‘बिग बॉस’ सोडून जाण्यासाठी निक्की तांबोळीला दिले 6 लाख; चाहत्यांना धक्का?

बिग बॉस 14 (Bigg Boss 14) चा फिनाले वीक सुरू झाले आहे. या आठवड्यातच आपल्याला समजेल की, बिग बॉस 14 चा विजेता कोण असणार आहे.

'बिग बॉस' सोडून जाण्यासाठी निक्की तांबोळीला दिले 6 लाख; चाहत्यांना धक्का?

मुंबई : ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14)चा फिनाले वीक सुरू झाले आहे. या आठवड्यातच आपल्याला समजेल की, बिग बॉस 14 चा विजेता कोण असणार आहे. सध्या बिग बॉस घरात रुबीना, अली, राहुल, निक्की आणि राखी हे सदस्य आहेत आणि यापैकीच एक बिग बॉस 14 चा विजेता असणार आहे. दरवर्षी बिग बॉसमध्ये फिनालेच्या अगोदर पैसे घेऊन शो सोडण्याची संधी सदस्यांना दिली जाते. (Nikki Tamboli offered 6 lakh to leave Bigg Boss)

त्यामध्ये बरेचजण पैसे घेऊन शो सोडून जातात तर काहीजण ग्रँड फिनालेसाठी थांबतात. आता बिग बॉस 14 मध्ये निक्की तांबोळीला पैसे देऊन शो सोडण्याची संधी बिग बॉसने दिली आहे. मात्र, निक्की पैसे घेऊन शो सोडते का हे बघण्यासारखे आहे. निक्की जर 6 लाख रूपये घेऊन शो सोडलातर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे.

नुकताच बिग बॉसच्या घरात आरजे आले होते. त्यांनी घरातील सदस्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले यावेळी आरजेने राहुलला विचारले की, तुझ्या लग्नात तू घरातील सदस्यांपैकी कोणासा बोलवणार याला उत्तर देताना राहुल म्हणाला की, यासाठी मला दिशासोबत चर्चा करावी लागेल कारण मी तिला न विचारता यांना बोलवले आणि तिच लग्नाला आली नाहीतर हे राहुलचे उत्तर ऐकल्यानंतर घरातील सर्वच सदस्यांना आपले हासू आवरता आले नाही.

संबंधित बातम्या : 

बिग बॉस-15ची घोषणा; होस्ट म्हणून सलमान खान घेणार इतकी मोठी रक्कम!

Bigg Boss 14 | सलमान खानने राहुल वैद्य आणि अली गोनीला झापलं!

Bigg Boss 14 | जान कुमार सानू आणि देवोलीना भट्टाचार्यमध्ये खडाजंगी !

(Nikki Tamboli offered 6 lakh to leave Bigg Boss)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI