AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aarya Season 2 | नव्या ड्रामासह सुष्मिता सेनची ‘आर्या’ छोट्या पडद्यावर परतणार! पाहा जबरदस्त टीझर…

‘आर्या’ परत आली आहे, आणि यावेळी फास आणखी घट्ट कसला जाणार आहे. पहिल्या सीझनच्या शानदार यशानंतर, डिस्ने+ हॉटस्टार, आंतरराष्ट्रीय एमी नामांकित हॉटस्टार स्पेशल, आर्याचा (Aarya season 2) आणखी एक रोमांचक आणि जबरदस्त हंगाम घेऊन येत आहे.

Aarya Season 2 | नव्या ड्रामासह सुष्मिता सेनची ‘आर्या’ छोट्या पडद्यावर परतणार! पाहा जबरदस्त टीझर...
Aarya Season 2
| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 2:25 PM
Share

मुंबई : ‘आर्या’ परत आली आहे, आणि यावेळी फास आणखी घट्ट कसला जाणार आहे. पहिल्या सीझनच्या शानदार यशानंतर, डिस्ने+ हॉटस्टार, आंतरराष्ट्रीय एमी नामांकित हॉटस्टार स्पेशल, आर्याचा (Aarya season 2) आणखी एक रोमांचक आणि जबरदस्त हंगाम घेऊन येत आहे. या शोचे चाहते बहुप्रतिक्षित सिक्वेलच्या टीझरसाठी खूप उत्सुक होते. याचा टीझर एक प्रभावी आणि वेधक कथानक सादर करते, ज्यात आर्या तिच्या पतीच्या हत्येचा बदला घेते.

राम माधवानी फिल्म्सकडून पुरस्कार विजेत्या आणि अत्यंत प्रतिभावान राम माधवानी निर्मित, हा टीझर प्रेक्षकांना एक रोमांचक आणि रक्तरंजित शो सादर करणार आहे ज्यामध्ये आर्याच्या दुसऱ्या सीजनमध्ये आर्या सरीनचा प्रवास अधिक कठोर आणि गडद होणार आहे. या टीजरमध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन एक भयंकर आणि क्रूर लूकमध्ये दिसत आहे, ती उग्र लाल रंगात माखलेली असून, आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी कठोरपणे लढणाऱ्या वाघीणीसारखी दिसत आहे.

पाहा टीझर :

दुसऱ्या सीजनविषयी बोलताना, दिग्दर्शक राम माधवानी म्हणाले की, ‘पहिल्या सीजनसाठी आम्हाला मिळालेले प्रचंड कौतुक आणि प्रेम खूप सुखवणारे होते, यासाठी आम्ही प्रेमपूर्वक आणि संपूर्ण मेहनतीने याचा दूसरा सीजन बनवण्याचा निर्णय घेतला. इंटरनॅशनल एमी अवार्ड्समध्ये बेस्ट ड्रामा श्रेणीमध्ये झालेले या शोचे नॉमिनेशन या कथेवरचा आमचा विश्वास प्रदर्शित करतो, जी ऐकवण्यासाठी आम्ही इथे आहोत. शोच्या चाहत्यांना आर्याच्या प्रवासातील पुढचे पाऊल सादर करण्यासाठी मी उत्साहित आहे. ती प्रत्येक पाऊलावर आव्हानांना सामोरे जाते कारण ती आपल्या परिवाराला जिवंत ठेवणे आणि बदला घेण्यासाठी  संतुलन बनवण्यासाठी मजबूर आहे.’

सुष्मिताचे धमाकेदार पुरागमन

सुष्मिता सेन (Sushmita Sen)  बॉलिवूडची एक प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिने आपल्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट कामगिरी केल्या आहेत. गेल्या वर्षी, सुष्मिता 10 वर्षांनी अभिनय क्षेत्रात परतली आहे. ती क्राईम सीरीज ‘आर्या’द्वारे (Aarya) प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. जेव्हा, बरेच कलाकार बऱ्याच काळानंतर चित्रपट आणि शोमध्ये परततात, तेव्हा त्यांना पूर्वीसारखा चांगला प्रतिसाद मिळत नाही, पण सुष्मिताने ‘आर्या’मधील तिच्या अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकित केले.

सुष्मिताने या सीरीजमध्ये उत्कृष्ट अभिनय केला. अभिनेत्रीचे केवळ प्रेक्षकांनीच नव्हे तर समीक्षकांनी देखील खूप कौतुक केले. गेल्या वर्षी सुष्मिताने या मालिकेसाठी अनेक पुरस्कार पटकावले होते आणि तरीही मालिका आणि सुष्मिताची जादू कायम आहे. वास्तविक, आर्याला एक मोठी कौतुकाची थाप मिळाली आहे. या सीरीजला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2021मध्ये (International Emmy Awards 2021) नामांकन मिळाले आहे.

हेही वाचा :

दिल तो बच्चा है जी…!! ‘मी होणार सुपरस्टार’च्या निमित्ताने दिग्गजांनी देखील परिधान केला शाळेचा गणवेश

Katrina Kaif-Vicky Kaushal Wedding | लग्नाच्या तयारीची सुरुवात, विकी-कतरिना चिडीचूप मात्र टीम राजस्थानला रवाना!

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.