काश्मीर फाईल्सनंतर आता ‘लंडन फाईल्स’, गोष्ट एका शोधाची, अंगावर काटा आणणारी कथा!

प्रमुख भूमिकांमध्ये अर्जुन रामपाल आणि पूरब कोहलीयांच्या भूमिका असलेल्या लंडन फाइल्स या शोचा चित्तवेधक ट्रेलर या प्लॅटफॉर्मने प्रदर्शित केला. तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवणारा ड्रामा आणि सस्पेन्स यांनी सज्ज असलेली ही सहा एपिसोड्सची मालिका 21 एप्रिलला वूट सिलेक्टवर प्रीमियरवर प्रदर्शित होणार आहे.

काश्मीर फाईल्सनंतर आता 'लंडन फाईल्स', गोष्ट एका शोधाची, अंगावर काटा आणणारी कथा!
अर्जुन रामपालImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 8:10 AM

मुंबई :  काश्मीर फाईल्सनंतर आता आपल्या ओरिजिनल मालिकांचे सातत्याने यशस्वी प्रदर्शन करत असलेल्या भारताच्या आघाडीच्या स्ट्रिमिंग चॅनल वूट सिलेक्टकडून आता प्रेक्षकांना आपल्या ‘लंडन फाइल्स’ (London Files) या सस्पेन्स थ्रिलरसोबत चित्तथरारक प्रवासाला नेले जाणार आहे. प्रमुख भूमिकांमध्ये अर्जुन रामपाल (Arjun Rampal) आणि पूरब कोहली (Purab Kohali) यांच्या भूमिका असलेल्या या शोचा चित्तवेधक ट्रेलर या प्लॅटफॉर्मने प्रदर्शित केला. तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवणारा ड्रामा आणि सस्पेन्स यांनी सज्ज असलेली ही सहा एपिसोड्सची मालिका 21 एप्रिलला वूट सिलेक्टवर प्रीमियरवर प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Arjun (@rampal72)

‘लंडन फाइल्स’ ही एक इन्व्हेस्टिगेटिव्ह थ्रिलर मालिका आहे. डिटेक्टिव्ह ओम सिंगच्या भूमिकेत असलेल्या अर्जुन रामपालने लंडन शहरातील हरवलेल्या व्यक्तीची केस घेतल्यावर घडणाऱ्या घटना ही मालिका दाखवते. वैयक्तिक समस्यांचा सामना करत असलेल्या ओमला मीडियातील दिग्गज अमर रॉयच्या हरवलेल्या मुलीची केस घेणे भाग पडते. पूरब कोहलीने भूमिका केलेला अमर हा अत्यंत क्रूर अँटी इमिग्रेशन विधेयकाला पाठिंबा दिल्यामुळे एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे. ओम प्रकरणाची चौकशी सुरू करतो तसे एक अधिक गडद रहस्य प्रकाशात येते. त्यातून गाडली गेलेली सत्ये आणि ओमचा दाबला गेलेला इतिहास प्रकाशात येण्याची भीती निर्माण होते.

View this post on Instagram

A post shared by Arjun (@rampal72)

चित्तथरारक ड्रामा आणि सस्पेन्स यांनी सज्ज असलेल्या लंडन फाइल्समध्ये महत्त्वाच्या भूमिकांमध्ये गोपाल दत्त, सपना पब्बी, मेधा राणा, सागर आर्या आणि ईवा जेन विलिसही आहेत. सचिन पाठक यांचे दिग्दर्शन आणि जार पिक्चर्सची निर्मिती असलेली ही सहा एपिसोडची मालिका २१ एप्रिल रोजी फक्त वूट सिलेक्टवर प्रीमियरसाठी सज्ज आहे.

