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. यात अभिनेता शशांक केतकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या वाहिनीवर सुरू असलेल्या ‘माझा होशील ना’ या मालिकेत सुयश पटवर्धनची भूमिका साकारणारा अभिनेता आशय कुलकर्णी आणि नवोदित अभिनेत्री तन्वी मुंडले हे दोघेही नव्या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत आहेत.

 ‘रात्रीस खेळ चाले’तील अण्णा नाईक पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला’

रात्रीस खेळ चाले’ फेम अण्णा नाईकही पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मागच्या वर्षी ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेचं दुसरं पर्व लोकांनी पाहीलं. या दुसऱ्या पर्वालाही  प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि ‘अण्णा नाईक’ ही व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय ठरली. त्यामुळे नवीन वर्षांत अण्णा नाईक आणि त्यांचा खेळ पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मात्र मालिकेचे हे तिसरे पर्व आहे की वेगळे कथानक पाहायला मिळणार, याबाबत गुप्तता राखण्यात आली आहे. मालिकेच्या नवीन पर्वाच्या पटकथा आणि लेखनाची जबाबदारी पुन्हा एकदा प्रह्लाद कुडतरकर आणि राजेंद्र घाग यांच्या खांद्यावर आहे. राजेंद्र घाग रत्नागिरीचे असून ते सिंचन विभागात कार्यरत होते. आपली नोकरी सांभाळून मासिकांत कथा लिहिणाऱ्या घाग यांनी साठाव्या वर्षी पहिल्यांदा मालिकेसाठी लेखन केले.

‘काय घडलं त्या रात्री’ 

राज्याच्या विविध भागातील नव्या दमाचे लेखक वाहिनीशी जोडले गेले आहेत. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचा लेखक तेजस घाडगेने पहिल्यांदाच इतकी मोठी मालिका केली होती. आता ‘काय घडलं त्या रात्री’ ही मालिका तो लिहितो आहे. सातारचा विशाल कदम आणि स्वप्निल गांगुर्डे यांनी मिळून ‘देवमाणूस’ मालिकेची कथा लिहिली आहे, या मालिकेचं दिग्दर्शन राजू सावंत यांनी केले आहे. याआधी राजू सावंत यांनी या आधी तू तिथे मी, जय मल्हार, रात्रीस खेळ चाले ची दोन्ही पर्व, लागीर झालं जी यांसारखे दर्जेदार कार्यक्रम दिले आहेत. पाहायला विसरू नका ‘उत्सव नात्यांचा नव्या कथांचा’.

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI