AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अश्लील गाण्यानंतर नोरा फतेहीचं नवीन गाणं रिलीज, भर रस्त्यात मुलींसोबत केला डान्स, Video व्हायरल

नोरा फतेहीचा अश्लील गाण्याचा वाद सुरु असतानाच नोरा फतेहीचं नवीन गाणं झालं रिलीज. ज्यामध्ये नोराने भर रस्त्यांमध्ये मुलींसोबत केला डान्स. व्हिडीओ प्रचंड व्हायरल.

अश्लील गाण्यानंतर नोरा फतेहीचं नवीन गाणं रिलीज, भर रस्त्यात मुलींसोबत केला डान्स, Video व्हायरल
| Updated on: Apr 10, 2026 | 4:04 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘सरके चुनर तेरी’ या गाण्यावरील वाद अद्याप शांत झालेला नसतानाच तिचं नवीन गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नोरा फतेहीने 7 एप्रिल रोजी तिचं नवीन गाणं ‘Baddies’ इन्स्टाग्रामवर शेअर केलं. या गाण्याचे बीट्स प्रेक्षकांना खूप आवडत असून, म्युझिक व्हिडिओमध्ये तिच्या दमदार डान्सने पुन्हा एकदा चाहत्यांना भुरळ घातली आहे.

या गाण्यात नोरा पर्पल रंगाच्या स्टायलिश शायनी टॉपसोबत ब्लॅक जीन्समध्ये दिसते. विशेष म्हणजे तिचा लूक मॉडर्न असूनही मेकअप पूर्णपणे इंडियन स्टाइलमध्ये आहे. कपाळावर बिंदीही स्पष्ट दिसते. तिच्यासोबत बॅकग्राउंडमध्ये नाचणाऱ्या डान्सर्सचाही लूक मॉडर्न आणि इंडियन स्टाइलचा आहे. काहींनी नथही परिधान केली आहे. ज्यामुळे व्हिडिओला वेगळीच झलक मिळते.

मुंबईच्या रस्त्यावर शूट

या म्युझिक व्हिडिओमध्ये सर्व कलाकार मुंबईतील एका सार्वजनिक रस्त्यावर, दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या ऑटो रिक्षांच्यामध्ये डान्स करताना दिसतात. व्हिडिओमध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया देखील दाखवण्यात आल्या आहेत. काही लोक आश्चर्यचकित दिसतात तर काही जण हसत प्रतिक्रिया देताना दिसतात. हे गाणं सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड होत आहे.

दरम्यान, नोरा फतेही ‘सरके चुनर तेरी’ या गाण्यामुळे निर्माण झालेल्या वादातून अद्याप पूर्णपणे बाहेर पडलेली नाही. या प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोग यांनी सुनावणी घेतली होती.

6 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत नोरा उपस्थित राहिली नाही, त्यामुळे आयोगाने नाराजी व्यक्त करत तिला अंतिम संधी दिली आहे. आता तिला 27 एप्रिल रोजी सुनावणीला हजर राहणे बंधनकारक आहे.

View this post on Instagram

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

सुनावणीत काय घडलं?

पीटीआयच्या वृत्तानुसार, या सुनावणीत गीतकार रकीब आलम, ‘केडी: द डेविल’चे दिग्दर्शक प्रेम आणि केव्हीएन प्रोडक्शनचे प्रतिनिधी गौतम के.एम. व सुप्रिथ उपस्थित होते. सुनावणीचं अध्यक्षस्थान विजया रहाटकर यांनी भूषवलं.

यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, गाण्याचे बोल महिलांच्या सन्मानाच्या विरोधात आहेत. क्रिएटिविटीच्या नावाखाली महिलांच्या प्रतिष्ठेशी तडजोड करता येणार नाही, असे त्यांनी नमूद केले.

सुनावणीदरम्यान संबंधित सर्वांनी गाणं आक्षेपार्ह असल्याचं मान्य केलं आणि त्याबद्दल लेखी माफीही मागितली. तसेच पुढील तीन महिन्यांत महिला सशक्तीकरणासाठी काम करून त्याचा अहवाल आयोगाला सादर करण्याचं आश्वासन दिलं.

Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....