या मालिकेबद्दल बोलताना आघाडीचा अभिनेता अर्जुन रामपाल म्हणाला, “लंडन फाइल्स’ ही मालिका मी यापूर्वी केलेल्या इतर प्रकल्पांपेक्षा वेगळी आहे. खरे सांगायचे तर भारतीय किंवा आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्सवर मी अशा प्रकारचा कोणताही प्रकल्प मी पाहिलेला नाही असे मला वाटते. ओम (माझी व्यक्तिरेखा) एक हाय प्रोफाइल केसची चौकशी करतो त्या वेळी आज रोजच्या रोज दिसणाऱ्या अनेक समस्या त्यातून दिसतात. डिटेक्टिव्ह ओमची व्यक्तिरेखा अनपेक्षित, चुकांनी भरलेली आणि गुंतागुंतीची आहे आणि मी हे मान्य करेन की, या व्यक्तिरेखेला साकारताना माझ्यावरही त्याचा प्रभाव पडला. त्याचा स्क्रीनप्ले, एडिट, फोटोग्राफी, परफॉर्मन्स आणि कथानक यांच्यामुळे प्रेक्षक सोफ्यावर खिळून राहतील याची मला खात्री आहे. त्यातून प्रश्न निर्माण होतील आणि मार्गही नक्कीच दिसतील. संपूर्ण टीमने साध्य केलेल्या गोष्टींचा मला खूप अभिमान आहे. वूट सिलेक्टसोबत काम करताना मला छान वाटले. त्यांना या शोमध्ये चांगले भविष्य दिसते आहे आणि जार पिक्चर्सचा त्यांना पाठिंबा आहे. आता मी सर्वाधिक महत्त्वाच्या भागासाठी म्हणजे प्रेक्षकांच्या प्रतिसादासाठी प्रतीक्षेत आहे.”

पूरब कोहली म्हणाले की, “रॉक ऑननंतर अर्जुनसोबत सेटवर जाताना खूप मजा आली. अर्जुनने या मालिकेत खूप सुंदर काम केले आहे. माझी भूमिका मालिकेत विशेष अतिथीच्या स्वरूपात असली तरी माझ्यासारखे नसलेली व्यक्तिरेखा करताना मला एक वेगळाच अनुभव मिळाला. आपल्या भूतकाळातील रहस्ये असलेला प्रसारमाध्यमातील राजा ज्यामुळे आपण आजपर्यंत जे काही कमावले आहे ते नष्ट होण्याची भीती आहे आणि या सर्वांच्या मध्यभागी त्याची हरवलेली मुलगी आहे. अमर रॉयच्या अनेक गडद बाजू आहेत. तसेच मी मोहितसोबत आणणि अजयसोबत दुसऱ्या वेळी काम करतोय. माझ्या निर्मात्यांसोबतचे नाते घट्ट होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. सचिन हा एक अत्यंत चांगला दिग्दर्शक आहे. मला खात्री आहे की, तो नक्कीच व्यवसायात मोठी कामगिरी करेल. आणि शेवटी, इट्स नॉट दॅट सिंपल या माझ्या पहिल्या भारतीय वेब सीरिजनंतर वूटवर परत येताना खूप मजा येतेय.”

या रोमांचक मालिकेत आपल्या स्पेशल उपस्थितीबाबत बोलताना सपना पब्बी म्हणाल्या की,”लंडन फाइल्स’सारख्या महत्त्वाच्या शोचा भाग होताना मला खूप आनंद होत आहे. थ्रिलर्स हा माझ्या आवडीचा प्रकार आहे. एक अभिनेत्री म्हणून आणि एक प्रेक्षक म्हणूनही. तसेच अशा सुंदर कलाकारांसोबत काम करायला कोणाला आवडणार नाही. लंडन फाइल्स हा धमाकेदार सस्पेन्स थ्रिलर आहे. यात रहस्यमय व्यक्तिरेखा आणि अनपेक्षित ट्विस्ट्स आहेत. ते प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवतील.”

संबंधित बातम्या

KGF Chapter 2 Box Office Collection: ‘केजीएफ 2’ची पहिल्याच दिवशी बंपर कमाई; यशने स्वत:च्याच चित्रपटाचा मोडला विक्रम

VIDEO: ‘चंद्रमुखी’ची नवी लावणी चुकवणार प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.