Nitish Bharadwaj | ’13 वर्ष शारीरिक संबंध नाहीत, जवळ गेल्यानंतर…’, ‘महाभारत’मधील कृष्णाचे पत्नीवर गंभीर आरोप

'तिला स्त्री-पुरुषाचं नातं मान्य नव्हतं तर...', ‘महाभारत’मधील कृष्णाचे पत्नीवर गंभीर आरोप, शारीरिक संबंध, संपत्ती, मुलींची कस्टडी... इत्यादी गोष्टींवर अभिनेते नितीश भारद्वाज यांनी सोडलं मौन.... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नितीश यांच्या वक्तव्याची चर्चा...

Nitish Bharadwaj | '13 वर्ष शारीरिक संबंध नाहीत, जवळ गेल्यानंतर...', ‘महाभारत’मधील कृष्णाचे पत्नीवर गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Mar 22, 2024 | 8:51 AM

‘महाभारत’ मालिकेत श्री कृष्ण यांची भूमिका अभिनेते अभिनेते नितीश भारद्वाज यांनी साकारली होती. कृष्ण म्हणून त्यांना लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. पण आता नितीश भारद्वाज त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नितीश भारद्वाज आणि पत्नी स्मिता गाटे एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. दोघांनी कोर्टात घटस्फोटाचा अर्ज देखील दाखल केला आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत नितीश भारद्वाज यांनी स्मिता यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहे. स्त्री-पुरुषामध्ये असणारं नातं, 13 वर्ष नसलेले शारीरिक संबंध, मुलींची कस्टडी… इत्यादी गोष्टींवर नितीश भारद्वाज यांनी मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नितीश भारद्वाज आणि स्मिता गाटे यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

रिपोर्टनुसार, नितीश भारद्वाज सध्या मुलींच्या कस्टडीसाठी कोर्टात लढत आहे. नितीश भारद्वाज मला नोकरी करू देत नाहीत असे आरोप IAS पत्नी स्मिता गाटे यांनी अभिनेत्यावर केल्याची माहिती मिळत आहे. नितीश भारद्वाज म्हणाले, ‘मी किती जुन्या विचारांचा आहे हिच गोष्ट तिला सर्वांना सांगायची होती. जेव्ही ती सस्पेंड झाली होती तेव्हा तिची नोकरी परत मिळवून देण्यासाठी मी किती धडपड केला. जर मला माझ्या पत्नीला घरीच बसवून ठेवायचं असतं, तर मी एवढं काही केलंच नसतं…’

‘मझ्यासोबत लग्नाआधी 2 घटस्फोट झाले आहेत. सातवं वेतन लागू झाल्यानंतर मी नोकरी सोडून देणार आहे. असं ती मला म्हणाली होती, एवढंच नाही तर, मला उत्तम कुटुंब हवं आहे… असं देखील ती मला म्हणाली. अनेक लोकांनी देखील मला सांगितलं चांगली महिला आहे लग्न करुन घे… लग्नानंतर 2012 मध्ये जुळी मुलं झाली. त्यासाठी पुण्यात घर घेतलं. इंडस्ट्रीमधील लोकांना लोन मिळत नाही. कारण त्यांची कमाईचं काही सांगता येत नाही. अशात पत्नीने कर्ज काढलं. पण त्यातील 70 टक्के रक्कम तिने माझ्याकडून घेतली. त्यानंतर जे काही आहे ते मुलींचं आहे असं म्हणत घर देखील स्वतःच्या नावावर करुन घेतलं… ते देखील मी केलं…’

हे सुद्धा वाचा

शारीरिक संबंधांवर नितीश भारद्वाज यांचं मोठं वक्तव्य…

नितीश भारद्वाज म्हणाले, ‘स्त्री-पुरुषाच्या संबंधांमध्ये तिला राहायचं नव्हतं… असं होतं तर मग लग्न का केलं? 3 वेळा लग्न का केलं? लग्न न तोडता तिला एकटं वैवाहिक आयुष्य जगायचं होतं. 13 वर्ष झालेत आमच्याच शारीरिक संबंध नाहीत. मी जेव्हा तिच्या जवळ जायचो ती दूसऱ्या खोलीत मला पाठवायची… मी तिच्यासाठी योग्य पुरुष होतो. मुंबईत असतो… कधी-कधी घरी येतो…’

‘ती मला मुलांनी भेटू देत नाही. ब्लॉक करुन ठेवलं आहे. मुलांसोबत देखील ती मला कोणतं नातं ठेवू देत नाही. पण तिला माझा पैसा हवा आहे. सुरुवातील मुलांना जन्म दिला आणि त्यानंतर मला विकी डोनर केलं आहे… त्यानंतर आता पैसे हवेत मी तिचा एटीएम नाही… माझ्या मुली तिच्यासारख्या वागायला नकोत एवढंच मला वाटतं…’ असं देखील नितीश भारद्वाज म्हणाले… नितीश भारद्वाज कायम मुलाखतींच्या माध्यमातून त्यांच्या खासगी आयुष्यातील अडचणी सांगत असतात.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.
'दिवार'मधील 'तो' डायलॉग म्हणत चतुर्वेदींकडून शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल
'दिवार'मधील 'तो' डायलॉग म्हणत चतुर्वेदींकडून शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल.
कॅमेरा सोमय्या शायनिंग.., होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेते भिडले
कॅमेरा सोमय्या शायनिंग.., होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेते भिडले.
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?.