Rohit Sardana | स्वत: कोरोनाग्रस्त असतानाही इतरांसाठी काळजी, रोहीत सरदानांचे शेवटचे 3 ट्विट पाहिलेत का?

रोहित सरदाना यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. दिल्लीतील मेट्रो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. (News Anchor Rohit Sardana passed away)

Rohit Sardana | स्वत: कोरोनाग्रस्त असतानाही इतरांसाठी काळजी, रोहीत सरदानांचे शेवटचे 3 ट्विट पाहिलेत का?
रोहित सरदाना

नवी दिल्ली : लोकप्रिय न्यूज अँकर रोहित सरदाना (Rohit Sardana passes away) यांच्या निधनाने अख्खा देश सुन्न झाला आहे. रोहित सरदाना हे ‘आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीवरील प्रसिद्ध वृत्तनिवेदक होते. कोरोना संसर्गानंतर उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यांचे निधन झाले. मात्र कोरोनाशी झुंज सुरु असतानाही सरदाना यांना इतरांची काळजी वाटत होती, हे त्यांचे सोशल मीडिया अकाऊण्ट पाहिल्यानंतर ध्यानात येते. (News Anchor Rohit Sardana passed away last three tweets about COVID Patients)

महिलेसाठी रेमडेसिव्ही पुरवण्याचे आवाहन

रोहित सरदाना यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. दिल्लीतील मेट्रो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यानच्या काळातही त्यांनी इतर कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी ट्वीट केले होते. काल म्हणजेच 29 एप्रिलला सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी त्यांनी करुणा श्रीवास्तव नामक 39 वर्षीय महिलेला तातडीने 6 रेमडेसिव्हीर इंजेक्शनची आवश्यकता असल्याचे ट्वीट केले होते.

उत्तर प्रदेशातील महिलेची करुण कहाणी

त्याआधी, त्यांनी आज तक वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवरील एक बातमीही ट्वीट केली होती. नोएडामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांना 25 किमी अंतर नेण्यासाठी अँम्ब्युलन्सने 42 हजार रुपये घेतल्याचं ते वृत्त होतं. त्याच वेळी उत्तर प्रदेशातील एका महिलेची करुण कहाणी सांगणारी बातमीही सरदाना यांनी शेअर केली होती. रेमडेसिव्हीरसाठी हातापाया पडली, मुख्यमंत्री कार्यालयाच्या पाया पडली, मात्र एकुलत्या एका मुलाचे प्राण वाचवू शकली नाही, असे ते वृत्त होते.

(News Anchor Rohit Sardana passed away)

प्लाझ्मादानाचे आवाहन

त्याआधीही कोणाला प्लाझ्मा, तर कोणाला रक्ताची मागणी करणारी ट्वीट सरदाना करतच होते. कोरोना उपचारानंतर बऱ्या होणाऱ्या किमान एक चतुर्थांश व्यक्तींनी प्लाझ्मा डोनेट केला, तरी अनेक जीव वाचतील, असं आवाहन त्यांनी केलं होतं. त्यावरुन एका ट्वीटराईटशी त्यांचे खटकेही उडाले. परंतु व्यवस्थेचा भाग आहोत, जीव वाचवू शकतो, तर सत्पात्री दान करण्यात काय चूक आहे? असा सवाल त्यांनी केला होता. कोरोना संसर्गातून बरं झाल्यानंतर प्लाझ्मादान करण्याचा त्यांचाही मानस असावा, मात्र दुर्दैवाने ते होऊ शकले नाही.

कोण होते रोहित सरदाना ?

रोहित सरदाना हे अनेक वर्षांपासून टीव्ही मीडियात कार्यरत होते. ‘आज तक’ वाहिनीवरील दंगल या शोचं ते अँकरिंग करत होते. 2018 मध्ये त्यांना गणेश शंकर विद्यार्थी पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

संबंधित बातम्या :

लोकप्रिय न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन, कोरोनावरील उपचारादरम्यान हृदयविकाराचा धक्का

(News Anchor Rohit Sardana passed away last three tweets about COVID Patients)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI